महत्वाच्या बातम्या
-
झारखंड राज्यात कोरोनाचा उद्रेक, ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन
झारखंड राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकडाऊन कालावधी फक्त ३० जून होता. राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये परिस्थिती गंभीर, लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना पूर्ण माहिती दिली
चीनच्या मुद्द्यावरुन सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक गंभीर आरोप केंद्र सरकारवर केले होते. आपलं सैन्य चीन सीमेवर विनाशस्त्र का पाठवलं गेलं. हा प्रश्न निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा हवाला देत राहुल गांधींनी उपस्थित केला होता. त्यावरुन भाजपनंही जोरदार पलटवार केला होता.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट दुसरं कोणतरी हाताळतंय? अनेक शंका उपस्थित
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचं कोडं अदयाप उलगडलेलं नाही. ही आत्महत्या नैराश्यामुळे नव्हे तर अन्य कारणामुळे झाली असल्याचा दावा अनेक चाहत्यांकडून केला जात आहे. तर काहीजण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं देखील बोलत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत खळबळजक आरोप केले आहेत. सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत असल्याचा आरोप रूपा यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका माध्यमाने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सॅटेलाईट फोटो, लडाखची लोकं, आर्मीचे माजी जनरलही सांगतात चीनने आपला भूभाग बळकावला
भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.
5 वर्षांपूर्वी -
कानपूर वसतिगृहात ५७ मुलींना कोरोना, तर ५ मुली गरोदर, मुद्दा उचलताच प्रियंका गांधी लक्ष?
मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. प्रियंका गांधी- वाड्रा एका नोटीशीला उत्तर देताना म्हणाल्या की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे, हे माझे काम आहे. कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे माझे काम नाही.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या अध्यक्षांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी चीनची घुसखोरी नाकारली का? - पृथ्वीराज चव्हाण
आज काँग्रेसने देशभरात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली. चीनची घुसखोरी, अतिक्रमण मान्य नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधानांनी का म्हटलं? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी केंद्राच्या सर्व निर्णयांना आम्ही सहकार्य करणार आहे. लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. चीनची घुसखोरी कदापि मान्य नाही.
5 वर्षांपूर्वी -
जेव्हा दिग्गज करोडपती कलाकारांना पेट्रोलचे भाव परवडत नव्हते...ते PR मॅनेजमेंट
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. देशात आज सलग विसाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज डिझले 17 पैशांनी, तर पेट्रोल 21 पैशांनी महागले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८०.१३ रुपये झाले असून डिझेलचे दर प्रति लिटर ८०.१९ रुपये झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीमुळे लष्करातील जात-प्रांत सांगण्याचे प्रकार..शिवसेनेचा आरोप
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खालच्या पातळीवर येऊन टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकरांच्या वक्तव्याशी संबंध नाही हा साळसूदपणचा आव आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहारला वादळाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो
देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सीबीएससीच्या जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द
सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १६,९२२ नवे रुग्ण, तर ४१८ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. गेल्या 24 तासातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या जवळपास गेला आहे. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,105 इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गलवान खोऱ्यातील नदीच्या पुरातून सहकाऱ्यांना वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
पूर्व लडाखच्या सीमेवरुन भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. गलवान खोऱ्यात चीन सैन्यांकडून हिंसक झडप घालण्यात आली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने प. बंगालमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन
देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जारी असताना पश्चिम बंगालमध्ये आणखी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र लॉकडाूनच्या या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पतंजली अडचणीत! कफ व तापाचं औषध म्हणून परवाना घेत, कोरोनावर औषध म्हणून लाँच
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील कोरोनिल औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच मंजुरी - आयुष मंत्रालय
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला. आता केंद्र सरकारने पतंजलीला (patanjali) काल झटका दिला आहे. कोरोनिलची जाहिरात थांबवावी, आधी सविस्तर माहिती केंद्र सरकारला द्यावी असे निर्देश पतंजलीला देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने कोरोना साथ आणि पेट्रोल-डिझेलचे दर 'अनलॉक' केले आहेत - राहुल गांधी
पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सलग १८ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांवर बोझा पडत आहे. दरम्यान, दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचं कोरोनामुळे निधन
देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आमदार तमोनाश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या ६० व्या वर्षी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमोनाश घोष यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनिल'ची जाहिरात थांबवा, केंद्राचा पतंजलीला दणका
जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील औषध (coronavirus medicine) आणि लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात पतंजलीने कोरोनाव्हायरसविरोधात औषध शोधून काढलं आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनिल (coronil) हे औषध आज लाँच केलं. यामुळे कोरोना रुग्ण सात दिवसांत बरा होत असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं व भोंगळ कारभार जबाबदार - सोनिया गांधी
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक घेतली. भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या तणावासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमेवरील तणावाचे मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL