महत्वाच्या बातम्या
-
गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष | संरक्षण मंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत – चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. ‘सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र (Time Tested Mechanism) आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा त्यांना संदेशही दिला’ असं राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये भारताची ३८ हजार स्क्वे किमी जमीन चीनच्या ताब्यात | मोदी सरकारची कबुली
भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत निवदेन सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असंही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय | बच्चू कडुंचा संतप्त सवाल
केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्यांनी इंडस्ट्रीत नावं कमावली | त्यांना गटार म्हटलं जातंय | जया बच्चन संतापल्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाटच सोशल मीडियावर उसळली. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला. याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
देश को बिकने नहीं दूंगा?....मोदी सरकार ६ कंपन्यांना टाळं ठोकणार
सरकार धोरणात्मक भागभांडवल विक्री आणि अल्पसंख्याक भागभांडवलातून निर्गुंतवणुकीच्या धोरणाला चालना देत आहे, अशी माहिती सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी दिली. ठाकूर म्हणाले की, एनआयटीआय आयोगाने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याआधारे 2016पासून सरकारने 34 प्रकरणांत धोरणात्मक निर्गुंतवणुकीस तत्त्वत: मान्यता दिली आहे, यापैकी 8 प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. 6 सीपीएसई बंद करणे आणि खटला चालविण्याबाबत विचार केला जात आहे आणि उर्वरित 20मध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया विविध टप्प्यांत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ सप्टेंबर २०२०
Horoscope Tuesday 15 September 2020 moon sign Marathi News LIVE latest updates
4 वर्षांपूर्वी -
तरुणांना बॉलिवूडची कोडी सोडवण्यात रस | त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष - चेतन भगत
देश सध्या अतिशय मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र या संकटाकडे देशातील तरुणांचं लक्ष नाही. नागरिकांनी अशाच प्रकारे देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लत्र केल्यास देशाची अवस्था आणखी बिकट होईल, असं मत प्रसिद्ध लेखक चेतन भागात यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि त्याकडे जनतेचं होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी | थेट मुलाखत | लेखी परीक्षा नाही
सरकारी नौकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी आहे. स्टील ऑथॅरिटी ऑफ इंडियाने बऱ्याच पदांवर भरती करण्यासाठीचे अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की या पदांसाठी केवळ पात्र असलेल्या नर्सच आवेदन करू शकतात. दुर्गापूर स्टील प्लांट च्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
DRDO | पुढचं लक्ष्य लेझर वेपन | मिसाइलशिवाय फायटर जेट नष्ट करणार तंत्रज्ञान
हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. डीआरडीओ एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळतेय | सुप्रिया सुळेंचा घणाघात
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यामध्ये महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. त्यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान म्हटले की, सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि बेरोजगारी हे आपल्या देशासमोरील प्रमुख मुद्दे आहेत. आपण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच या मुद्द्यांवरील चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव स्वतःच वाचवा | पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत ९२,०७१ नवे रुग्ण | ११३६ रुग्णांचा मृत्यू
सलग पाचव्या दिवशी आज 90 हजारहून नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 79 हजार 722 झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 लोक निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भारतातील तब्बल १० हजार प्रमुख व्यक्तींवर चीनची पाळत | कंपनीच्या माध्यमातून पाळत
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनकडून भारताविरुद्ध सायबर युद्धाच्या हालचाली सुरु आहेत. त्यासाठी चीनमधील झेन्हुआ या कंपनीकडून भारतातील जवळपास १० हजार नामवंत व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवली जात आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुरत साडी बाजार | ऑनलाईन सेल | अभियानाचं केंद्र गुजरात असल्याची चर्चा
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
एमपीत भाजप नेत्याने लष्करातील जवान अंशू तोमरला पळवून पळवून गोळ्या घातल्या होत्या
नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल एक कार्टुन फॉरवर्ड केल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. कांदिवली येथे राहणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. शिवसैनिकांनीच आपल्या वडिलांना मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही मुलीने केली होती.
4 वर्षांपूर्वी -
आज देशभरात NEET'ची परीक्षा | सोशल डिस्टंसिंग नियम पाळावे लागणार
अनेकदा परीक्षा रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर ‘NEET’ची परीक्षा होत आहे. देशभरातील जवळपास १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी NEETच्या परीक्षेस बसले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून दिल्लीमध्ये सकाळी ६ वाजेपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेनने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेने सांगितंल आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगना म्हणालेली मी बीफ खाल्लं, मला ते खूप आवडलेलं | संकट येताच राणी लक्ष्मीबाईचा कांगावा
२०१९ मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरसोबत कंगनाचा वाद विकोपाला गेला होता. आणि आदित्य पंचोली सोबतही वाद तीव्र झाला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर नेटिझन्सनी कंगनाला मोठ्या प्रमाणावर कंगनाला लक्ष करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी एका नेटिझन्सने तिला झोडपताना तिच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी केवळ मांसाहारीच नाही तर गोमांस खाणारी देखील आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही असं तिनं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बॉलीवूड संबधित पोर्टल्सवर याची जोरदार चर्चा देखील रंगली होती.
4 वर्षांपूर्वी -
स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी
अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये पत्रकार परिषद | सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही - फडणवीस
अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.
4 वर्षांपूर्वी -
ड्रग्ज कनेक्शन चौकशीत अडकण्यापूर्वीच कंगना रानौत कुटुंबासहीत भाजपमध्ये दाखल होणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH