महत्वाच्या बातम्या
-
कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल - राष्ट्रपती
स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं ते म्हणाले. “यावर्षी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे,” असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
कायदेशीर नोटीसनंतर संजय राऊत नरमले | म्हणाले सुशांत आमचाच मुलगा होता
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या जग व्यापणाऱ्या संकटावरही त्यांच्याकडे उपाय असावा. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी ‘वादळी’ मुलाखत त्यांनी घेतली त्यात जागतिक आरोग्य संघटनाही कोरोनासंदर्भात आपला सल्ला घेईल, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारिफ केली होती. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजब वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला | सचिन पायलट यांची पूर्ण साथ
आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. मात्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव भाजपा हरलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
न्यायालय अवमानना प्रकरणात प्रशांत भूषण दोषी | २० ऑगस्टला शिक्षेची सुनावणी
सर्वोच्च न्यायालयानं वकील प्रशांत भूषण यांना अवमानना प्रकरणात दोषी करार दिलंय. त्यांच्या शिक्षेवर येत्या २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी सरन्यायाधीशांवर कथितरित्या आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याला ‘कंटेम्ट ऑफ कोर्ट’ (कायद्याचा अवमान) मानण्यात आलं. या प्रकरणात न्यायपालिकेनं संज्ञान घेतलं होतं. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठानं या प्रकरणात भूषण यांना दोषी मानलंय.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांवर केंद्रीय पातळीवर मोठी जवाबदारी मिळणार | बिहार विधानसभा निवडणूक मुख्य लक्ष
महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन पायलट यांनी घेतली अशोक गेहलोत यांची भेट | काँग्रेसचा मार्ग मोकळा
जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात अशोक गहलोत यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता संजय राऊत यांनीच शांत राहावे, CBI न्याय करेल | भाजपचं प्रतिउत्तर
सुशांतसिंग प्रकरणात सीबीआय काय वेगळा तपास करणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर काही राहिलं असं वाटत असेल तर जगातील कोणत्या संस्थेला तपास द्यावा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख होत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय प्रकरणाला सनसनाटी निर्माण होत नाही असं एक सूत्र झालं आहे. आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. पोलीस जो तपास करत आहेत त्यांना शांतपणे तपास करु देणं हे त्या प्रकरणाच्या आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीने सोयीचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजदीप सरदेसाईंकडून प्रणव मुखर्जीच्या मृत्यूचं ट्विट | नंतर माफी | कुटुंबियांकडून खेद व्यक्त
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना कोरोनाची लागण | मोदींसोबत मंचावर हजर होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला होता. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली होती आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल | नव्या योजनेचं उद्घाटन
स्वातंत्र्य दिनापूर्वी मोदी यांनी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले असून Transparent Taxation – Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची ही योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यापैकी फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा आजपासून सुरु होणार असून फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबरपासून देशवासियांच्या सेवेत येणार असल्याचे मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत आढळले ६६,९९९ नवे रुग्ण | ९४२ जणांचा मृत्यू
देशात कोरोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून दररोज ६० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे - शिवसेना
सामना अग्रलेखातून आज भाजपच्या ऑपरेशन कमळचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. राजस्थानात फसलेलं ऑपरेशन कमळ कसं भाजपच्याच अंगलट आलं याबद्दल सामनातून आज लिहिण्यात आलं आहे. ही राजकिय विकृती असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्रातही पहाटेची ऑपरेशन फसली. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भाजपच्या भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. अशी बोचरी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच थोडे थांबा, आणि पुढे जा… वळणावर धोका आहे असा सबूरीचा सल्लाही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियावरील एका चिथावणीखोर पोस्टने बंगळुरूमध्ये हिंसाचार भडकला
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका चिथावणीखोर पोस्टने हिंसाचार भडकला. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक झालेल्या हिंसाचारात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहेत. बेंगळुरूच्या डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्टेशन भागात बर्यापैकी गोंधळ उडाला. त्यानंतर डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बेंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. दरम्यान, चिथावणीखोर पोस्ट टाकणारा आरोपी नवीनला अटक करण्यात आल्याचं बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत | भाजप खा. अनंत कुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य
केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येत असलेली भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि एमटीएनएल या दोन टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मार्च महिन्यात सभागृहात दिली होती. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्यांचे केंद्र सरकार खासगीकरण करणार असल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन
कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपीपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच प्रसिद्ध गझलकार आणि शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली आहे राहत इंदौरी यांचे पुत्र सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर स्वत: इंदौरी यांनीही याबाबत ट्वीट केले आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजत आहे.
4 वर्षांपूर्वी -
रिकव्हरी रेट वाढतोय, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपले प्रयत्न सफल होत आहेत - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, भारतात कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून ती रोजची संख्या 7 लाखांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाची ओळख होण्यास आणि त्यावर आळा घालण्यास मदत होत आहे. आपल्या देशात मृत्यूचं प्रमाण आधीपासून कमी होतं आणि ते सातत्याने कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. रिकव्हरी रेटही सतत वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यास आपले प्रयत्न सफल होत आहेत, असं मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत सरकारही नाही | सध्या ऑनलाईनच मार्ग
भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. २४ तासांत ५३ हजार ६०१ नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे ८७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा ४५ हजार २५७ वर पोहोचला आहे. देशात सध्या ६ लाख ३९ हजार ९२९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ऐतिहासिक सर्वोच्च निकाल | पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा
आपल्या वडिलांच्या संपत्तीच मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय देत मोहोर उमटवली आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं कोर्टाने स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिसेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस - अदर पूनावाला
कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.
4 वर्षांपूर्वी -
बंडाच्या विमानाचं लँडिंग | सचिन पायलट अखेर स्वगृही परतले
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे प्रकरण निकाली काढल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मुद्दे उपस्थित करणे आवश्यक होते, पदाची तळमळीने नव्हे तर सन्मानाची लढाई. ३२ दिवसानानंतर पायलट अखेर राजस्थानात घरी परतले आहेत. आता पायलट यांचे जयपूरमध्ये आगमन कधी होणार याची उत्सुकता आहे. राजस्थान कॉंग्रेस सांगत आहे की, सचिन लवकरच आपल्या घरी परत येतील.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल