महत्वाच्या बातम्या
-
जून, जुलैमध्ये कोरोना सर्वाधिक धोकादायक असेल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारच्या पुढे गेली आहे. १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र लगेचच कोरोनाची रुग्ण संख्या कमी होणार नाही याबाबत वारंवार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जून, जुलै या महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक धोकादायक असेल, असं वक्तव्य एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
LG Polymers: विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, ७ जणांचा मृत्यू, ५००० जणांवर उपचार सुरू
विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत (LG Polymers) झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टण शहरालगत असणाऱ्या गोपालापट्टण परिसरात ही कंपनी आहे. सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आज पहाटे ही कंपनी (LG Polymers) पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानकपणे विषारी वायूच्या गळतीला सुरुवात झाली. यामुळे अनेक कामगार जागीच बेशुद्ध पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत साधारण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Budh Purnima: बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल - पंतप्रधान
बुद्धपौर्णिमेनिमित्तानं (Budh Purnima) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या (Budh Purnima)जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या पूजा आणि समारंभांचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या पाहता येणार आहे. वेळ, काळ आणि स्थिती बदलली तरीही गौतम बुद्धांनी दिलेला संदेश कायम प्रवाही आहे. संघटनात्मक भावनेतून आपण या महासंकटावर मात करू शकतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा स्वतःची सुटकेस भरतेय
मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका
लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे मोदी सरकार काय करणार? कसं करणार? असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
5 वर्षांपूर्वी -
Elliot Alderson: आरोग्य सेतू अॅप सुरक्षित, भारत सरकारच्या दाव्यावर हॅकर म्हणाला, उद्या भेटू!
कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देणारे आरोग्य सेतू अॅप सुरक्षित असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. एका फ्रेन्च हॅकरने मंगळवारी ‘९ कोटी भारतीयांची माहिती उघड होण्याचा धोका आहे,’ असं ट्विट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. “या अॅपवरील माहितीची चोरी किंवा सुरक्षेसंदर्भात कोणताही गोंधळ झालेला नाहीय. तसेच या हॅकर्सने या अॅपवरुन खासगी माहिती उघड होत असल्याचे सिद्ध केलेले नाही,” असं सरकारने आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा कहर थांबेना; २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ हजार ३९१ वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात १६९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार १८३ लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; JEE, NEET परीक्षांची तारीख जाहीर
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता जेईई मेन्स परिक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई ऍडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परिक्षा ‘NEET’ ही 26 जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात मागील २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३९०० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उतावळ्या तळीरामांची संख्या पाहता कोरोनाची लागण वाढण्याची शक्यता
देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वे मंत्रालय PM केअर फंडाला १५१ कोटी देतं आणि मजुरांवर भाडं आकारातं - राहुल गांधी
केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस करणार मजुरांचा तिकीट खर्च, सोनिया गांधींची घोषणा
केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना सोबतच जगायला शिकावे लागेल; अन्यथा लोकं उपासमार होऊन मरतील
भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील, असे स्पष्ट प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे. ते एका उद्योगपतींच्या वेबिनारला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत देशात कोरोनाचे २६४४ नवे रुग्ण, ८३ जणांचा मृत्यू
दरम्यान, देशातील कोरोनाची ताजी आकडेवारी चिंताजनक असून आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 2644 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ३९९८० लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे.
5 वर्षांपूर्वी -
काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद
भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती. एएआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगभरात लष्कराचा वापर मेडिकल मदतीसाठी; भारतात कोरोना वॅरियर्सला सलामीसाठी होणार
कोरोना साथीच्या या संकटकाळात आपले जीवन पणाला लावल्याबद्दल भारतीय सशस्त्र सेना उद्या रविवारी भारतीय सशस्त्र सैन्याने त्यांच्या शैलीत आभार मानण्याची योजना आखली आहे. यासाठी भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दल जोरदार सराव केल्याचं वृत्त आहे. शनिवारी भारतीय नौदलाच्या जवानांनी मुंबईच्या किनाऱ्यावर कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी सराव केला आहे. विशेष म्हणजे कोणतीही घोषणा न करता मोदी सरकारच्या आदेशाने रचलेला हा तिसरा टास्क आहे जो लष्कराला दिला गेल्याच म्हटलं जातं आहे. परदेशात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराची मदत घेतली जातं असताना मोदी सरकार गरज नसताना हे नेमकं कशासाठी करत आहे ते कळू शकलेलं नाही. त्यात हे खर्चिक असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूमुळे २० दिवसाच्या बाळाचा मृत्यू; जगातील कमी वयाचा रुग्ण
राजस्थानच्या जयपूरमध्ये कोरोना संबंधित दुःखद घटना घडली आहे. येथे कोरोना विषाणूमुळे एका २० दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. जयपूरच्या चांदपोल भागात, कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसताच शुक्रवारी एका २० दिवसाच्या मुलाला जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहेत. या निरागस बाळाचा त्याच दिवशी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत एकाच इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा
दक्षिण-उत्तर दिल्लीतील डीएम ऑफीसकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे तीनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यावर परिसर सील करण्यात येतो. मात्र येथे असलेल्या दाट लोकवस्तीमुळे एक रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
कामगार महाराष्ट्रातून युपीला बसेसनं घरी; ७ जणांना कोरोनाची लागण
उत्तर प्रदेश सरकारनं विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवलं होतं. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल