महत्वाच्या बातम्या
-
३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, श्रमिकांसाठी अजून २६०० ट्रेन धावणार - रेल्वे मंत्रालय
देशात ४ कोटीपेक्षा जास्त मजूर रोजगारासाठी स्थलांतर करतात. या मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रोज २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या स्थलांतरीतांचे समुपदेशन करून त्यांना श्रमिक ट्रेनने (Shramik Special Train) जाण्याची विनंती करावी अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत, आतापर्यंत २६०० पेक्षा जास्त रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून ३५ लाख स्थलांतरीत (Migrant) आपल्या गावी पोहोचले आहेत. तर आणखी २६०० ट्रेन धावणार असल्याची माहिती आज केंद्रीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडून आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अम्फान चक्रीवादळ : प. बंगालला १, ००० कोटींची तात्काळ मदत, पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: देशांतर्गत हवाई प्रवासाचे आत नवे नियम
कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, भारताला त्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून, सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. रेल्वे आणि विमानसेवाही बंद आहे. पण केंद्र सरकारनं आता २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खबरदारी घेत विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गुरुवारी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोना रुग्णांचा आकडा १.१२ लाखाच्या वर, तर ५,६०९ नवे रुग्ण
जगभरात कोव्हिड १९ मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती ११ व्या स्थानावर आहे.
5 वर्षांपूर्वी -
हवं तर बसवर भाजपाचा झेंडा लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा' - प्रियांका गांधी
उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी सरकारमध्ये ‘लेटरवॉर’ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर कुरघोडी करणारी पत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णाच्या मृतदेहातील व्हायरस बद्दल ICMR' कडून महत्त्वाचा खुलासा
सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या ५ हजार ६११ रूग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकू संख्या आता ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले; पश्चिम बंगाल आणि ओडिशा सतर्क
महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून मंगळवारी दुपारी ते पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकल्याने लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पार, २ आठवड्यात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ
देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आता देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग थांबत नाहीये. परिस्थिती अशी आहे की १२ दिवसातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्ण संख्या एवढ्या लाखांवर असेल; टेस्टची संख्या वाढवणार
भारतात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ओडिशा, प. बंगालला २४ तासात अम्फान या मोठ्या चक्रीय वादळाचा इशारा
भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं १२ तासांत सुपर चक्रीवादळ रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतात एका दिवसात तब्बल ५ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. मागील २४ तासांत भारतात तब्बल ५ हजार २४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. तर मागील २४ तासांमध्ये १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९६ हजार १६९ वर पोहोचली आहे. तर ३६ हजार ८२४ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला - निर्मला सीतारामन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे ही निव्वळ नाटकीपणा असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्या रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
डिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री
आज लॉकडाऊन ३ चा शेवटचा दिवस आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद झाली. याआधी ४ टप्प्यांमध्ये विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांकडून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शहरातील आरोग्यसेवा कमी पडत असताना गाव-खेड्यातही कोरोनाचा संसर्ग वाढतोय
लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे, केंद्राने सहकार्य करावं - राहुल गांधी
लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थिती आणि सरकारचं पॅकेज यावर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये धरसोडवृत्ती, त्यामुळेच कोरोना अधिक वाढला - अमोल कोल्हे
देशातील करोना रुग्णांचा आकडा ८१ हजारहून अधिक झाला असून शुक्रवारी तो ८१,९७० इतका होता. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,९६७ नव्या रुग्णांची भर पडली असून १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू २,६४९ झाले आहेत. जगभरात मृत्यूचे प्रमाण ६.९२ टक्के इतके असले तरी भारतात ते सध्या ३.२३ टक्के आहे. एकूण २७,९२० रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन संपल्यावर कोरोनाच्या समूह संसर्गचा धोका; तज्ज्ञांचं मत
कोरोनामुळे देशात मृत्यूंचा आकडा २६०० पार गेला आहे. तर जगात तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. कोरोना व्हायरस हा केवळ ६० नॅनोमीटर एवढ्याच आकाराचा आहे. तरीही त्याने जगाला बेजार करून सोडले आहे. भारतात केवळ २६४९ लोकांनीच कोरोनामुळे जीव गमावलेला नाहीय, तर ४१८ जण असे आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा ११ मे पर्यंतचा आहे.
5 वर्षांपूर्वी -
मान्सूनचं आगमन ४ दिवस उशिराने, केरळमध्ये ५ जूनला दाखल होणार
उकाड्यानं हैराण झालेले नागरिक आणि बळीराजा भाताच्या पेरणीसाठी मान्सूनची आतूरतेनं वाट पाहात असतो. मान्सून वेळत आला तर शेतीची कामं योग्य मार्गी लागतात. मान्सून येण्यास विलंब झाला तर पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. जून ते सप्टेंबर या कालावधित चांगला पाऊस होणं हे पाणी शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. दक्षिण भारतातून मान्सून उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून ४ दिवस उशिरानं येणार आहे. १ जून ऐवजी ५ जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७८ हजारावर
देशात कोरोनाव्हायरचा कहर सुरुच आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता ७८ हजार ३ झाली आहे. त्यापैकी ४९ हजार २१९ लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण २६ हजार २३५ लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा २५४९ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं – संजय राऊत
सध्या देशावर करोनाचं संकट असून टीका करणं योग्य नाही. संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या निर्णयाचं संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणी केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल