महत्वाच्या बातम्या
-
कोरोनाचा चिंताजनक रेकॉर्ड; गेल्या २४ तासांत तब्बल १०,९५६ नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी लॅबमध्ये ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, NIV'कडून निगेटिव्ह असल्याचं उघड
देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. या रुग्णवाढीचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे देशभरात कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब्सना परवानगी देण्यात आली. मात्र या लॅब्सचा लुटारूपणा उघड होत आहे. दिल्ली जवळच्या नोएडामध्ये तर एका खासगी लॅबने ३५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
5 वर्षांपूर्वी -
नोमुराच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार भारत ‘डेंजर झोन’मध्ये; पुन्हा लॉकडाउनची शक्यता
जगापेक्षा भारतात प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत कोविड १९ रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे पण लॉकडाऊनच्या साडेपाच आठवड्यांनंतर ३० एप्रिलपर्यंत हीच स्थिती आहे हे लक्षात ठेवा. तथापि, त्यांनी असंही म्हटलं आहे की, अद्यापही आपली मोठी लोकसंख्या धोक्यात आहे, त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात KG ते इयत्ता ५'वीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी
एकिकडे कोरोना विषाणूमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेपासून थेट शिक्षण व्यवस्थेपर्यंत थेट परिणाम होत असतानाच दुसरीकडे या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी म्हणून बहुविध मार्ग अवलंबले जात आहेत. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत सांगावं तर, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनेक राज्यांनी ऑनलाईऩ शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब – इस्त्रो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे मिशन गगनयान मोहिम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता इस्त्रोने वर्तवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता इस्रोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.
5 वर्षांपूर्वी -
राजस्थान: भाजपकडून काँग्रेस आमदारांना आर्थिक प्रलोभन, ACB'त तक्रार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना राजस्थानात मात्र भाजपा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात मश्गुल आहे. राजस्थानमध्ये मोठे आर्थिक प्रलोभन दाखवत काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. तशी तक्रारच राजस्थान विधानसभेचे मुख्य प्रतोद आणि काँग्रेस आमदार महेश जोशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राची दुर्गम भागात मदत पोहोचत नाही, पण भाजपच्या प्रचाराचे LED पोहोचतात
देशावर करोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ येऊ लागल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीतून प्रचाराचा बिगुल फुंकला. आउटलूकनं सूत्रांच्या माहितीवरून दिलेल्या वृत्तानुसार शाह यांच्या या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपानं तब्बल १०,००० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत १२, ३७५ नवे कोरोनाबाधित, ३८८ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ९९९६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ३५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला, 6 टप्प्यात सुरू होणार
कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. आता पुन्हा शाळा महाविद्यालयं सुरु करण्याच्या दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार पाऊल उचलत आहे. केंद्र सरकारनं (NCRT) पालन आणि शिक्षकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं या संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू
देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कोरोनामुळं एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला. याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. ६१ वर्षीय जे अनबालागन यांचा आजच ६२ वा वाढदिवस होता.
5 वर्षांपूर्वी -
काही काम न करता नुसती बडबड करणारे चॅम्पियन परतले, अमित शहांना टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. केंद्र सरकारच्या योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमित शाह यांच्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी उत्तर दिलं असून पश्चिम बंगालला गरज होती तेव्हा कुठे होतात अशी विचारणा केली आहे. फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुगलवर अजूनही वॅक्सीन कधी येणार?, कोणता आजार कोरोना संबंधित आहे? सर्च होतंय
दिवसागणिक देशातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत देशात ९ हजार ९८७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक-१ दरम्यान कोरोना वाढतोय; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली
अनलॉक १ च्या पहिल्या टप्प्यात केंद्राने सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितलं, मात्र गेल्या काही दिवसांत सरकारी कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारने याबाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाही अशांनाच कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत कोरोना कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचा दावा
दिल्लीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कम्युनिटी स्प्रेडची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी म्हटले की, ‘एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे, परंतु केवळ केंद्रच त्याची घोषणा करू शकतो.’
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या रॅलीमध्ये ७२ हजार LED स्क्रीन्स, तब्बल १४४ कोटी खर्च, असा दिला हिशेब
लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील.
5 वर्षांपूर्वी -
सोनू सुदच्या मुद्द्यावरुन राजनाथ सिंह यांचा शिवसेनेवर निशाणा
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारकडून हवी ती सगळी मदत पुरवली गेली असली तरीही असमन्वयामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा आदर्श घ्यावा, अशी टीका केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना प्रकोपाच्या कारणाने या तारखेला शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतू आता यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत. सर्व प्रथम सीबीएसई बोर्डाचे निकाल घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहिष्कार राहिला दूर; चिनी वस्तूंशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही; चीननं भारताला डिवचलं
भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवतायत. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये या संदर्भात वृत्त आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारे ट्वीट मोठ्याप्रमाणावर डिलीट
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा सोनू सुदवर संशय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्तुती
सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC