महत्वाच्या बातम्या
-
आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी | WHO'चा महत्वपूर्ण निर्णय
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर व बायोएटनेक यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
विधेयकावरून एखाद्या DIG ने राजीनामा देण्याची स्थिती पहिल्यांदाच | फडणवीसांना विसर?
जयस्वाल यांच्या या प्रतिनियुक्तीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अतिशय कार्यक्षम असे डीजी महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, डीजींना कुठेही विश्वासात न घेता कारभार चालला आहे. पोलीस हा स्वतंत्र विभाग आहे, तो जरी गृहमंत्रालयाच्या अधिकारात असला तरी, त्याची स्वायत्ता आहे. सरकारने सुपरवायझर म्हणून या विभागाकडे काम केलं पाहिजे. पण, लहानातल्या लहान बदल्यांपासून ते अनेक गोष्टीत हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच, डीजींना हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे डीजी प्रतिनियुक्ती घेत आहेत, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.
4 वर्षांपूर्वी -
केरळ | ANI म्हणत भाजप आमदार प्रस्तावाच्या विरोधात | PTI म्हणतं समर्थनात
केरळमध्ये, केंद्राच्या नवीन वादग्रस्त कृषि कायद्याविरूद्ध राज्यातील पी. विजयन सरकारने आणलेल्या प्रस्तावाला विधानसभेतील भाजपचे एकमेव आमदार राजगोपालन यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावात केंद्रीय कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून या निषेधार्थ हजारो शेतकरी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A31 Smartphone | झाला स्वस्त | जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy A31: सॅमसंगचा ए-सीरिजचा उत्तम स्मार्टफोन गॅलेक्सी ए 31 (Galaxy A31) आता स्वस्त झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये Galaxy A31 ची किंमत कमी केली गेली होती. यावर्षी जूनमध्ये हा स्मार्टफोन 21,999 रुपये किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
Instagram | कसे वाढवाल फॉलोअर्स | महत्वाच्या टिप्स
हल्ली कोणाच्या मोबाईलमध्ये चांगला फोटो काढला गेला तर तर सर्वात आधी इस्टाग्राम (instagram) या सोशल प्लेटफार्म वर शेअर केला जातो. सोशल मिडीयाच्या प्लॅटफॉर्म मध्ये इंस्टाग्राम एवढे लोकप्रिय आहे की तिथे फॉलोवर्स वाढवण्यासाठी लोक पैसे ही खर्च करतात. तुम्हाला पण जर तुमचे इंस्टाग्रमवरचे फ़ॉलोअर्स वाढवायचे असतील तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स.
4 वर्षांपूर्वी -
Jio Network | नववर्षाचं मोठं गिफ्ट | सर्व नेटवर्कसाठी ही सेवा विनामूल्य
देशात शेतकरी आंदोलन पेटल्यानंतर शेतकऱ्यांनी हरियाणा आणि पंजाबमध्ये Jio विरोधात मोठं अभियान सुरु केलं आहे. त्यानंतर Jio चा स्पर्धकांसोबत वाद पेटला होता. मात्र नवं वर्षात Jio पुन्हा स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नववर्षाचं जबरदस्त गिफ्ट दिलंय. कंपनीने 1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
FASTag | टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ
रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता फास्टॅग बनवण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने आता ती मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IBPS Clerk Exam Result | आज निकाल होणार जाहीर | पहा सविस्तर
IBPS म्हणजेच The Institute of Banking Personnel Selection च्या यंदाच्या प्रिलिम्स परीक्षांचा निकाल आज (31 डिसेंबर) जाहीर होणार आहे. यंदा या परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. दरम्यान जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, IBPS Clerk Prelims Result 2020 हा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ibps.in वर जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर होताच पात्र विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळेल. नक्की वाचा:
4 वर्षांपूर्वी -
आठ बँकांना ४८३७ कोटींचा चुना | IVRCL कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल
बँकांची आर्थिक स्थिती गंभीर असताना अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाहीन बाग गनमॅन कपिल गुर्जरचा भाजपात प्रवेश | माध्यमांत टीका होताच हकालपट्टी
दिल्लीच्या शाहीन बाग येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सीएएच्या निषेधाच्या विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले होते आणि तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी होता. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, ‘या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.’
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिककडून लाच घेणाऱ्या दासगुप्ताच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पार्थो दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ECGC मुंबई मध्ये ५९ जागांवर भरती
ईसीजीसी लिमिटेड मुंबई, महाराष्ट्रातील भारत सरकारची मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात पतपुरवठा विमा प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय कर क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- ईसीजीसी भरती २०२१ प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाहीन बाग बंदूकधारी भाजपात | भाजप हे दहशतवाद्यांचे नैसर्गिक ठिकाण - प्रशांत भूषण
दिल्लीच्या शाहीन बाग येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सीएएच्या निषेधाच्या विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले होते आणि तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी होता. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, ‘या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.’
4 वर्षांपूर्वी -
मोजक्या उद्योजकांसाठी लोकशाही पणाला लावू नका | वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही आवाज
मोदी सरकारने नवा कृषी कायदा अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या मोठा उद्योजकांसाठीच आणला आहे असा आरोप सातत्याने विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी केला आहे. पंजाब आणि हरयाणातील बच्चा बच्चा सध्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलत आहे. विशेष म्हणजे पंजाब मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील केंद्र सरकार विरोधात बंड पुकारून शेतकऱ्यांना समर्थन देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिहार | आमदार फुटणार जेडीयूचे | पण ऑपरेशन होणार लोटसचं | १७ आमदार संपर्कात
बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा आली. त्यानंतर इच्छा नसतानाही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र निवडणुकीच्या निकालाअंती सर्वात मोठा पक्ष ठरला तो लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याची पोलखोल | शेतकऱ्यांशी करार करून २ कोटींचा चुना | कंपनी पसार
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक'ला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सहा वेळा भेटून लाच
पार्थ दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्यांशी चर्चा न करताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटले | पवारांचं टीकास्त्र
नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा ३४वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी इतके दिवस मुक्काम ठोकला आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. उद्या ३० डिसेंबरला पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सावधान | कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी येत आहेत फेक कॉल
कोरोना आपत्तीवर उपाय म्हून लसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. जानेवारी महिन्यात कोणत्या कंपनीच्या लसचा वापर लसीकरणासाठी करायचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या अशा वातावरणात कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन आला तर लगेच सावध व्हा. सायबर क्षेत्रातले भामटे फोन करुन तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात, असा सावधगिरीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोंबड्यांचा ट्रक उलटला | आजूबाजूच्या कोंबडीचोरांकडून ३०० कोंबड्यांची लूट
आपल्या देशात एखादी फुकट मिळविणार असेल तर तुटून पडण्याची संधी लोकं अजिबात सोडत नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यात विषय पोटपूजेशी संबंधित असेल तर विचारायला नको. तसाच प्रकार मध्य प्रदेशातील बडवाणी भागात घडला आहे. झालं असं की कोंबड्यांची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आणि ट्रक उलटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS