महत्वाच्या बातम्या
-
उत्तर प्रदेशात पोलीस पथकावर गुंडांकडून अंदाधुंद गोळीबार, ८ पोलिसांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीनमध्ये तणाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेहला अचानक भेट
भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
रशियाकडून ३३ फायटर जेट खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची मजुरी
एकीकडे पूर्व लडाख सीमेवर चीनशी तणातणी सुरू असतानाच भारताने आता रशियाकडून लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी (१२ सुखोई-३०एमकेआयएस आणि २१ मिग-२९) संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. याशिवाय सध्या भारताकडे असलेले ५९ मिग-२९ लढाऊ विमानांचे अपग्रेडेशनही करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्थलांतरित मजुरांच्या हातात फक्त १३% मोफत धान्य, महाराष्ट्र- गुजरातमध्ये १% वितरण
लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये याकरता केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवली जाते आहे. या योजनेअंतर्गत लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. या योजनेचा ८० कोटी नागरिकांनी लाभ घेतल्याचे नुकतेच पंतप्रधानांनी घोषित केले. मात्र मे आणि जून महिन्यात केवळ १३ टक्केच धान्य प्रवासी मजुरांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
प. बंगालच्या प्रचारात Map'वर तोंड बंद, App'वर 'डिजिटल स्ट्राईक'ची भाषणं
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING NEWS - गुगलकडून चिनी Apps केवळ तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार? - शिवसेनेचा टोला
भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक करून चिनी 59 अॅपवर बंदी आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता भारत काही दिवसात रशियाला मागे टाकणार
गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मतदारसंघातील लोकांची भीषण स्थिती मांडताच बंगला खाली करण्याची नोटीस? - सविस्तर वृत्त
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- 35 लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. जवळपास २० वर्षापासून त्या याच निवासस्थानी राहत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चिनी कंपन्यांना महामार्गाचे कंत्राट मिळणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची योजना
चिनची आर्थिक नाडी पकडण्यासाठी केंद्र सरकारने दोनच दिवसांपूर्वी डिजिटल स्ट्राईक करून टिकटोकसह 59 अँपना बंदी आणली. आता केंद्र सरकार कडून आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. त्यानुसार चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतलं जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
एकाबाजूला चीनच्या भारतासोबत बैठका, दुसरीकडे सीमेवर २० हजार जवान तैनात केले
कालच चुशुलमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यासाठी दोन्ही बाजूने सैन्य कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं वृत्त पीटीआयने लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - अतिरेक्यांनी आजोबांना ठार मारलं, आजोबा उठतील याची चिमुरडा वाट बघत होता
जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या मॉडेल टाउनमध्ये आज नाकाबंदी करत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक जवान शहीद झाला असून इतर ३ जवान जखमी झाले आहेत. अतिरेक्यांच्या या गोळीबारात एक नागरिकही ठार झाला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजी दिलबाग सिंह यांनी दिली. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर या संपूर्ण भागाला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घेतला असून त्यांनी अतिरेक्यांविरुद्धची शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुकुल रोहतगी यांच्याकडून टिकटॉकचे वकीलपत्र घेण्यास नकार
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू: CRPF जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद
जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे गस्त घालणाऱ्या CRPF जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफच्या सूत्रांचा हवाला देत एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही इकडच्या तिकडच्या बाता करू नका, मोदींना शायराना टोला
पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपर्यंत राशन मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांनी शेतकरी आणि टॅक्स भरणाऱ्यांचे ही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-१ नंतर बेजबाबदारपणा वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर - ओवेसी
नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार - पंतप्रधान
नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिसतं तसं नसतं म्हणून जग? डेटा सुरक्षाबाबत प्रश्न फेसबुकबाबतीत सुद्धा आहेत...मग?
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण जगभर चर्चा केवळ टिकटॉकवर का रंगली असावी? लडाखचा मुद्दा तर बहाणा ठरला पण तत्पूर्वी कोणता घटनाक्रम घडला होता?
5 वर्षांपूर्वी -
मेक इन इंडियाचा नारा देत चीनसोबत असा व्यापार वाढवला, मोदी सरकारची पोलखोल
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
पतंजलीचा कोरोनिलवरून यू-टर्न, पण फडणवीसांच्या माजी राजकीय सल्लागाराकडून असा प्रचार
प्रत्येकाच लक्ष करोनावरील औषधाकडे लागलेलं असताना बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं मागील आठवड्यात करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर त्यांनी हे औषध बाजारातही आणलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल