महत्वाच्या बातम्या
-
बंगालचे रुपांतर गुजरातमध्ये केले जाऊ शकणार नाही | बंगालनेच देशाला राष्ट्रगीत दिलं
तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मागील महिन्यांपासून घमासान सुरू आहे. गेल्या काही दिवसांत हे राजकीय वैर आणखी तीव्र होत असल्याचं दिसून आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही दहशतवादी ठरवतील - राहुल गांधी
दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. सरकारविरोधात उभ्या राहणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. मग ते शेतकरी असो, मजूर असोत. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांनाही भाजप नेते आणि समर्थक देशद्रोही म्हणतात | यापेक्षा मोठं पाप नाही
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारने चर्चेचा आग्रह धरला आहे. शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार कमी अधिक करता येईल, पण आधी चर्चेची तारीख कळवा, अशी भूमिका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी घेतली. त्यावर, आम्ही फेटाळलेल्या दुरुस्त्या सोडून सरकारने नवा प्रस्ताव पाठवावा आणि आम्ही चर्चेस तयार आहोत, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
UK वॉचडॉग त्यांचं कर्तव्य करतात | भारतीय लॅपडॉग द्वेषयुक्त भाषेला देशभक्ती समजतात
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील वॉचडॉग म्हणजे ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार, हट्ट सोडा! | आगीशी खेळ करू नका | शेतकरी नेत्यांचा इशारा
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. मागील २८ दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्याअर्थी देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे | त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IDBI बँकेत 134 पदांसाठी भरती | मोठी संधी
आयडीबीआय बँक भरती 2020. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती प्राप्त करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन काळात सर्वाधिक मदतीला धावला महाराष्ट्र सैनिक | पण सर्व्हेमध्ये हे लोक प्रतिनिधी
लॉकडाउन दरम्यानचा म्हणजे कोरोना सर्वाधिक उच्चांकावर असताना सामान्य माणूस प्रचंड हतबल आणि त्रासलेला पाहायला मिळाला होता. कोरोना बाबतीत अनेक गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कोणीही कोणाच्या मदतीला जाण्यास कचरत होते. एखाद्या घरात कोरोना पेशंट असेल तर त्यांना अक्षरशः वाळीत टाकावं असे उद्योग सुरु झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबकडून ब्रिटिश सरकारची २८० वेळा माफी | 'वीर अर्णब' म्हणत नेटिझन्सकडून खिल्ली
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोल इंडिया लिमिटेड मध्ये 358 पदांची भरती
कोल इंडिया लिमिटेड भरती २०२१. कोल इंडिया लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 358 अधिकारी व वरिष्ठ अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 15 जाने 2021 रोजी किंवा तत्पूवी सीआयएल भरती २०२० साठी ऑफलाइन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माझगाव डॉक मध्ये 410 पदांची भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर भरती २०२१. माझगाव डॉक रिक्रूटमेंट २०२१. मॅझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईने ४१० अॅप्रेंटिसशिप पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार माझगाव डॉक भरती २०२० साठी ११ जानेवारी २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि माझगाव डॉक भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
राजा एवढाही फकीर निवडू नका की कोणताही व्यापारी त्याला स्वतःच्या खिशात ठेवेल
राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर ताशेरे ओढणं सुरुच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर थेट वार केला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या जाहिरातीतील शेतकरी सुद्धा आंदोलनात | बेकायदेशीरपणे वापरला फोटो
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतु, या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात नाहीत | फडणवीसांचा हिंदी माध्यमांवरून खोटा प्रचार
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी रवाना झाला आहे.महाराष्ट्रभरातील २१ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा या वाहन मोर्चात सहभाग आहे.सभेआधी सोमवारी हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित झाले होते.यावेळी किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केलं.
4 वर्षांपूर्वी -
६ वर्षांपूर्वी स्वतः काय बोलले त्याचा विसर | पण मनमोहनसिंग यांचं १४ वर्षांपूर्वीच अजून लक्षात?
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ग्रंथालयात कुराणही आहे आणि गीता-रामायणाचा अनुवादही आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचं हे विद्यापीठातील चित्रं अत्यंत चांगलं आहे, असं सांगतानाच अलिगड मुस्लिम विद्यापीठात मिनी इंडियाच पाहायला मिळतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएमयूचा गौरव केला. यावेळी त्यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देतानाच भारताच्या जडणघडणीत मुस्लिम स्कॉलर आणि एएमयूचं मोठं योगदान असल्याचंही स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टेट बँक ऑफ इंडियात 489 पदांची भरती
SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, अभियंता फायर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, स्पेशलिस्ट केडर ऑफिस सिक्युरिटी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 22 डिसेंबरपासून सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार sbi.co.in/careers. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याशिवाय उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगाने इंग्लंड विमान सेवा खूप आधीच रोखली | आपले प. बंगालच्या राजकारणात मग्न | तोपर्यंत भारतात..
लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर पदांची भरती
Bank of Baroda Recruitment 2020-21. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
गोदी मीडिया शेतकऱ्यांविरोधात | सोशल मीडियावर २ दिवसात ११ लाख समर्थक जोडले
केंद्रातील मोदी सरकारनं घाईघाईत आणलेल्या कृषी कायद्यांचा शेतकरी संघटनांकडून विरोध सुरू आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज २६ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत देखील शेतकऱ्यांची चिकाटी पाहून काही सरकार पुरस्कृत वाहिन्यांनी अर्थात गोदी मीडियाने शेतकरी आंदोलनाची बदनामी करण्यास सुरुवात केली होती आणि ती अजून सुरु आहे. त्यालाच प्रभावी उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांमधील काही तरुण पुढे आले आणि त्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग सुरु केला होता. मात्र त्यांना मिळत असलेला प्रतिसाद आणि उघडं पडत असलेल्या सरकारसाठी मुकेश अंबानींमार्फत भारतात राजकीय पाया भक्कम करणाऱ्या फेसबुकला पोटात दुखू लागलं.
4 वर्षांपूर्वी -
आत्महत्येच्या प्रयत्नातून शेतकरी बचावला | म्हणाला बरेवाईट झाल्यास मोदी-शहांवर गुन्हे नोंदवा
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने काल पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M