महत्वाच्या बातम्या
-
World Population Report 2023 | चीनला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश
World Population Report 2023 | भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारत 142.86 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे आणि चीन दुसर्या क्रमांकावर घसरला आहे. तर, सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवळपास तीन दशके भारताची लोकसंख्या वाढतच राहणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप श्रीसदस्यांचा शिंदे समर्थक आमदाराकडून अपमान, म्हणाले 'दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात'
MLA Sanjay Gaikawad | दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं. सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर सर्वच बाजूने टीका सुरु आहे. उष्मघातामुळे नाही तर चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप देखील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर करण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटकातील PayCM नंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रालयात PayMinisters? लेटरबॉम्बमुळे भ्रष्टाचार उघड
PayMinisters | निवडणुकी दरम्यान कर्नाटकातील PayCM वादानंतर PayMLA बाबत राजकारण तापले आहे. भाजप आमदार मादल विरुपाक्ष यांच्याविरोधात काँग्रेसने ‘PayMLA’ मोहीम सुरू केली आहे. चन्नागिरीचे आमदार विरुपाक्ष आणि त्यांचा मुलगा मादल प्रशांत यांच्यावर लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी बेंगळुरूमध्ये भाजपच्या एका आमदाराचा मुलगा लाच घेताना पकडला गेला होता.
2 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला ते लोकसभा निवडणूक...पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील त्रुटींना पंतप्रधान मोदी जवाबदार, माजी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने खळबळ
General Shankar Roy Chowdhury | माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जवाबदार ठरवले आहे. घातपातामुळे सैनिक शहीद झाले आणि त्यात गुप्तचर यंत्रणेचं म्हणजे एनएसए’चं अपयश देखील तितकेच जवाबदार आहे असं लष्कराचे १८वे माजी लष्कर सेनाप्रमुख शंकर रॉय चौधरी म्हणाले. थेट माजी लष्करप्रमुखांनी मोदी सरकारला जवाबदार ठरवल्याने पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल अडचणीत सापडले आहेत. एकूण मोदी सरकारचा खरा चेहरा उघड होऊ लागला असून सैनिकांचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला गेल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. यामुळे भाजप पक्ष प्रचंड अडचणीत सापडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी शिंदेंचा एक्सिट? योजना तयार, अजित पवार - फडणवीसांची राजकीय विश्वासार्हता संपुष्टात येणार?
Ajit Pawar | भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून उत्तराधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रयत्नांना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमती दिली आहे. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, अशी माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुलवामा हल्ला आणि लोकसभा निवडणूक, यासाठीच मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलेलं, सत्यपाल मलिक यांनी 'तो' व्हिडिओ ट्विट केला
VIDEO | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्मशान शांतता पसरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
श्री सदस्यांच्या मनातील आप्पासाहेब धर्माधिकारींचं स्थान पाहून सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी उपयोग?
11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईच्या खारघर कॉर्पारेट पार्क मैदानात झाला. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली असली तरी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून या घडलेल्या प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, या घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून कडक उन्हाळ्यातील दुपारची वेळ? श्री सदस्यांसाठी कोणतीच सोय नव्हती, पण शिंदे समर्थकांसाठी शाही सुविधा
11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या 11 जणांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांवर कामोठे, वाशी, पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारी (16 एप्रिल) रात्री विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी रुग्णांनी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकारचा गलथान कारभार, ना अंघोळीची व्यवस्था, ना शौचालय, ना पोटात अन्न-पाणी, उष्माघातामुळे 11 श्री सदस्यांचा मृत्यू
11 Die of Heatstroke at Maharashtra | नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास सुरू झाला. यात 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला असून, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उष्माघात झालेल्या काही जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचार घेत असलेल्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. दरम्यान, मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 8 जणांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांची नाव प्रसिद्ध केली आहेत.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजप पराभवाच्या दिशेने सुसाट! लिंगायत समाजाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार काँग्रेसच्या वाटेवर
Jagadish Shettar to Join Congress | कर्नाटकातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा की नाही, याचा निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. यावेळी त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केल्यानंतर शेट्टर यांनी राजीनामा दिला. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे आमदार शेट्टर यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे जाऊन विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असे विचारले असता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार, शिंदेंना बाजूला करण्याची तयारी, अजित पवार मुख्यमंत्री? राज्यात राजकीय त्सुनामी येणार
Ajit Pawar on The Way | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या युतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उत्तराधिकारी बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतराच्या निकालाची टांगती तलवार असल्याने सत्ताबदल ही केवळ काळाची बाब असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची घाई झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा असल्याने पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही असा देखील इंडियन एक्सप्रेसने धक्कादायक खुलासा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Metro Land Scam | शिंदे-फडणवीस सरकारचा 10 हजार कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती
Metro Land Scam | मुंबई कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pulwama Attack | अजित डोवाल यांची चौकशी केली तर पुलवामा हल्ल्यामागील सत्य समोर येईल असं राज ठाकरे म्हणाले होते, आज हिम्मत करतील?
Pulwama Attack | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pulwama Attack | देशात खळबळ! पुलवामा हल्ला आणि 2019 मधील लोकसभा निवडणुक, माजी राज्यपालांनी मोदींबद्दल धक्कादायक माहिती दिली
Pulwama Attack | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Delhi Liquor Scam | दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार, सीबीआयने समन्स बजावले
Delhi Liquor Scam | मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
2 वर्षांपूर्वी -
प्रति वर्ष 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्यात नापास होताच, पोलीस कॉन्स्टेबल ते डाक सहायक नियुक्ती पत्र देण्याचा पीएम मोदींचा मार्केटिंग इव्हेन्ट
PM Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे वाचन देशाला दिले होते. मात्र सत्तेत सलग ९ वर्ष राहूनही मोदी सरकार प्रति वर्ष २ कोटी रोजगार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरताच आता मोदी सरकारने राज्य निहाय अजब रोजगार मेळावे घेण्याचे इव्हेन्ट सुरु केले आहेत. अजब यासाठी म्हटलं, कारण दरवर्षी विविध सरकारी खात्यातील सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवृत्त होतं असतात आणि सरकार त्या रिकाम्या झालेल्या जागा भरत असतं. मात्र हा सरकारी धोरणातून ‘निर्माण’ केलेला रोजगार नसतो तर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाली असलेला जागेवरील सरकारी रोजगार असतो. टीका होऊ लागताच त्याचेच आता रोजगार मेळावे भरवून मोदी सरकार इव्हेन्ट करून ते प्रसार माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी वर्ग करत असल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या बैठकीनंतर भाजपाची चिंता वाढली
Rahul Gandhi Meet Nitish Kumar & Tejasvi Yadav | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आज दिल्लीत विरोधी पक्षांच्या एकजुटीसंदर्भात बैठक झाली. तेजस्वी यादव, मनोज झा यांसारख्या नेत्यांसह नितीशकुमार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले आणि प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. बैठकीनंतर नितीशकुमार म्हणाले की, आमचा प्रचार मोठा असून लवकरच अनेक लोक एकत्र येतील. नितीशकुमार म्हणाले की, आम्ही सर्व मिळून जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. आज आमच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि एकतेची चर्चा निश्चित झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जनतेचा सत्तांतराचा मूड, भाजपच्या पहिल्या यादीनंतर कर्नाटकात माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामा सत्र
Karnataka Assembly Election 2023 | आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ११ विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मण सावदी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उमेदवाराची नावे जाहीर केल्यानंतर डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतले आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजपच्या पराभवाचे साकेत तीव्र होऊ लागले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निवडणुकीत मोदी-शहांचा गुजरात पॅटर्न, पहिल्या उमेदवार यादीत 52 नवे चेहरे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही पत्ता कट
Karnataka Assembly Election 2023 | कर्नाटक निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत असल्याचं निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच म्हटलं जाऊ लागलं आहे. त्याचेच पडसाद तीव्र होताना दिसत आहेत. आज म्हणजे मंगळवारी कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक असताना पक्षात मोठी बंडखोरी झाली आहे. येथे भाजपचे सहा वेळा आमदार राहिलेले आणि मुख्यमंत्री राहिलेले जगदीश शेट्टर यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला आहे. पक्षनेतृत्वाने त्यांना तिकीट दिले जाणार नाही, असे सांगून इतरांसाठी जागा सोडण्यासाठी तयार राहा असं सांगितले आहे. जगदीश शेट्टर २०१२ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपने आजच उशिरा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NCP Party | राष्ट्रीय स्तरावर शरद पवार दिग्गज राजकीय नेते, पण राष्ट्रवादीची घसरण, राष्ट्रवादीची 20 वर्षातील आकडेवारी काय सांगते पहा
NCP Party | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करून मोठा धक्का दिला आहे. यासोबतच आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शरद पवार यांना गोवा, मणिपूर आणि मेघालयमध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा गमवावा लागला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY