महत्वाच्या बातम्या
-
मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला.
4 वर्षांपूर्वी -
देश संकटात असताना मोदींचं स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या ‘सत्य का सफर: राहुल गांधी के साथ’ या व्हिडीओ सीरीजच्या माध्यमातून देशसमोरील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सीरीजमधील तिसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी भारत-चीन संबंधांबद्दलही भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बेगडी प्रेम सर्वाना माहीत आहे भाजपच्या बेडकांनो - भाई जगताप
भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली.
4 वर्षांपूर्वी -
व्यंकय्या नायडूंना राष्ट्रवादी पक्ष पाठविणार ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेची २० लाख पत्रं
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर ही पत्रं पाठवण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भीषण वाढ! २४ तासांत देशभरात ४५,७२० नवे रुग्ण, तर १,१२९ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असले तरी दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांची उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक
सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचं पत्र दिलं. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केरळात परीक्षा देणारे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; ६०० पालकांविरोधात गुन्हा दाखल
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
विजबिलाच्या वसुलीसाठी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या टीव्ही, फ्रिज, दुचाकी जप्त
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.
4 वर्षांपूर्वी -
वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज - राहुल गांधी
उत्तर प्रदेशात एका पत्रकारावर काही जणांनी गोळीबार केल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली. यात पत्रकाराचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. “वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
IT आणि BPO क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा वाढवली
जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
CBI ला राजस्थानची दारं बंद होताच, अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीचा छापा
राजस्थानमधल्या सत्तेच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेत केंद्राच्या आधीन असलेल्या CBIला राजस्थानची दारं बंद केली आहेत. आता राज्य सरकारच्या परवानगी शिवाय CBIला राज्यात कुठल्याही प्रकारचा तपास करता येणार नाही. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांची खुर्ची डळमळीत झाली असून या काळात केंद्र सरकार CBIचा वापर करून आपल्याला धक्का देऊ शकते अशी शक्यता वाटल्यानेच गेहलोत यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिराचे भूमिपूजन, पण अडवाणी अजूनही आरोपीच...शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणाऱ्यांसाठी श्रद्धांजली ठरेल’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व राज्यांमध्ये गुजरातनेच सत्ता का करावी? फोडाफोडीच्या राजकारणावरून ममतादीदींचा प्रश्न
सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा धार्मिक कार्यक्रमांपासून दूर राहावं
अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्टला भूमिपूजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मंदिर बांधकाम पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील अशी माहिती असली तरी त्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील प्रमुख मारेकरी नलिनी मुरुगण हिने काल संध्याकाळी वेल्लोर तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. वेल्लोर तुरुंगातील एका महिला कैद्याशी भांडण झाल्यावर नलिनी हिने आपल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी चपळतेने हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. नलिनी हिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे वेल्लोर तुरुंगातच नव्हे, तर तामिळनाडूमध्येही खळबळ माजली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सकाळी म्हणाले निमंत्रणाची गरज नाही, आता पत्रं लिहून म्हणतात मुख्यमंत्र्याना निमंत्रण द्या
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
भारतीयांमध्ये कोरोनाशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शकते - डॉ. रणदीप गुलेरिया
जगभरात थैमान घालत असलेलं करोना संकट कधी टळणार? हा प्रश्न पडलेल्या नागरिकांची चिंता वाढावी अशीच आकडेवारी आज समोर आली आहे. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नव्हे तर थेट प्रभू रामचंद्रांना - उमा भारती
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिर झालंच पाहिजे, पण कोरोना आपत्तीत प्रभू रामाच्या प्रजेचा विचार कोण करणार? - राजीव सातव
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS