महत्वाच्या बातम्या
-
कुरुक्षेत्र येथील शेतकऱ्यांच्या मोर्चावरील लाठी हल्ला भोवणार | जेजेपी भाजपवर नाराज
१० सप्टेंबररोजी, कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शेतकरी कृषी विधेयकाविरोधात मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईत बरेच शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत सरकारवर हल्ला चढविला. हरियाणात जेजेपी भाजपासोबत सत्तेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे जेजेपी आमदारांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. त्यात हरसिमरत यांनी आपली खुर्ची सोडल्याने दुष्यंत चौटाला यांच्यावरील दबाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले, अनेकांवर टीका केली, अनेक वादग्रस्त वक्तव्यही तिनं केली. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही तिनं लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेनं तिचं ऑफिस पाडल्यानंतर तर ती अधिकच संतप्त झाली आणि तिने एकामागो एक अशा ट्वीटची मालिका सुरूच ठेवली.
5 वर्षांपूर्वी -
आम्हाला NDA तुन बाहेर पडण्यासाठी भाग पाडलं | शिवसेना बाहेर पडताच NDA विस्कळीत झाली
शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासात ९६,४२४ नवे कोरोनाबाधित | तर ११७४ रुग्णांच्या मृत्यू
भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
थाळी वाजवणं, दिवे लावण्यापेक्षा कोरोना योद्ध्यांची सुरक्षा व सन्मान महत्वाचा - राहुल गांधी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे करोनाची लागण झालेल्या, तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही. जे पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत मागणी करतात त्यांची माहिती राष्ट्रीय स्तरावर ठेवली जात असल्याची माहिती,” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी दिली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमच्या राज्याबद्दल कोणीही काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का | प्रफुल पटेल यांचा संताप
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केली आहे. राज्यातील करोना स्थितीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंविरोधात लिहिणाऱ्यांवर राज्यात अत्याचार | भाजपचं शिष्टमंडळ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे
भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभा सदस्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एचएल दत्तू यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत भाजपा खासदारांनी राज्यातील ८ घटनांचा हवाला देत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत | जे आता पुन्हा सन्मान मिळवू शकणार नाहीत - सोनू सूद
कंगना रानौत सध्या लहान मोठ्यांपासून सर्वांनाच लक्ष करून अत्यंत संतापजनक ट्विट करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.
5 वर्षांपूर्वी -
कंगना बरळली | उर्मिला स्पॉट पॉर्न स्टार | उर्मिलाचं संयमी प्रतिउत्तर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.
5 वर्षांपूर्वी -
GDP घसरलाय, RBI कंगाल झाली आहे | आणि सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावलाय
खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत याबाबत प्रश्न विचारुन मोदी सरकारला धारेवर धरत याप्रश्नी आवाज उठवला. जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटले आहे. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
5 वर्षांपूर्वी -
आज मोदींचा वाढदिवस | समाज माध्यमांवर राष्ट्रीय बेरोजगार दिन ट्रेण्डमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशीभविष्य | गुरुवार | १७ सप्टेंबर २०२०
दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.
5 वर्षांपूर्वी -
रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस | भारतीय कंपनी बरोबर करार
रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे १० कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही | RBI गव्हर्नर
अर्थव्यवस्थेनं अद्यापही गती पकडलेली नसून ती हळूहळू रुळावर येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी दिली. रिझर्व्ह बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या उपलब्धतेमुळे सरकारला कमी दराने आणि कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळात मोदी सरकारचा खयाली पुलाव | राहुल गांधींकडून यादी
देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 50,20,360 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात
बँक ऑफ इंडीयाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासात ९० हजार १२३ रुग्णांची नोंद | १२९० रुग्णांचा मृत्यू
सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत देशात कोरोनानं 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 85 ते 95 हजार नवीन लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 50 लाख पार झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती
भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अरब डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती
सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०
दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL