महत्वाच्या बातम्या
-
प. बंगाल | भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू - राजू बॅनर्जी
भारतीय जनता पक्षाचे नेते राजू बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर टीका करताना बंगाल पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधानं केलं आहे. “राज्यातील पोलीस आम्हाला मदत करत नाही. जर भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू” असं विधान त्यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं पहाटे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नेशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 70 जागा
एनटीपीसी भरती २०२०: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी / अभियंता पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एनटीपीसी भरती २०२० साठी १२ डिसेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एनटीपीसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा सविस्तर माहिती खाली दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 07 पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार थेट मुलाखतीसाठी हजर राहू शकतात, बीएमसी भरती २०२० साठी २५ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखत घेतली जाईल. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि बीएमसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात सविस्तर दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल
कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा | कराचीचं नंतर बघू | फडणवीसांना टोला
‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
साहेब ६० वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले असते | तर आज खोदकामात बँकांचे अवशेष सापडले असते
देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये वाढते घोटाळे आणि वाढत्या एनपीए’मुळे बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक वळणावर आहे. दुसरीकडे मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला होता. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मोठ्या मुस्लिम नेत्यांनी केलंय लव्ह विवाह | इतरांनी केला तो लव्ह जिहाद
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
यूपीत खळबळ | मथुरेतील आश्रमात २ हिंदू साधूंचे मृतदेह आढळले | विष प्रयोगाचा आरोप
योगी सरकारच्या राज्यात एक खळबळ माजविणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात योगिता सरकार हिंदुत्वाच्या अनेक गप्पा मारताना देशाने पाहिलं आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या इतर राज्यांना भाजपचे नेते हिंदुत्वावरून नेहमीच लक्ष करत असतात. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावरून इतर राजकीय पक्षांना नेहमीच लक्ष करत असतात. मात्र स्वतःची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हिंदुत्वाशी संबंधित घटना घडल्यानंतर भाजपचे नेते शांत असतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा तशीच घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | 'अक्षय नवमी' कधी आहे | काय आहे या दिवसाचे महत्त्व
अक्षय नवमी (Akshaya Navami) म्हणजे आवळा नवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अक्षय नवमीच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय नवमी ही देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार, सतयुगाची सुरुवात अक्षय नवमीच्या दिवसापासून झाली. त्यामुळे या दिवसाला सत्य युग (Satyayuga) असेही म्हणतात. हा दिवस अक्षय तृतीयेसारखाचं (Akshay Tritiya) आहे. असे म्हणतात की, त्रेता युगाची (Treta Yuga) सुरुवातही याच दिवशी झाली होती आणि त्याला त्रेता युग म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस कोणत्याही प्रकारचे दान करण्यास अनुकूल आणि शुभ मानला जातो.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला कंटाळून लोकं काँग्रेसला मतदान करतात | मग काँग्रेसचे आमदार भाजपचं सरकार स्थापन करतात
नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बिहारमध्ये स्थापन करण्यात आलं. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी आई-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Nagrota encounter | २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला
जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या घटनेचं वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं. पण नगरोटा इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता.
4 वर्षांपूर्वी -
डॉक्टरांचा सोनिया गांधींना हवापालटाचा सल्ला | काही दिवस गोव्यात वास्तव्य
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आज गोव्यात दाखल झाले. दिल्लीतली हवेची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हवापालटाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते गोव्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांना दम्याचा त्रास होतो. त्याच बरोबर छातीमध्ये इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे दिल्लीत्या हवेत आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवस दिल्लीबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण | महाराष्ट्रात-दिल्ली प्रवास सेवेबाबत महत्वाचा निर्णय होणार?
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई दिल्ली दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारत डायनॅमिक्स'मध्ये 119 पदांची भरती | ऑनलाईन अर्जाचा शेवटचा दिवस
बीडीएल भरती २०२०. भारत डायनॅमिक्स लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली असून ११९ पदवीधर आणि तंत्रज्ञ अॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीडीएल भरती २०२० साठी ०२ ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि बीडीएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक | डिजीटलपद्धतीने होणार निवड
बिहार विधानसभा निवडणुकीतही (Bihar Assembly Election 2020) मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा (Congress president Selection digitally) निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल | आणि किंमत....
कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस (Coronavirus Vaccine) बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Sirum Institute CEO Adar Poonawalla) यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं पूनावाला यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रावर कोरोनावरून टीका | आता कोरोनामुळे अहमदाबादमध्ये रात्री कर्फ्यूचा निर्णय
देशात मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीचा काळात नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोनाबाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. याचबरोबर करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ४८ हजार ४९३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४५ हजार ५७९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे आरोप | सरकार स्थापनेच्या तिसऱ्याच दिवशी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकताच पार पडलेल्या शपथविधीत जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना ( Education Minister) अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. ६३ वर्षीय जेडीयू नेते डॉ. मेवालाल चौधरी (JDU Education Minister Mewalal Chaudhary Resign) यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक - सर्वोच्च न्यायालय
सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये गुरुवारी म्हटले आहे की, ही तरतूद घटनेच्या संघराज्य वर्णनाशी अनुरूप आहे. तसेच सीबीआयसाठी दिल्लीतील विशेष पोलीस स्थापना अधिनियमात अधिकार क्षेत्रासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दरम्यान, दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा १९४६ च्या सीबीआयचे संचालन माध्यमातून होते. तसेच संबंधित राज्य सरकारची परवानगी सीबीआयला तपासापूर्वी घेणे आवश्यक असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL