महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलनस्थळी १०० CCTV | कंट्रोल रुम | ट्रॅफिक नियोजनासाठी 600 जणांची टीम
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेली शेतकऱ्यांची लढाई अजून वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेला हिंसाचार आणि इतर अनेक आरोप-प्रत्यारोपानंतर आता शेतकरी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सीसीटीव्ही, वायफाय आणि राहण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तु आणण्याच्या तयारीत आहेत. जोपर्यंत कायदे परत घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमीका यापूर्वीच संयुक्त शेतकरी मोर्चाने घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशद्रोही पोस्ट आणि फेक न्यूज | आळा घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करा - सुप्रीम कोर्ट
केंद्र सरकारनंतर आता फेक न्यूज आणि देशद्रोही पोस्टबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर कारवाई केली आहे. भाजप नेते विनीत गोयनका यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टाने ट्विटर आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. कोर्टाने ट्विटर आणि केंद्र सरकारला असे मॅकेनिजम बनवण्यास सांगितले आहे, ज्यामुळे फेक न्यूज आणि देशद्रोही किंवा भडकाऊ पोस्टवर आळा घातला येईल. याशिवाय कोर्टाने बोगस अकाउंट्सवरही कारवाई करण्यास सांगितले आहे. चीफ जस्टिस एसए बोबडे यांनी सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला याला प्रस्तावित सोशल मीडिया रेगुलेशनमध्ये सामील करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२४ मधील निवडणुकीत भाजपला देशात ३० कोटी मतं मिळतील | प्रदेशाध्यक्षांचं विधान
आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार असल्या तरी या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या २०२४ च्या निवडणुकीत तब्बल ३० कोटी मतं आणि ४०० पेक्षा अधिक जागा देशभरात जिंकायच्या आहेत असा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तुमचा मुलगा जय शाहचं काय? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? | ममता बॅनर्जींचा सवाल
मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय Koo App वर | पण Koo चा अवतार पाहून आपलं ट्विटरच बरं म्हणत आहेत
भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 500 अकाऊंटस् विरोधात कारवाई केली आहे. यातील काही अकाऊंटस् कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहेत. फेक कंटेट वापरला जातोय, तुमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं केंद्रानं ट्विटरला फटकारलं आहे. ट्विटरनं त्यासंबंधी एक ब्लॉग प्रकाशित केला आहेत. ब्लॉगमधील माहितीनुसार बारत सरकारच्या आदेशानंतर काही अकाऊंट बंद करण्यात आली आहेत तर काही स्वत:हून बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारनं ट्विटरला 257 अकाऊंटची माहिती दिली होती. ती बंद करण्यावरुन वाद सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेक न्युज पसरविणाऱ्यांविरुद्ध मोदी सरकार कारवाईला करणार | मग BJP IT Cell? - प्रशांत भूषण
सोशल मीडिया कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
GST, मनरेगा, आधार'सारख्या योजनांना विरोध करत स्वतःच त्या राबविल्या | हा यु-टर्न नव्हता का?
भारतीय जनता पक्षाने जीएसटी, मनरेगा आणि आधार युआयडी सारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबविल्या होत्या. हा यु-टर्न नव्हता का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटरच्या कायदेशीर उत्तरानंतर मोदी सरकार संतप्त | ट्विटरच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचा इशारा
सोशल मीडियासंबंधित मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
'ते' अकाउंट बंद करण्याचे सरकारचे निर्देश भारतीय कायद्यांनुसार नाहीत | ट्विटरचं उत्तर
सोशल मीडियासंबंधित मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.’
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस पक्ष ना स्वत:चं भलं करु शकत, ना देशाचं | मोदींचं टीकास्त्र
सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असेही त्यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१० फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत ठोकलं. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांची खासदार डॉ. कोल्हे भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजावून घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नाना पटोले आणि उदयनराजेंची दिल्लीत भेट | पण नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेने आश्चर्य
साताऱ्यातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा राजकारणापलीकडील स्वभाव सर्वश्रुत आहे. खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या मानाप्रमाणेच वागतात किंवा बोलतील असाच अनुभव आहे. आतादेखील त्यांच्या अशाच एका कृतीची समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
अब की बार, त्रस्त झाले मतदार | पेट्रोल-डिझेल अजून महागले | महागाई सुद्धा वाढणार
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ सुरूच आहे. कोरोनाच्या संकट काळानंतर हे प्रथमच झाले. काल ब्रेन्ट क्रूड तेलाने प्रति बॅरल 61 डॉलरचा टप्पा ओलांडला. त्यामुळे देशांतर्गत बाजारात आज दोन्ही इंधन महागले. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांमध्ये 30 आणि 25 पैसे प्रतिलिटर वाढ केली. काल या इंधनात प्रति लिटर 35 ते 35 पैशांची वाढ झाली होती. दिल्लीत बुधवारी पेट्रोल प्रति लिटर 87.60 रुपये तर डिझेल 77.73 रुपयांवर गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिमुकलीच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकार धावलं | औषधांवरील सर्व कर माफ
अखेर अथक प्रयत्नानंतर तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधासाठी जो कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार होता, तो कर माफ व्हावा याकरिता राज्याच्या आरोग्य विभागाने तीराच्या कुटुंबाना तसे सोमवारी (8 डिसेंबर) पत्र दिले आहे. यामुळे तीराच्या परदेशातून येणाऱ्या औषधांवरील करमाफीबाबत सकारात्मक पाऊल म्हणावं लागणार आहे. प्रत्यक्षात औषध भारतात येण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या तीरा तिच्या अंधेरी येथील घरी असून पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. तीराच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, तिची तब्बेत स्थिर असून लवकरात लवकर तिला औषधे मिळावीत यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत. तीराचा रक्ताचा एक अहवाल नेदरलँडवरून येणे बाकी असून तो दोन – तीन दिवसांत येईल. तो एकदा का अहवाल आला की, तीराचा औषध मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता नीलेश दिवेकर याने या डॉक्युमेंटेशन साठी मागचे 2 आठवडे बरीच मेहनत घेतली.
4 वर्षांपूर्वी -
दीप सिद्धूने रचला होता प्लान | शेतकरी नाहक बदनाम | पोलिसांकडे खुलासा
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा अचानक राजीनामा
रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांनी राजीनामा दिला आहे. सध्या रिपब्लिकचे अनेक कर्मचारी टीआरपी घोटाळ्यात अडकले असून अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अगदी स्वतः अर्णब गोस्वामी तसेच CEO देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आठवड्यात ३ सुट्ट्या? | मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार सरकारने 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावं लागणार असून आठवड्यात काम करण्याची मर्यादा 48 तासांची आहे. त्यामुळे 12 तास काम केल्यास 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी देता येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या धोरणांवर टीका | ED पत्रकारांच्या मागे | न्युज पोर्टलच्या कार्यालयावर ईडीची धाड
हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. अभिसार शर्मा सध्या newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच अनेक शोध पत्रकारितेतून त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचं वास्तव उघड केलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर न्युज पोर्टल्स मोदी सरकाविरोधात स्पष्ट बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शर्मा यांच्या कार्यालयावर छापा पडल्याचं म्हटलं जातंय. अनेक पत्रकार या कारवाईनंतर निषेध नोंदवत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जुमलाजीवी, दंगलजीवी, रक्तजीवी, अदानीजीवी, अंबानीजीवी, फेकुजीवी, थापाजीवी आणि...
मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो असं मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH