महत्वाच्या बातम्या
-
स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार - पंतप्रधानांची घोषणा
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रश्नाला अमित शहांकडून तो व्हिडिओ ट्विट करून प्रतिउत्तर
गलवान खोऱ्यातील संघर्ष सध्या देशातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा वर्षावच सुरू केला होता. या सगळ्या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दाट वस्तीतील रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये - केंद्राची सूचना
केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनबाबत महत्वाच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये दाट वस्तीतील अशा रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान, खास दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अशा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यापेक्षा रुग्णालय किंवा सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.
4 वर्षांपूर्वी -
जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं? - राहुल गांधीं
भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३७५ जणांचा मृत्यू
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळेल आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या एका दिवसातील संख्यने आतापर्यांतच मोठा उच्चांक गाठल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे. तसंच एका दिवसात ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत - पंतप्रधान
भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
TikTok देशभक्त, चिनी कंपनीच्या लेटेस्ट मोबाइलला तुफान प्रतिसाद
भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी काल (दि.18) भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेला आमदार मतदानासाठी विधानसभेत प्रकटला आणि...
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आज अनेक राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. पण Coronavirus च्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करूनच मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसच्या एका आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Covid-19 पॉझिटिव्ह असतानाही ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले.
4 वर्षांपूर्वी -
मिराज, सुखोई आणि अपाचे हेलिकॉप्टरसह वायुसेना लडाख क्षेत्रासाठी सज्ज
चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) यांनी लडाख, लेह आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला आणि तयारीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स सीमेजवळच्या तळांवर तैनात केले असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारची नाचक्की, रुग्णांच्या कोव्हिड टेस्ट रिपोर्टबाबतच्या त्या निर्णयाला स्थगिती
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच सुप्रीम कोर्टाने आता राज्य सरकारला दणका दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे - राहुल गांधी
गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, “आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर राज्यसभेतही भाजपच्या नेतृत्वाखालील NDA बहुमताच्या जवळ असेल?
देशाच्या 8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, झारखंडमधील 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यापैकी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढाई होणार आहे. या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी जागांचे चित्र आज सायंकाळीच स्पष्ट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १३,५८६ नवे रुग्ण, एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठणार
देशभरात दररोज दहा हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता प्रचंड वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ३३६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा १२ हजार ५७३ इतका झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या करारामुळे जवानांनी लडाखमध्ये शस्त्रांचा वापर केला नाही - केंद्राचं उत्तर
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवले होते ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मणिपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का, राज्य सरकार कोसळणार
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेलं सत्तानाट्य आणि रात्रीत बदललेला राजकारणाचा खेळ अजून जनता विसरलेली नाही. आता त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे ईशान्येकडच्या राज्याने. मणिपूरमधल्या भाजप सरकारला पुन्हा एकदा रात्रीतच धक्का बसला आहे, तेही उपमुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे.
4 वर्षांपूर्वी -
भारताचे २० जवान शहीद झाले तरी भाजपच्या व्हर्च्युअल रॅली सुरू होत्या, टीका होताच बंद
पूर्व लडाखमधील भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना चोख उत्तर देताना भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत. असे असताना भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हर्च्युअल रॅली सुरूच ठेवल्या होत्या. मात्र काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपाच्या या स्वार्थी राजकारणावर कडाडून टीका करताच आज भाजपाने यापुढील व्हर्च्युअल रॅली रद्द केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय जवानांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले - राहुल गांधी
चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेसाठी धोकादायक ५२ चिनी अॅप्सची यादी सरकारकडे
चिनी मोबाईल अँप सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्याच गुप्तचर संस्थांनी प्रत्येकवेळी चिनी अँप विरोधात आगपाखड केली आहे. आता भारतीय गुप्तचर संस्थेनेही भारत सरकारला ५२ चिनी अँप ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच, हे अँप तत्काळ डिलेट मारण्याचे आवाहन वापरकर्त्यांना करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चायनिज खाद्यपदार्थांवर बहिष्कार आणि ते विकणाऱ्या हॉटेलांवर बंदी घाला - आठवले
गलवान खो-यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीयांकडून चीनविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज हाॅटेल आणि खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चीन हे धोकेबाज राष्ट्र असल्याची जोरदार टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY