महत्वाच्या बातम्या
-
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले
बसगाव हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरुवारी आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर त्यांची गाडी अडवली. आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला.
5 वर्षांपूर्वी -
Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर
केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.
5 वर्षांपूर्वी -
हे संजय! तुमच्या बाजूला बसलेल्या धृतराष्ट्रला सांगा | पुत्र मोहात ते इंद्रप्रस्थ गमावणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची यूपीत निर्घृण हत्या | आरोपी डॉक्टर ताब्यात
एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING: सुशांतचे गोड कौटूंबिक नातेसंबंध दाखवण्यासाठी माध्यमांकडून खोटे व्हिडिओ प्रसारित
सुशांतच्या मृत्यूची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे दिली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी रिया चक्रवर्तीने एप्रिलमध्ये सुशांतची बहिण प्रियंकाने तिला विचित्रप्रकारे स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटूंबीयांशी त्याचे संबंध चांगले राहिले नव्हते असा दावा रिया चक्रवर्ती यांनी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
बिहारच्या डीजीपींचा आनंद पाहून ते हातात भाजपाचा झेंडा घेणं बाकी होतं - संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर यावर आता आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऐतिहासिक निर्णय | सरकारी नोकरीसाठी एकच परीक्षा | राष्ट्रीय भरती संस्था स्थापन
युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे - संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय देत, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्यास सांगितलं आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलीस सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करत होतं. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तपास सीबीआयकडे सोपवला जावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सहकारी बँका वाचवा | शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या सहकारी बँकांबाबत पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात भाजपचा मनसेबाणा | राज्यात सरकारी नोकरी फक्त भूमिपुत्रांनाच
मध्य प्रदेशमधल्या शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता सरकारी नोकरी ही फक्त स्थानिक तरुणांनाच मिळेल अशी घोषणा चौहान यांनी केली आहे. लवकरच असा कायदा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हाच भूमिपूत्राचा मुद्दा मांडत असतात. त्यामुळे भाजप सरकारने राज ठाकरे यांच्या धोरणासारखीच ही घोषणा केल्याचं बोललं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला
महाराष्ट्रात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून सुरू झालेला तिढा थेट असून संपला नाही आहे. विद्यापीठाला युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. हा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सुप्रीम कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
PM Cares Fund एनडीआरएफ'मध्ये ट्रान्सफर करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
पीएम केअर फंडमध्ये ( PM Cares Fund ) जमा केलेले पैसे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत. या संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. कोरोना साथीच्या साथीसाठी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड ट्रस्टची स्थापना केली गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ५५,०७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर ८७६ रुग्णांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 55 हजार 79 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27,02,743 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांचा आकडा 50 हजारच्या पार गेला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी मृतांचा आकडा कमी असला तरीही जगाच्या तुलनेत भारतातील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. दिवसभरात 876 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 51,797 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा AIIMS'मध्ये दाखल | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे समजते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन
पंडित जसराज यांचं निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. अमेरिकेत त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती आहे. पं. जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती.
5 वर्षांपूर्वी -
ते दिल्ली बिल्ली तुमची लायकी नाही | कधी एक तरी निवडणूक लढऊन दाखवा - निलेश राणे
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत. त्यातच राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे. नुकताच निलेश राणे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तरीही ट्विटरच्या माध्यमातून सेना नेत्यांना लक्ष्य करायला ते विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला | २ CRPF जवान, SPO शहीद | दहशतवाद्यांचा शोध सुरु
केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाल्याचे वृत्त आहे. बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ५७,९८२ नव्या रुग्णांची नोंद | आजपर्यंत एकूण ५०९२१ रुग्णांचा मृत्यू
भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपासंबंधित पोस्ट आणि त्या भूमिकेवरून फेसबुक'कडून अखेर खुलासा
कोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला होता. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला होता.
5 वर्षांपूर्वी -
माध्यमांच्या भडिमारानंतर फेसबुकने द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या भाजपच्या पोस्ट हटवल्या
द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL