महत्वाच्या बातम्या
-
३ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार, रामदेव बाबांच्या पतंजलीकडून औषध लाँच
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. आज ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध त्यांनी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुलावामा चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, २ दहशवाद्यांचा खात्मा
एकीकडे भारत-चीन सैन्यात तणावाचे वातावरण असताना दुसरीकडे दहशतवादी कुरापत्याही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले. सीआरपीएफ जवान सुनील काळे हे या चकमकीत शहीद झाले. ते सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे रहिवासी होते.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत, लष्करात प्रादेशिकवाद घुसवू नका - जितेंद्र आव्हाड
६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली होती.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check: ती चिमुकली शहीद कर्नल संतोष बाबू यांची मुलगी नव्हे, अभाविप’च्या कार्यकर्त्याची बहीण
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचादेखील समावेश होता. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही शहीद कर्नल बाबू यांचीच मुलगी आहे. फॅक्ट चेकमध्ये याची पडताळणी केली असता, हा दावा खोटा असल्याच समोर आले.
5 वर्षांपूर्वी -
आपल्या सरकारच्या कृती व निर्णयावरून भविष्यातील पिढी आपल्याला ओळखणार - डॉ. मनमोहन सिंग
भारत-चीन हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी, “भारतीय सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही,” असं विधान केलं होतं. या विधानावरुन गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायची वेळी सुद्धा पंतप्रधान कार्यालयावर आली होती. नेमकं सीमेवर काय झालं या बाबत नेमकी माहिती कोणाला माहिती नाही आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं देखीन मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
समाज माध्यमांवरील ऑनलाइन समुदायांच्या द्वेष आणि गुंडगिरीवर रतन टाटांची पोस्ट
समाज माध्यमांवर एकमेकांवर विखारी टिपणी आणि द्वेष वाढविणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. समाज माध्यमांवरील सामान्य वापरकर्ते, सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी अगदी महिला देखील अशा विखारी टीका टिपणीच्या बळी पडत आहेत. यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर फेक अकाउंट बनवून कोणालाही लक्ष करण्याचा प्रकार नवा राहिलेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
लष्करावर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा योग्य माहिती द्या, भावनिक खेळ बंद करा - कमल हसन
अभिनेता आणि राजकीय नेते कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली असून लडाखमधील भारतीय आणि चिनी सैनिकांच्या चकमकीवरुन लोकांच्या भावनांशी खेळू नका असं म्हटलं आहे. लोकांना भावनिकरित्या हाताळणं बंद करा अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले असून चीनचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत आजपर्यंत डॉक्टर, नर्सेससाहित १,२०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२४ तासांत १५,४१३ नवे रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख १० हजार ४६१वर
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने भारतात ४ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख १० हजार ४६१वर पोहोचली असून आतापर्यंत १३ हजार २५४ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी...राहुल गांधींची टि्वटरवर बोचरी टीका
चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नावच बदलून हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवर केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर आता काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत संरक्षण मंत्र्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक
लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.
5 वर्षांपूर्वी -
लडाख सीमेवर चिनी एअर फोर्सच्या हालचाली, फॉरवर्ड एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात - भारतीय वायुदल
लडाखमध्ये भारत चीन सीमेलग चिनी हवाईदलाची हालचाल वाढल्याचे दिसून आले आहे. यानंतर, भारतीय हवाई दलानेही आपल्या फॉरवर्ड बेसेसवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत. आयएएफ प्रमुख एअर चिफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते येथील एअरफोर्स अकॅडमीच्या कम्बाइन्ड ग्रॅज्युएशन डे परेड निमित्त आले होते.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या घुसखोरीसंदर्भात खोटं बोलून नरेंद्र मोदी देशवासियांची फसवणूक करतायंत - प्रकाश आंबेडकर
लडाखच्या सीमारेषेवरील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते, तर मारहाण होऊन जवान शहीद झालेच कसे ? असा प्रश्नही आंबेडकर यांनी विचारला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी नागरिकांची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची प्रथमच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया
सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नेपोटीझ्मवर जोरदार चर्चा रंगतेय. सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, शाहीद कपूर, सैफ अली खान यांच्यावर चहुबाजुनी टीका होतेयं. या सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील फॉलोअर्स कमी झालेयत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोल केलं जातंय. ट्वीटरवर देखील सुशांत सिंह राजपूत नाव ट्रेंड होतंय. या पार्श्वभुमीवर सलमान खान पहिल्यांदाच बोललाय. सुशांतच्या फॅन्सना सपोर्ट करण्याचे आवाहन त्याने आपल्या फॅन्सना केलंय.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का ? - पी चिदंबरम
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ ८ किलोमीटर भागावर कब्जा केला? सविस्तर वृत्त
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्ससंदर्भात भारत चीन दरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
नेपाळचे मंत्री सत्ताधाऱ्यांवर डोळे वटारतात..कृष्णकुंजवर सलाम ठोकतात..काही कळेना
भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या आणि नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. विशेष म्हणजे भारताशी वैर पत्करून चीनशी मैत्री करण्यावर नेपाळने भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनोळखी ई-मेल टाळा, उद्या भारतासह अनेक देशात मोठ्या सायबर अटॅकची शक्यता
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि देशातील काही खाजगी संस्था एका प्रभावी देशाच्या सायबर अटॅकच्या रडारवर होता, असं स्कॉट मॉरिसन यांनी सांगतिले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला देखील स्कॉट मॉरिसन यांनी दिला आहे. याआधी देखील सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनीही दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
ग्लेनमार्क फार्माने कोरोना उपचारासाठी लाँच केले औषध...DCGI'ची मान्यता
कोविड -१९ वरील उपचारासाठी फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोविड-१९ च्या रूग्णांसाठी आहे. तसेच ज्या रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असतील अशा रूग्णांच्या उपचाराकरता हे औषध वापरले जाईल, असे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
घरात घुसून मारेन सांगत सत्तेत, अन जवान शहिद होताच 'घरात कोणी घुसलेच नाही'
भारत-चीन संदर्भातील विषयही सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर भारतात राजकीय वातावरणही तापू लागलं. अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातच, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल