महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेचा सोनू सुदवर संशय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्तुती
सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी -
पॉझिटिव्ह केसेस वाढत असल्या तरी मृत्यू दराला लगाम घालण्यास यश - डॉ. गुलेरिया
सध्या रोजच जवळपास १० हजार कोरोनाबाधित समोर येत आहेत, यावर गुलेरिया म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या फार अधिक आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. त्यामुळे आपल्याला डेथ रेटवर लक्ष द्यायला हवे. डेथ रेट कमी आणि संख्या अधिक असेल तर, फारसा त्रास होणार नाही. पॉझिटिव्ह केसेस वाढत असल्या तरी घाबरू नका. डेथ रेटला लगाम घालण्यास आपल्याला यश आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईडी'नंतर NIA'च्या कंट्रोल रुममध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ३६ हजारांच्या वर गेला आहे. देशातील प्रमुख राज्यांसह इतर छोट्या-मोठ्या राज्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजंसी (एनआयए) मध्येही कोरोना रुग्ण आढळले असून त्यांच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांत रुग्णालयातून घरी सोडणार
कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेने शनिवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यामुळे आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉकनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; भारताने इटलीला मागे टाकले
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे ईडी'चं कार्यालय सील; ५ अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजकारण तापलं, ज्योतिरादित्य सिंधियांच्या ट्विटवरून 'भाजप' उल्लेख हटवला
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
UPSC परीक्षेचा घोळ मिटला, या तारखेला होणार परीक्षा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व आणि मुख्य परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता, हा संभ्रम दूर झाला असून या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, युपीएससीची पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी तर, मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगातील मोठा पक्ष आजही काँग्रेस नेत्यांच्या फोडाफोडी भरोसे निवडणूक रिंगणात - सविस्तर
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वी राजकीय धक्के जाणवू लागले आहेत. काँग्रेसनं दोन उमेदवार उतरवले असून, भाजपानं तीन उमेदवार दिले आहेत. भाजपानं संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेची खेळी केली आहे. ती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानं राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या ८ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी डॉक्टरांनी मुलीला मोजून ३ मिनिटं दिली
देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण २.८२ टक्के आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलीला अंत्यदर्शनासाठी केवळ ३ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांची नजर घडाळ्यावर होती. तिसरा मिनिट पूर्ण होताच मुलीला घेऊन जाण्यात आलं. ही धक्कादायक घटना मणिपूर इथे घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक १.० : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक १.०: मंदिर आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राची नवी नियमावली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारनं धार्मिक स्थळं, मॉल, हॉटेल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनलॉक सहज घेऊ नका, आज देशात ९ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित
लॉकडाउनचा पाचवा टप्पा आणखी शिथिल केला जात असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण जाले आहे. गुरूवारी देशभरात ९,३०४ नव्या रुग्णांची भर पडली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८५१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० इतकी झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्या क्रमांकात भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.
5 वर्षांपूर्वी -
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. या सर्वांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
होय कोरोना वाढतोय, 'हि' तयारी करावी लागणार; मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात कबुली
केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले. यात, ‘देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर मेकशिफ्ट हॉस्पिटल्स तयार करावे लागतील,’ अशी कबूली केंद्र सरकारने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दररोज वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होत असल्याने सध्या परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मागील २४ तासात देशात ९३०४ कोरोनाग्रस्त आढळून आले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीची माहीती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; मृतांचे प्रमाण २.८० टक्के
कोरोनाच्या रुग्णांमध्ये बुधवारी सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ८,९०९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार, ६१५ झाली आहे. देशातील मृतांची संख्या ५,८१५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे निम्मे म्हणजे १ लाख ३०३ रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस भरवलं, ३ दिवस तडफडून प्राण सोडले
केरळमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली. इथे एका गर्भवती हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. त्या हत्तीणीच्या तोंडात अननसमधील फटाके फुटले आणि तिच्या गर्भात असलेल्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी या हत्तीणीनेही प्राण सोडले. ही हत्तीणी १४ ते १५ वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व आर्थिक स्थितीवरून लोकांना विचलित करण्यासाठी चीन-भारत मुद्याला हवा
एकीकडे कोरोना व्हायरस आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नमस्ते ट्रम्प’साठी आले होते, तेव्हा ‘गोली मारो सालों को’ कानावर पडलं असावं
जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूनंतर जनक्षोभ उसळला असून, अमेरिकेत वर्णद्वेषावरून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसक झालेल्या आंदोलकांना गोळ्या घातल्या पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा