महत्वाच्या बातम्या
-
राज्यात काँग्रेसमधला वाद पेटला | पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे
काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिल्याचं समोर आलं. या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश असल्याचं वृत्त आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कम बॅक राहुलजी | महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं राहुल गांधींना पत्र
काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत | काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्वत:वर कोरोना लशीची चाचणी करायची असल्यास 'या' असतात अटी
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) करोनावरील लशीच्या (corona vaccine) पहिल्या टप्प्यातील मानवी परीक्षणासाठी (human trial of corona vaccine) स्वयंसेवकाच्या शोधात आहे. या परीक्षणात सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही त्या अटी पूर्ण केल्यास तुमच्या इच्छेनुसार करोना लशीची चाचणी तुमच्यावर केली जाऊ शकते. आतापर्यंत या चाचणीत सहभागी होण्याची सुमारे १००० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fact Check | कोरोना लस येत्या ७३ दिवसात भारतात उपलब्ध होण्याचं वृत्त चुकीचं
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस नेमकी कधी येणार याची सर्व नागरिक वाट बघत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
२३ ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र | काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता
मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झालं असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सामान वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला ई-पासची गरज नाही | केंद्राचे राज्यांना निर्देश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना जवानांनी ठार केलं | BSF'ची कारवाई
भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ठार केलं आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत घुसखोर ठार झाले. बीएसएफकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक अशी होणार | ऑनलाइन नामांकन, ग्लव्हज घालून मतदान
कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्स नुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत माहिती
भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे. या वर्षा अखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेल्वेमध्ये ४४९९ पदांवर भरती | कोणतीही परिक्षा न देता भरती | जाऊन घ्या माहिती
रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, आरएसी मॅकेनिक, वेल्डर, प्लंबर, प्रिंटर, कारपेंटर, टर्नर अशा विविध ट्रेडसाठी ही भरती काढण्यात आली असून एकूण जागा आता 4931 झाल्या आहेत. य़ा भरतीची महत्वाची बाब म्हणजे कोणतीही परिक्षा न देता 10 वी पास ते आयटीआय उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून धक्का | 22-23 ऑगस्टला मुंबईतील जैन मंदिरं खुली करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं जैन धर्मियांना कोरोनाच्या काळात दिलासा दिला आहे. येत्या 22 आणि 23 ऑगस्ट या पर्युषण काळातील शेवटच्या दोन दिवसांसाठी श्वेतांबर मूर्तिपूजक ट्रस्टची मुंबईतील मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून एकावेळी केवळ पाच भाविकांना प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हा निकाल केवळ पर्युषणापुरताच मर्यादित असून याचा दाखला देत इतर धर्मियांनी प्रार्थनास्थळं उघडण्याचा दावा करु नये, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारत सरकारकडून कोरोना लस खरेदी करण्याचा विचार | कोणाला प्राधान्य हाच मुद्दा
भारतासह जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यातच ऑगस्टमध्ये कोरोनानं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हर्ड इम्युनिटी आणि कोरोना लस हेच कोरोनाला रोखण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचं याबद्दलचं धोरण वेगवेगळं असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात ९० टक्के रोजगार देणारी असंघटीत यंत्रणाच मोदी सरकारनं नष्ट केली - राहुल गांधी
कोरोनाच्या काळात रोजगार ठप्प झाला आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दिवसांमध्ये संकट अजून गहिरं होणार असून तरुणांना रोजगार मिळणं कठीण होणार आहे असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. पुढील सहा ते सात महिन्यांत देशासमोर रोजगार संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच महेंद्रसिंग धोनीला प्रशंसा पत्र
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मोदींनी जर धोनीला भारताकडून खेळायला सांगितले तर तो नक्कीच पुन्हा ब्ल्यू जर्सीमध्ये दिसू शकतो. त्यामुळे मोदी यांनी धोनीला पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते पाहा…
4 वर्षांपूर्वी -
श्रीराम जन्मभूमी मंदिरच्या निर्माणाला सुरूवात | बांधकामात लोखंडाचा वापर होणार नाही
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोद्धा राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या इंजिनिअर्स मंदिराच्या ठिकाणी मातीची तपासणी करत आहेत. येत्या पुढील तीन ते साडे तीन वर्षांमध्ये राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण केले जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी 36-40 महिन्यांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे.दरम्यान ट्रस्ट कडून अजून एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे या श्रीराम मंदिराच्या कामामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले
बसगाव हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरुवारी आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर त्यांची गाडी अडवली. आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला.
4 वर्षांपूर्वी -
Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
4 वर्षांपूर्वी -
हे संजय! तुमच्या बाजूला बसलेल्या धृतराष्ट्रला सांगा | पुत्र मोहात ते इंद्रप्रस्थ गमावणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
4 वर्षांपूर्वी -
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची यूपीत निर्घृण हत्या | आरोपी डॉक्टर ताब्यात
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS