महत्वाच्या बातम्या
-
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळतच गेली. काही दिवसानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते कोमात गेले होते.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
देशातील चौथ्या टप्प्याचा लॉकडाउन येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ३१ मे नंतर यासंदर्भात कोणता निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन आणखी १५ दिवसांनी वाढवावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे .
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महत्वाची बैठक; १ जूनपुढील योजना?
आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि कॉरेंटाईन सुविधा या बाबींची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारच्या पॅनलने मोदी सरकारला लॉकडाऊनबाबत काही शिफारशी केल्या आहेत. यापुढे लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी शिफारस केल्याचं वृत्त ईटीने दिलं आहे. लॉकडाऊन ४ हे ३१ मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच या पॅनलने सरकारसमोर एक्झिट प्लॅन सादर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूसंख्येत भारत चीनच्याही पुढे गेला
चीनपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरस संसर्गाचा परिणाम भारतात वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७४६६ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाची नवीन प्रकरणं अस्तित्त्वात आल्याने देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,६५,७९९ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केरळमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण वाढले, मान्सूनसोबत कोरोनाची दुसरी लाट?
केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवडयात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
युपी सरकारचा यु-टर्न, मायग्रेशन कमिशनमध्ये ती अट समाविष्ट करणार नाही
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमावली तयार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या पुढे कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामागांराच्या सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल.
5 वर्षांपूर्वी -
उपचाराविना बाळाने वडिलांच्या कुशीत प्राण सोडले; यूपीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा
ग्रेटर नोएडातील सेक्टर ३६ मध्ये राहणारे राजकुमार यांच्या मुलाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. मात्र रुग्णालयात सगळीकडे धावाधाव करूनही ते आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. राजकुमार यांनी सांगितले की, ते एका खासगी कंपनीत काम करतात. येथील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे जोरदार ऑनलाईन आंदोलन, ५० लाख कार्यकर्त्यांचा सहभाग
भाजपाच्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ३० मे रोजी भाजप देशभर १००० व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सेस व ७५० व्हर्च्युअल रॅलीज घेणार आहे. त्यापूर्वीच दोन दिवस अगोदर काँग्रेसने त्यांच्या १३५ वर्षांच्या इतिहासातील पहिलेच ऑनलाईन आंदोलन केले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लक्षणं आढळल्याने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्या शरीरात कोविड १९ ची लक्षणे दिसल्यानेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त आहे. पात्रा हे भाजपा प्रवक्त्यांच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून ते सातत्याने न्यूज चॅनेवरील चर्चासत्रात पक्षाची बाजू मांडत असतात.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मीर: सतर्क जवानांनी उधळून लावला पुलवामासारखा मोठा हल्ला
दहशतवाद्यांच्या पुलावामासारख्या हल्ल्याची योजना लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे टळल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामानजीक एका सँट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. दरम्यान, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.
5 वर्षांपूर्वी -
खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचं शुल्क ठरवा; ICMR'चे राज्यांना निर्देश
खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी मोजावं लागणार जास्तीचं शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-पीसीार (The Real Time Polymerase Chain Reaction) चाचणीसाठी आकारलं जाणाऱ्या शुल्काबद्दल धोरणं ठरवण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) राज्यांना दिले आहेत. परिषदेनं सध्या आकारण्यात येणार ४५०० रुपये शुल्कही रद्द केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact-Check: शाळा-कॉलेज सुरु करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची सूचना
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
देशात २४ तासात ६३८७ नवे रुग्ण; तर १७० रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने वाढली आहे. तर एका दिवसांत एकूण १७० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारला घेरणाऱ्या केंद्राची देशातील कोरोना आकडेवारीवरून जगाशी तुलना
जगाच्या तुलनेत भारतातील कोरोनाचे रुग्ण कमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तसंच देशाचा रिकव्हरी रेट हा वाढून आता ४१.६१ टक्क्यांवर आला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपण २१ दिवसांत कोरोनावर मात करू असं मोदी भाषणात म्हणाले होते - राहुल गांधी
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. देशातील विविध राज्यात गेलेले हे मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावी जात आहेत. दरम्यान, या मजुरांचे होत असलेले हाल पाहून काँग्रेसचे नेते राहुल गांधी कमालीचे व्यथित झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारतातला कोरोना व्हायरस शक्तिशाली झाल्याने तरुणांच्या मृत्यूत वाढ - द वॉशिंग्टन पोस्ट
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६ हजार ९७७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत निर्मित कोरोना लस येण्यास कमीतकमी वर्ष लागणार - ICMR
भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून कोरोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत. कोरोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्याने वाढतोय; भारताने इराणला मागे टाकलं
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधारकोठडीपेक्षा भीषण; गुजरात उच्च न्यायालयाकडून ताशेरे
भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत ६७६७ नवे रुग्ण, एकूण रुग्णांचा आकडा १,३१,८६८
आज पुन्हा एकदा भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांनी नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत कोरोनाची ६७६७ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. समोर आलेल्या नवीन प्रकरणांमुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून १,३१,८६८ झाली आहे. शनिवारी कोव्हिड-19 (Covid-19) मुळे १४७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल