महत्वाच्या बातम्या
-
राम मंदिर झालंच पाहिजे, पण कोरोना आपत्तीत प्रभू रामाच्या प्रजेचा विचार कोण करणार? - राजीव सातव
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी बलवान असल्याची स्वतःची खोटी प्रतिमा तयार केली - राहुल गांधी
भारत-चीनच्या सीमेवर तणाव सूरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मोदींनी सत्तेत येण्यासाठी बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र हीच बाब भारतासाठी कुमकुवतपणा ठरत आहे’, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.
5 वर्षांपूर्वी -
शाळा कधी सुरु कराव्यात अशी पालकांकडेच विचारणा, जवाबदारी झटकण्यासाठी सरकारी पाऊल?
अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं असून पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी मत मागवण्यास सांगितलं आहे. ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर…कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं तुम्हाला योग्य वाटतं अशी विचारणा पालकांकडे करण्यास सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा - शरद पवार
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचे ट्विटर फॉलोअर्स ६ कोटींच्या पुढे, २०१८ मध्ये ६० टक्के फॉलोअर्स फेक होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. आता त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल 60 मिलिअनच्या पुढे गेली आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतासह संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक लोक ट्विटरवर फॉलो करतात. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.
5 वर्षांपूर्वी -
आरोग्य खात्याकडून कोरोनाच्या नव्या लक्षणांची माहिती - सविस्तर
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या आकडेवारीवर अमेरिकन माध्यमांना शंका
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सध्या ३ लाख ७३ हजार ३७९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपाल आणि गहलोत भेटीमुळे राजस्थानात विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची शक्यता
राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयही वेगाने बदलणार्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहे. गृहमंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेता म्हणतो गोमूत्र प्या कोरोनाला दूर ठेवा, काँग्रेस कार्यकर्त्याचा रम-अंडीचा सल्ला
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत आणि आता देशात समूह संसर्ग सुरु झाल्याची माहिती इंडियन मेडिकल कौन्सिलने दिली आहे. याच दरम्यान भाजपच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत ३८ हजार ९०२ नवे कोरोना रुग्ण, तर ५४३ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल ३८ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला आहे. तर २४ तासांत ५४३ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींची संख्या २६ हजार ८१६ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! भारतात समूह संसर्गास सुरुवात, इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती
गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ६१८ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी दोन तारखांचे पर्याय, पंतप्रधान कार्यालय घेणार निर्णय
अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये शिलान्यासाच्या तारखेबरोबरच मंदिराची उंची आणि मंदिर बांधकामाच्या व्यवस्थांवरही चर्चा झाली. राम मंदिर उभारण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भूमिपूजनानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होईल.
5 वर्षांपूर्वी -
गेहलोत यांना मदत केल्याच्या आरोपानंतर वसुंधरा राजे यांची पहिली प्रतिक्रिया
राजस्थान काँग्रेसने हकालपट्टी केलेले उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बंडावेळी सत्तास्थापनेसाठी चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांचे बंड मोडून काढण्यासाठी राजे यांनीच गेहलोतांना रसद पुरविल्याचा आरोप पायलटांसह एनडीएच्या खासदारानेही केला होता. यामुळे वसुंधरा राजेंना आता बोलावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: शोपियातील चकमकीत ४ अतिरेकी ठार
कोरोनाच्या संकटकाळातही जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. त्यात आज शोपियातील अमशीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या जोरदार चकमकीत ४ अतिरेकी ठार झाले आहेत. या ठिकाणी अद्याप चकमक सुरूच आहे, असे जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ होत असून गेल्या २४ तासांत ३४ हजार ८८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजच्या दिवसातील हा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. नियमित मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने देशभरात आता चिंता व्यक्त केली जात आहे. या नव्या रुग्णसंख्येमुळे देशात सध्या १० लाख ३८ हजार ७१६ एकूण बाधितांचा आकडा पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थानचं भाजप मुठीत घेण्याची मोदी-शहांची खेळी वसुंधरा राजेंनी धुळीस मिळवली? - सविस्तर वृत्त
सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थान सरकार पाडण्याचं षडयंत्र, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजपावर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत राजस्थान सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचं सुरजेवाला म्हणाले आहेत. अशा वेळी त्यांच्याविरोधात त्वरित एफआयआर दाखल झाले पाहिजे आणि अटक करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवालांनी केली आहे. याबाबत SOG’कडे तक्रार दाखल केली आहे. त्याचवेळी कॉंग्रेसने दोन आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन
कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोलामधून ऑनलाईन केले.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशात मागील २४ तासांत ३२ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६वर पोहोचली आहे. तर एका दिवसात ६०६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा २४ हजार ९१५ इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये असाल तर हरयाणातील भाजपाकडून मिळणारं आदरातिथ्य सोडा - रणदीप सुरजेवाला
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN