महत्वाच्या बातम्या
-
स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लस प्राण्यांवरील चाचणीत यशस्वी
अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांप्रमाणे भारतानेही करोना व्हायरसला रोखण्यासाठी स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी लशीची निर्मिती केली आहे. सध्या देशभरातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हॅक्सीन लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये पत्रकार परिषद | सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही - फडणवीस
अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग्ज कनेक्शन चौकशीत अडकण्यापूर्वीच कंगना रानौत कुटुंबासहीत भाजपमध्ये दाखल होणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कंगनासोबत विमानात एवढे पत्रकार | सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर | DGCA'ने अहवाल मागवला
९ सप्टेंबर हा इंडिगो एअरलाइन्ससाठी एक व्यस्त दिवस होता, कारण कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा विमान उड्डाण घेणार होते. तसेच याच विमानातून पद्मश्री कंगना रनौतही चंदीगडहून मुंबईला प्रवास करणार होती. तर या विमानाने उड्डाण घेतले आणि मीडियाने कंगनाचा पाठलाग करायला सुरुवात केली. या उड्डाणादरम्यान विमानात अनेक मिडियाचे लोक होते. या लोकांच्यामुळे विमानात माजलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता Directorate General of Civil Aviation ने घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोकडे जाब मागितला आहे. या व्हिडिओंमधून दिसत आहे की, फ्लाईटमध्ये अनेक मीडिया संस्थांचे कर्मचारी हजर आहेत व ते कशाचाही विचार न करता त्यांचे रिपोर्टिंग करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारताचा आर्थिक विकास तब्बल ११.५ टक्क्यांनी घटणार | मूडीजचा अंदाज
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये जून महिन्यात घट केली होती. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग यापूर्वीच बीएए ३ केली होती.
5 वर्षांपूर्वी -
PM किसान सन्मान निधी योजना घोटाळा केंद्राच्या सेल्फ रजिस्ट्रेशन पर्यायामुळे झाला - तामिळनाडू सरकार
मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड आला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू सरकारने हा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये तब्बल ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याअंतर्गत ११० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊत Vs रानौत प्रकरण | संजय राऊतांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी कोलकाता येथील रहिवाश्याला अटक केली आहे. आरोपी पलाश बोस हा दक्षिण कोलकाता येथील रहिवासी आहे. त्याने कंगना रणौत हिचं समर्थन करत संजय राऊत यांना धमकी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर | एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढातना दिसत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ वर पोहोचली आहे. देशात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.
5 वर्षांपूर्वी -
JEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर
जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.
5 वर्षांपूर्वी -
चीनने आपली जमीन बळकावली आहे | ही सुद्धा देवाची करणीच का - राहुल गांधी
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही | शिवसेना भेकड आणि घाबरट आहे | उद्धव ठाकरेंवर प्रहार
माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.
5 वर्षांपूर्वी -
राजकीय विकृतीचा कळस | उत्तर प्रदेशात उद्धव ठाकरे आणि राऊतांवर पोस्टरबाजी
कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेकडून आता पडदा टाकण्यात आला असला तरी याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. अनेक भाजपशासित राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशातूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लक्ष करताना विकृतीचा कळस गाठला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - अमित शाह यांची ऋणी आहे | कंगनाच्या आईची प्रतिक्रिया | आम्ही भाजपचे झालो
माझ्या मुलीला म्हणजेच कंगनाला सुरक्षा पुरवल्याबद्दल मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ऋणी आहे अशी प्रतिक्रिया कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी दिली आहे. कंगनासोबत जे काही घडलं ते कुणालाही ठाऊक नाही. महाराष्ट्र सरकारने कंगनाला जी वागणूक दिली ती निषेधार्ह आहे. माझ्या मुलीबाबत म्हणजेच कंगनाबाबत जे शब्द महाराष्ट्रात वापरले गेले त्याचा मी निषेध करते.
5 वर्षांपूर्वी -
हिमाचल प्रदेशात चीनच्या हालचाली | हिमाचलमधील भाजपचा PPE Kit घोटाळा | आणि कंगना
लडाखमध्ये ताबा रेषेवर (LAC) चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर, चर्चा सुरू करून तणाव कमी करण्याचा दिखावा करणाऱ्या चीनने हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून रस्ता तयार केला आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील कुन्नू चारंग हे शेवटचे सीमावर्ती गाव आहे. कुन्नू चारंगच्या ग्रामस्थांनी चीनच्या प्रदेशात रेकी केल्यावर हा दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर सुमारे २० किलोमीटर लांब रस्ता बनवल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे गलवाण खोऱ्यात झालेल्या रक्तपातात भारतच जवान शहीद झाले होते त्यात हिमाचल प्रदेशातील सुपुत्र सेपॉय अंकुश ठाकूर हे देखील शहीद झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८०% रुग्णांना आरोग्याबाबत गंभीर इशारा
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरमजी कृपया जॉब वर फोकस करा | मोदींचं ते ट्विट | आज मोदींचा फोकस कुठे ? - सविस्तर वृत्त
एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीने तरुणांच्या आत्महत्या | सामान्यांची घरं उध्वस्त | गुंतवलं कंगनाच्या घरात
सध्या देशात एकमेव घर किंवा कार्यालय आहे, ज्याची समस्त भारतात चर्चा सुरु आहे. त्या वस्तूवर हातोडा पडल्याने किती लोकं बेरोजगार झाले याची आकडेवारी समोर असली तरी देशातील बेरोजगारी भीषण स्थतीत आहे याबाबत शंका नाही. अगदी भारत सरकारच्या CMIE’ने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्व समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने देश हादरणार | गेल्या २४ तासात ९५,७३५ नवे कोरोना रुग्ण
देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसच्या रेकी काढल्या | ATS'ने तिघांना ताब्यात घेतलं
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
यु नॉटी स्टॉप डेमॉलेशन | भाजपचा शिवसेनेला जोरदार टोला
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात गेला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL