महत्वाच्या बातम्या
-
आजचे राशिभविष्य | गुरुवार | २४ सप्टेंबर २०२०
All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन | मोदींकडून शोक व्यक्त
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
IPL 2020: सनरायझर्स हैदराबादला धक्का | अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने शेजारी राष्ट्रांसोबत निर्माण केलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले | शेजारी सर्वत्र शत्रू
कोरोना व्हायरस, देशातील परिस्थिती, भारत-चीन तणाव, अर्थव्यवस्था, कृषि विधेयके यासह विविध मुद्दयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
टाइम मॅगझिन जगातील १०० प्रभावशाली व्यक्ती | मोदी, आयुष्मान खुराना बिल्किस यांचा समावेश
अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मॅगझिनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत समावेश करण्यात आला आहे. या यादीत असलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये बॉलीवुड अॅक्टर आयुष्मान खुराना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनात भाग घेणाऱ्या बिल्किस यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. (TIME 100 Most Influential List)
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करणारे बिहारचे DGP निवडणुकीच्या रिंगणात
बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या वतीने राज्यपालांनी पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२४ तासांत ८३,३४७ नवे कोरोना रुग्ण | तर १,०८५ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | RR vs CSK | राजस्थानला धक्का | संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | UPPSC Prelims Exam 2020 | RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली
UPPSC अर्थात, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या RO, ARO या दोन पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 20 सप्टेंबर 2020 ला झालेल्या पुनरावलोकन अधिकारी (Review Officer) आणि सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी ( Assistant Review Officer) या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची विद्यार्थ्यांना uppsc.up.nic.in. या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील किंवा आक्षेप असतील तर ते देखील नोंदवू शकतात. 13 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 20 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी कोणतंही विशिष्ट कारण देण्यात आलं नव्हतं.
5 वर्षांपूर्वी -
अत्यावश्यक वस्तू विधेयक मंजूर | यापुढे डाळी, तेल, कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीत
अत्यावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक (Essential Commodities Act) मंजूर करण्यात आलं. त्यामुळे गेल्या 65 वर्षांपासून असलेला कायदा बदलला आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर आता अन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल, यासारख्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत राहणार नाहीत. त्यामुळे त्यावरचे निर्बंध आता राहणार नसून शेतकरी आपला माल त्याला वाटेल त्या बाजारपेठेत विकू शकणार आहे. लोकसभेत 15 सप्टेंबरला हे विधेयक मंजूर झालं होतं. आज राज्यसभेत त्याला मंजूरी मिळाली असून कायमद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५०८३ नवे रुग्ण | १०५३ रुग्णांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडणाऱ्या भारताला मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसानंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजाराहून खाली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५०८३ रुग्ण मिळाले आहेत. तर १०५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५,६२, ६६४ इतका झाला आहे. यापैकी ९,७५,८६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४४,९७,८६८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देश शेतकऱ्यांच्या शेतमालावर निर्भर असतो | अनुपम खेर यांचे बळीराजालाच आत्मनिर्भरतेचे धडे
केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयकं मांडली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं ही विधेयकं सोमवारी लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. मात्र या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे. या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरुद्ध’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. मात्र बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या विधेयकांचं कौतुक केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उपसभापतींच्या गांधीगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
राज्यसभेतील निलंबित आठ खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदरांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशीभविष्य | मंगळवार | २२ सप्टेंबर २०२०
दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं 70 वर्षांत काहीच केलं नाही | तुम्ही विकताय ते तुमच्या आजीनं हुंड्यात आणलेलं का?
गेल्या काही महिन्यांपासून देशात खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. विमानतळं, रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करण्याचे निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारी कंपन्यांना खासगी हातांमध्ये सोपवण्याची आवश्यकता काय, असे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या
RRB NTPC Recruitment 2020 कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात जगभरात चहूकडे आर्थिक मंदी आहे आणि लाखो लोक आपल्या नोकऱ्या गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच सुरक्षित आणि सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. आपणही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. RRB NTPCच्या ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण याचे तपशील मिळवू शकता.
5 वर्षांपूर्वी -
WhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअॅप आता ते बीटा अॅपसाठी जारी करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यसभेत गोंधळ | आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई
कृषी विधेयकांवरुन रविवारी राज्यसभेत अभूतपर्वू गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि प्रचंड गदारोळात आवाजी मतदान घेत दोन्ही कृषी विधेयकं मंजूर करुन घेण्यात आली. राज्यसभेतील विरोधी पक्ष सदस्यांकडून वेलमध्ये उतरुन करण्यात आलेली घोषणाबाजी तसंच नियमपुस्तिका फाडण्याचा प्रयत्न याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी रविवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यानंतर आठ सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपसभापींसोबत केलेल्या गैरवर्तनासाठी एका आठवड्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
FinCEN Files | भारतासह जगभरात राजकीय भूकंप होणार | १९९९ ते २०१७ मधील घोटाळे-अफरातफर
घोटाळे, अफरातफर आणि करचोरीच्या माध्यमातून देशात झालेल्या तब्बल दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या Y Plus सुरक्षेत कंगना आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला असताना व हे आंदोलन चिघळत चालले असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याने ती चांगलीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP