महत्वाच्या बातम्या
-
शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला मोठा प्रतिसाद | महाराष्ट्रात स्वाभिमानीचा रेल रोको
केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ICAI CA Exam | चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 13 तारखेला | वेळापत्रक
ICAI CA Examination 2020. इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Examination 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले होते. तर आता येत्या 8 डिसेंबरला चार्डेड आकआउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 (Chartered Accountants Foundation Examination paper 1) पार पडणार होता. मात्र तो पेपर आता येत्या 13 तारखेला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बांबू राईस | मधुमेह, सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी
सध्या बांबू राइसची (Bamboo Rice) चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. त्याची कारणेही निरनिराळे आहेत, पण त्यातील एक म्हणजे प्रमुख आजारांपैकी असलेले मधुमेह आणि सांधेदुखीपासून जर आराम हवा असेल तर बांबू राईस खाणे उपयुक्त ठरेल. बांबू राईस हा अतिरिक्त कोलेस्टेरॉलची समस्या, तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. भारतातील काही राज्यांनी या बांबू राईसचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन केले आहे. जंगलात राहणारे वनवासी, आदिवासी बांधवांना बांबू राईस हे एक रोजगाराचे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून नावारुपास येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI मध्ये 8500 पदांची महाभरती | अर्जासाठी ३ दिवस उरले
देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा. एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.
4 वर्षांपूर्वी -
अजब | गुजराती शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंब्याबाबत घोषणा मुख्यमंत्र्यांकडून | शेतकऱ्यांकडून नाही
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार खोटारडे आहे | मला दोनवेळा फसवलं | नाक दाबा त्याशिवाय ते....
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 142 पदांची भरती
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रायपूरच्या विविध विभागांत सीनिअर रेजिडेंटपदांसाठी भरती २०२०. एम्स भरती २०२०. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि या भरतीअंतर्गत जवळपास 142 जागा भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार एम्स भरती २०२० साठी १८ डिसेंबर २०२० परतत किंवा तत्पूर्वी अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि अर्जासंबंधित माहिती माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय तटरक्षक दलात 50 पदांची भरती | १०'वी शिक्षण | शेवटचा दिवस
इंडियन कोस्ट गार्ड भर्ती २०२०. आयसीजी भरती २०२०. भारतीय तटरक्षक दलाला नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि ५० कुक आणि स्टीवर्ड पदांसाठी ०१/२०१२ बॅच (नवीन (घरगुती शाखा)) साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार आयसीजी भरती २०२० मध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात ७ डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि भारतीय तटरक्षक दलासाठी २०२० पर्यंत अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण | पण भाजपने संधी साधली
देशभरात शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गेले १२ दिवस दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून उद्या ८ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ डिसेंबर) दिला होता. यादरम्यान समाज माध्यमांवर शरद पवारांची जुनी पत्रं व्हायरल झालं असून याच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून धक्का | अर्नब गोस्वामींच्या त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार | धाबे दणाणले
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाराजी व्यक्त करत नव्या संसदेचे सर्व बांधकाम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
संसदेच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मोदी सरकारने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलीय. परंतु त्याचवेळी १० डिसेंबरच्या कार्यक्रम करण्यास काही हरकत नसल्याचंही नमूद केलं आहे. तरी कोर्टातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सामान्य जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे - शिवसेना
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया | मुंबईत 23 जागांवर भरती
बँक ऑफ इंडिया भरती २०२०. बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून २३ अधिकारी, सल्लागार पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँक ऑफ इंडिया भरती 2020 साठी 07 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, अर्हता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | RCFL मुंबईत 358 पदांची भरती
आरसीएफएल भरती २०२०. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ३५८ ट्रेड अॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरसीएफएल भरती २०२० साठी ०८ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आरसीएफएल भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना वाढता पाठिंबा | बिथरलेले केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणाले ते शेतकरी खरे नाहीत
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस आणि टीआरएस'चा भारत बंदला पाठिंबा | मोदी सरकारची कोंडी
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जगभरातील सर्वच क्षेत्रातील पंजाबी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगभरातील सर्व क्षेत्रातील पंजाबी लोकं मोदी सरकार विरोधात एकत्र | शेतकऱ्यांसाठी मैदानात
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जगभरातील सर्वच क्षेत्रातील पंजाबी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत बंद’ला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा | शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरणार
मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन देशभर जाणार | एनडीए’तून बाहेर पडलेले पक्ष उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला
‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील सर्वात प्रभावी लस बनविणाऱ्या फायझरचा भारत सरकारकडे परवानगीसाठी अर्ज
युनायटेड किंगडमने (Great Britain Government) त्यांच्या देशात अमेरीकन औषध निर्माती कंपनी फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला (Pfizer Biontech CoronA vaccine) नुकतीच मंजुरी दिली आहे. कोरोना लसीला मान्यता देणारा यूके हा पहिलाच पाश्चिमात्य देश ठरला आहे. त्यामुळे UK मध्ये पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या कोरोना लसीला मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर पॉडक्ट्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (Medicine and Healthcare Products Regulatory Authority) अर्थात MHRA नं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. तसेच बाहरीन देशानेदेखील फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान युकेमध्ये लसीला मंजुरी मिळाल्यानंतर फायझर कंपनीने त्यांच्या कोरोना लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल