महत्वाच्या बातम्या
-
आजचे राशिभविष्य | सोमवार | १२ ऑक्टोबर २०२०
Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल
टीआरपी घोटाळा (Fake TRP Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दुःखद बातमी | २०० कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू
कोरोनाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालून कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनानेच घात केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणाऱ्या ‘आरिफ खान’ यांनी कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून 200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. तसेच 100 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पोहोचविले होते.
4 वर्षांपूर्वी -
तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो यांचा भाजपात प्रवेश
तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणारी महिला सायरा बानो हिने भाजपात प्रवेश केला आहे. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहणारी सायरा बानो हिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपाची सदस्यता घेतली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | केंद्र सरकारच्या नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही | मुलाखत प्रक्रिया रद्द
देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारमधील गट ब (विना-राजपत्रित) आणि गट सी दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रियामध्ये १०१६ पासून मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी असे नमूद केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी कार्ड | पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश रमन्ना यांच्यावर मुख्यमंत्री रेड्डींचे गंभीर आरोप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश एन वी रमन्ना यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांनी सरन्यायाधीशांना या संदर्भात आठ पानांचे पत्र पाठवले आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आरोप केला आहे की, न्यायाधीश रमना टीडीपी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय आहेत व त्यांच्याच इशाऱ्यावरून वायएसआर काँग्रेसचे सरकार पाडू इच्छित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात विद्वेष पसरविणाऱ्या तीन वाहिन्यांना जाहिराती देणार नाही | उद्योगपती राजीव बजाज
समाजामध्ये विद्वेष पसरविणाºया व विषारी वातावरण निर्माण करणाºया तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला बिहारमध्ये बिस्किट निवडणूक चिन्ह | शिवसेनेची तीव्र नापसंती
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Assembly Election 2020 | सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक
बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यात रामविलास पासवान यांचा आकस्मित मृत्यू झाल्याने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता काँग्रेस देखील निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन Steno Grade C व D पदांची भरती
Staff Selection Commission (SSC) has published notification to conduct Computer Based Examination for the recruitment of Stenographer Grade ‘C’ & ‘D’ vacancies. Those Candidates who are Interested to the following vacancy and completed all Eligibility Criteria can read the Notification & Apply Online.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय मुस्लीम जगात सर्वाधिक समाधानी | सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले. ते पुढे म्हणाले,’मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असे भागवत यांनी सूचित केले. भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, असेही भागवत यांनी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरीविरोधी ट्विट भोवलं | कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे कर्नाटकातील कोर्टाचे आदेश
कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्वीटसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले. वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मोदींना कोणतीही समज नाही हे त्यांना सांगण्याची हिंमत आजूबाजूंच्यांमध्ये नाही हाच खरा धोका
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. डेन्मार्कमधील पवनऊर्जा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ऊर्जेबरोबरच ऑक्सिजन आणि पेयजल निर्मितीची सूचना केल्याप्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी यांना ‘समज’ नसल्याची टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जवानांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रक | पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. भारतीय जवानांचा ट्रकमधून जातानाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लष्कराच्या जवानासोबत केला जाणारा दुजाभाव समोर आणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत संबंधित बनावट वृत्त | आज तक'ला दंड तर ३ वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP'ची व्यवस्था ब्रॉडकास्टर मंडळींनी तयार केली | यात सरकारचा हस्तक्षेप नसतो
टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स घोटाळा प्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला Exclusive मुलाखत दिली. टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर (पॉलिटिक्स) नाविका कुमार यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना जावडेकर यांनी सर्व माध्यमांना उद्देशून एक सल्ला दिला. मीडियाने टीआरपीच्या मागे धावू नये, असे जावडेकर म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती ISI'ला दिली | एटीएसकडून एकाला अटक
पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे.नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस माहिती पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एनडीएच्या अडचणी वाढविणार | सविस्तर वृत्त
महाराष्ट्र निवडणुकीनंतर एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने आता बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेण्याचे ठरवले आहे. यामुळे एनडीएतील भाजप आणि जनता दल बिहार निवडणुकीत एकेकाळी ‘एनडीए’ सहभागी असलेल्या शिवसेनेनंही एन्ट्री घेतलीय. बिहार विधानसभेच्या रणसंग्रामात शिवसेनेचे ५० उमेदवारी रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील बिहारमध्ये दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांची एक यादीही निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
RBI आणि World Bank'चा अंदाज जवळपास सारखा | भारताचा GDP ९.५ टक्क्यांनी घसरणार
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास म्हणाले. तसंच आगामी काळातही महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून करोना महासाथीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडणार होती. परंतु गणसंख्येअभावी ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS