महत्वाच्या बातम्या
-
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bihar Assembly Elections 2020 | बिहारमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर
निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होईल. यापैकी पहिल्या टप्प्यांत ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ तर तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघात अनुक्रमे २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. यानंतर १० नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होईल.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | UPSC पूर्व परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता | सुनावणी २८ सप्टेंबरला
UPSC Civil Services Prelims 2020 Exam Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या तारखेत कदाचित पुन्हा फेरबदल होऊ शकतो. परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने एका याचिकेसंदर्भातील सुनावणीच्या वेळी आयोगाला आपले म्हणणे दाखल करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Couple Challenge | घरातील महिलांचे फोटो शेअर करणं टाळा | ठरू शकतं धोक्याचं
सध्या सोशल मीडियावर हौशी लोकांनी बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पिक्स चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज अशा विविध टॅगलाइनखाली फोटो शेअर करून व्हॉट्सॲप, फेसबुकवर लाइक, कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमध्ये करायचं काय, हा प्रश्न अनेकींना सतावत असल्याने अनेक महिलांनी अतिउत्साहाने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. मात्र, विविध लूकमधील हे फोटोच मॉर्फिंगसाठी (संगणकावर बदल) टार्गेट होत असल्याने सायबर चोरट्यांना संधी चालून आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आसाम पोलीस भरती परीक्षा पेपरफुटी | भाजप नेत्याचं नाव येताच राज्य सोडून पलायन
आसाम पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर राज्यातील वरिष्ठ भाजपा नेते दिबान डेका यांना आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. हेच कारण देत त्यांनी गुरुवारी आपण राज्य सोडलं आहे असं जाहीर केलं आहे. डेका यांनी कोणत्याही क्षणी माझी हत्या केली जाण्याची भिती वाटत होती असंही म्हटलं आहे. माझ्याविरुद्धात कट रचण्यात आला असून यामध्ये आसाम पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ भ्रष्ट अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असा आरोपही डेका यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन
संसदेत विरोधकांचा विरोध डावलून सविस्तर चर्चा न करताच संमत करण्यात आलेली कृषी विधेयके मोदी सरकारच्या अंगाशी आलेली दिसत आहेत. या तीन कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंद आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात भारतीय शेतकरी युनियनसहीत वेगवेगळ्या शेतकरी संघटना सामील झाल्या आहेत. देशभर चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये ३१ संघटनांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही आधी हात जोडत होतो | आता दिल्ली हादरवू | हरसिमरत कौर संतापल्या
नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २५ सप्टेंबर २०२०
All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today.
4 वर्षांपूर्वी -
उद्या भारत बंद | शेती विधेयक विरोधात देशभरातून शेतकऱ्यांचा संताप | शेतकरी संघटना आक्रमक
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे पारीत केलेल्या कषी बिल (Central Government Farm Bills) विरोधात देशभरात आवाज उठवला जात आहे. संसदेमध्ये या बिलास विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएतील काही घटकपक्षांनी विरोध दर्शवला. तरीही ही शेती विधेयक संसदेत सरकारने मंजूर केली. आता या बिलाचा विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या बिलाला विरोध करण्यासाठी 25 सप्टेंबरला म्हणजे उद्याच ‘भारत बंद’ (Bharat Bandh) घोषीत करण्यात आला आहे. उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरीही सहभागी झाले आहेत.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ही बंदची हाक दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक | दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिलेचं लैंगिक शोषण
उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्य सोडून बाकी सारं खोदून काढ असे आदेश | महिला पत्रकाराने Republic TV का सोडलं?
सध्या अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीवर सुशांत सिंह राजपूत प्रकरण जोरदारपणे दाखवले जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये ‘सत्य सोडून बाकी सारं’ दाखवलं जात असल्याचा आरोप करत महिला पत्रकाराने राजीनामा दिला आहे. काय म्हटलंय या पत्रकारान
4 वर्षांपूर्वी -
कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सुशांत प्रकरणात NCB ने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही नावं ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कामगार कायद्यातील बदल | कामगारांना नोकरीवरून काढल्यावर संप करणं कठीण होणार
मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण | हेच आहे मोदीजींचं शासन - राहुल गांधी
मोदी सरकारनं महत्त्वाच्या कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडलं होतं. हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून, तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले असून ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी
मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड आला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे स्पष्ट झाले आहे. फुलप्रूफ सिस्टममध्ये सुद्धा लोक घोटाळा करू शकतील, असा विचारही कोणी करू शकणार नाही. ज्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan samman nidhi Scheme) अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यावेळी अपात्र म्हणजेच बनावट लोकांची आकडेवारी पाहून सरकार सुद्धा आश्चर्यचकित झाले.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | CFSL अहवालानंतर विरोधक तोंडघशी पडणार? | सविस्तर वृत्त
अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. जस्टीस फॉर सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय स्थिती अजूनच तापल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
देशातील मृतांची संख्या लाखाच्या जवळपास | 24 तासांत 1,129 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार २४ तासांत ८६ हजार ५०६ लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा ५७ लाखावर पोहोचला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | गुरुवार | २४ सप्टेंबर २०२०
All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today.
4 वर्षांपूर्वी -
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन | मोदींकडून शोक व्यक्त
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020: सनरायझर्स हैदराबादला धक्का | अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल