महत्वाच्या बातम्या
-
ऐतिहासिक सर्वोच्च निकाल | पित्याच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा
आपल्या वडिलांच्या संपत्तीच मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा मिळावा या मुद्द्यावर बराच वाद सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आपला ऐतिहासिक निर्णय देत मोहोर उमटवली आहे. यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं कोर्टाने स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
डिसेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस - अदर पूनावाला
कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.
5 वर्षांपूर्वी -
बंडाच्या विमानाचं लँडिंग | सचिन पायलट अखेर स्वगृही परतले
राजस्थानमधील कॉंग्रेसचे संकट संपले आहे. बंडाचे निशाण फडकविणारे सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत काम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे प्रकरण निकाली काढल्यानंतर सचिन पायलट म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मुद्दे उपस्थित करणे आवश्यक होते, पदाची तळमळीने नव्हे तर सन्मानाची लढाई. ३२ दिवसानानंतर पायलट अखेर राजस्थानात घरी परतले आहेत. आता पायलट यांचे जयपूरमध्ये आगमन कधी होणार याची उत्सुकता आहे. राजस्थान कॉंग्रेस सांगत आहे की, सचिन लवकरच आपल्या घरी परत येतील.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित | ८७१ रुग्णांचा मृत्यू
देशात ९ दिवसांनंतर आज कोरोनाचे नवीन कमी रुग्ण सापडले आहेत. गेल्या ४ ते ५ दिवसांमध्ये ६० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला सापडत होते. तर २४ तासात साधारण १००० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हे प्रमाण आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | विशेष ट्रेन्स सुरूच राहणार | एक्स्प्रेस, मेल तसंच लोकलबाबत निर्णय नाही
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पायलट जमिनीवर | राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या भेटीनंतर घरवापसीची शक्यता
राजस्थानात विधीमंडळाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच राजकीय हालचालींची गती वाढली आहे. पक्षासोबत बंडखोरी करणारे सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सांगितले जात आहे की तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक राहिली. अशात सचिन पायलट यांना पुन्हा पक्षात रुजू करण्यामध्ये प्रियांका आणि राहुल गांधी यशस्वी राहिल्याचे संकेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा - भाजपाची मागणी
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय | सलग चौथ्या दिवशी ६० हजारहून अधिक रुग्ण
भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले
आजच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गेहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स
सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर असला तरी त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर आदित्य ठाकरेंविरोधात डिजिटल अभियान जोरदारपणे सुरु झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी २ कोटी रोजगाराची स्वप्नं दाखवून, १४ कोटी तरुणांना बेरोजगार केलं - राहुल गांधी
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा आनंद - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज या योजनेची सुरुवात केली. कृषी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सवलतीच्या कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निधीतून कृषी पायाभूत सुविधा निधीच्या स्थापनेला केंद्राने जुलैमध्ये मान्यता दिली. शेतक-यांच्या उत्पादनांच्या चांगल्या देखभालीसाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा निधी उभारण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 20 लाख कोटींच्या स्वयंपूर्ण पॅकेजदरम्यान ही घोषणा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
स्वच्छ भारत मिशन | देशातून खोटेपणाचा कचराही साफ करायला हवा - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
CBI कार्यरत होण्यापूर्वी | भाजप शासित राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या सुशांतच्या वडिलांशी भेटीगाठी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन राजकीय गदारोळ सुरू असताना सुशांतचे वडील के.के.सिंह यांची आज हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज फरीदाबादमध्ये भेट घेतली. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात | सुशांतच्या वडिलांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मुख्य आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचे दृष्य समोर येत आहे. या प्रकरणी ईडीने रियाची तब्बल ८ तास चौकशी केली. त्यानंतर आता तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईडीकडून शोविकची देखील चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ईडी कडून चौकशी करण्यात ही चौकशी जवळपास १८ तास सुरू होती.
5 वर्षांपूर्वी -
अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराचा शिलान्यास केल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शनिवारी मोदींनी आणखी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे, जी देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवला
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मशिदीच्या पायाभरणीच्या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचा योगीं'वर निशाणा
राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला कोणी बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मशिदीच्या पायाभरणीच्या विधानावरून विरोधकांनी योगींवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ | उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत सुद्धा वाढ
कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमानं हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्हमध्ये स्थान पटकावलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला क्रमांक पटकावून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्याचा मान मिळवला आहे. इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्सने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Mood Of The Nation Survey)
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL