महत्वाच्या बातम्या
-
देशात आतापर्यंत २२३१ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
एकीकडे दिवसागणिक देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशातील २३ राज्यांतील ५४ जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा एकूण वेग पाहता ही बाब भारतासाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरीरावर औषधांची फवारणी केल्याने शरीरात प्रवेश केलेला व्हायरस नष्ट होत नाही
देशात करोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढतच चालाल आहे. मागील २४ तासांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढली आहे. आतापर्यंत देशभरात रुग्णांची संख्या १५,७१२ इतका झाली आहे. तर, या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही ५०७ इतकी झाली आहे. तसेच, या जीवघेण्या आजारातून आतापर्यंत २२३० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या देशभरात १२९७४ जणांवर उपचार सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली, गुजरात, युपी आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढली
देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती १५ हजार ७१२ वर पोहचली आहे. देशात आतापर्यंत ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २२३१ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला, ३ जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चौकीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, येथील नूरबाग परिसरात असणाऱ्या CRPF आणि स्थानिक पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. अचानकपणे गोळीबार सुरु झाल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नूरबाग परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय महामार्गावर येत्या सोमवारपासून पुन्हा टोलवसुली; केंद्राकडून मजुरी
येत्या सोमवार, २० एप्रिलपासून देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी २५ मार्चला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली तात्पुरती बंद करण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे सर्व राज्यांना मिळाव्यात, यासाठी त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती हे जसे आव्हान आहे तशी संधी सुद्धा - राहुल गांधी
भारतात करोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याची स्थिती दिसतेय. संपूर्ण देशात आत्तापर्यंत १४ हजारांहूनन अधिक रुग्ण आढळले आहेत तर जवळपास ५०० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दरम्यान राहुल गांधी यांनी एक आशादायक ट्विट केलंय. कोरोना व्हायरसनं भारताला आपल्या तज्ज्ञांच्या मदतीनं अभिनव उपायांद्वारे या आजाराशी लढण्याची एक संधी दिलीय, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: देशहिताचा, 'गांधी विचार' देशात पोहोचवायला हवा – शिवसेना
‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं त्यांच्या या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल, अशा शब्दांत शिवसेनेनं राहुल गांधी यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात करोनासंदर्भात एखादी चर्चा थेट व्हावी, असंही म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय नौदलातील किमान २१ जणांना कोरोनाची लागण
करोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: अहमदाबादमध्ये ५ दिवसांत दर २४ मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे. गेल्या २४ तासात ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजारांच्या घरात कोरोनाबाधित भारतात आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानात आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार दिवाळखोरीत निघालंय यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही - पंजाबचे मुख्यमंत्री
कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.
5 वर्षांपूर्वी -
आनंदवार्ता! देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ
कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात १३५०० च्या घरात गेलेली असतानाच एक दिलासादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. याचाच अर्थ रुग्ण कोरोनातून बरे होत असल्याचे प्रमाणही वाढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | UPSC परीक्षा रद्द संदर्भातील वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्ट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यानंतर सुरक्षेच्या करणास्थाव सरकारी पातळीवर अनेक निर्णय घेण्यात येतं आहेत. त्याच अनुषंगाने राज्यात देखील शाळा-महाविद्यालयांचं गणित बिघडल्याने काही निर्णय घोषित करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटामाटत
भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे, ते या आजारावर उत्तर नाही - राहुल गांधी
देशभरात कोरोना व्हायरसमुळे तणावाची परिस्थिती असताना मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि येत्या काळात दिसणारे त्याचे परिणाम या मुद्द्यांवर काँग्रेस्या राहुल गांधी यांनी भाष्य केलं. लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून चिंता
कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिझ्झा होम डिलिव्हरी व्यक्तीला कोरोनाची लागण; ७२ ठिकाणी होम डिलिव्हरी केली
भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाबाधितांचा आकडा १२,३८० वर, ४१४ रुग्णांचा मृत्यू
भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही: ICMR
कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संगनमताने योग्य ते निर्णय घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन जिल्हानिहाय तीन गटात वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील १७० जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये तर जवळपास २७० जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
यूपीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले
कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर जाऊन लढत आहेत. मात्र या मंडळींना अनेकदा हल्ल्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा अनेक घटना वारंवार पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स आणि पोलिसांच्या मनोधर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशीच एक उत्तर प्रदेशातली घटना समोर येत आहे. मुरादाबाद जिल्ह्यातल्या नागफनी भागात नवाबपूरा मस्जिद हाजी नेब या भागात संशयीत रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झालेत.
5 वर्षांपूर्वी -
बैठक झालेल्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; गुजरातचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन
मंगळवारी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News