महत्वाच्या बातम्या
-
कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत
देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णांची अनेक हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आता आणखी एक चित्र समोर आले आहे. हे चित्र तेलंगणातील आहे. तेलंगणाच्या निजामाबाद शहरात कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच नेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मात्र महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थान सरकार पाडण्यासाठी आमदारांना २५ कोटीची ऑफर, भाजप नेत्यांना अटक
मध्य प्रदेशात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी ठरल्यानंतर आता राजस्थानमध्येही तशाचप्रकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाकडून सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्यावर विशेष जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन कोरोना रुग्ण वाढले
देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही. रिकव्हरी रेट चांगला असेल तरी दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाख 20 हजार पार गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं हा चुकीचं निर्णय - राहुल गांधी
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव, २४ तासांत २६,५०६ नवे रुग्ण
देशात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढताना दिसत आहे. भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकास दुबे तर बदमाश होताच, पण पोलीस सुद्धा बदमाश निघाले - प्रकाश आंबेडकर
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला.
5 वर्षांपूर्वी -
गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि गेन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांचे काय? - प्रियांका गांधी
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकास दुबे आणि सरकारचे हितसंबंध उघड होण्याच्या भीतीने गाडी पलटवली - अखिलेश यादव
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
कानपूर हत्याकांडातील कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
ICSE Board - १०वी आणि १२वी परीक्षांचे निकाल उद्याच जाहीर होणार
ICSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवार १० जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे. result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विरोध झुगारून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
बिहारच्या ज्या जिल्ह्यातून रोजगार योजनेचा शुभारंभ..तिथेच मजुरांना काम मिळेना
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर २० जून रोजी सदर योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे - पंतप्रधान
देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानं आज उच्चांक गाठला. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 24 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली.तर, 487 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेसबुक इंस्टाग्रामसह ८९ ऍप डिलीट करण्याचे भारतीय लष्कराचे जवानांना आदेश
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमधील भाजपा नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांकडून गोळ्या घालून हत्या
जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे भाजपा नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करून हत्या केल्याची घटना काल बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. वसीम यांच्या बंदीपोऱ्यातील दुकानाजवळ जाऊन अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
८ पोलिसांच्या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबेला अटक
कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक करण्यात आली आहे. त्याआधी विकासच्या तीन साथीदारांचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तर भारतात प्रतिदिन २ लाख ८७ हजार कोरोना रूग्ण आढळतील - MIT संशोधन
जगात कोरोना विषाणू आणखी भयानक बनला आहे. दररोज सुमारे दोन लाख नवीन रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेत तर परिस्थिती अधिक वाईट दिसत आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे ६० हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जी आजपर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०१३ मधील चीनबद्दलच्या त्या ट्विटमुळे नरेंद्र मोदी अडचणीत..पहा काय होतं ट्विट
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
३० टक्के अभ्यासक्रम कमी करणार ; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN