महत्वाच्या बातम्या
-
बैठक झालेल्या आमदाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; गुजरातचे मुख्यमंत्री होम क्वारंटाईन
मंगळवारी काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होणार; शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी
एकीकडे कोरोना विषाणू संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि दुसरीकडे वाढत्या पाऱ्यामुळे घरात असलो तरी उकाड्याने जिवाची घालमेल होत असताना एक सुखावणारी बातमी आली आहे. देशात यंदाही सरासरी इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदविला आहे. जूनपासून देशात पावसाळ्याला सुरुवात होते. त्याआधी दोन ते तीन वेळा हवमानशास्त्र विभागाकडून मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. बुधवारी पहिला अंदाज वर्तविण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान सेवाही ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईत स्थलांतरीत मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर मोठी गेर्दी केली होती. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही विशेष ट्रेन सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे तब्बल ३५६ नवे रुग्ण
देशात कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १० हजार ३६३ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
आनंदाची बातमी! ५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण
देशातील करोना रुग्णांची संख्या ९१५२. गेल्या २४ तासांत ७९६ नवे रुग्ण आढळले. तर ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांची देशातील एकूण संख्या ३०८ इतकी झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिलीय. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८५७ जण बरे झाले असून एका दिवसात १४१ जण बरे झाल्याची एक सकारात्मक बाब समोर आल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील १५ राज्यांमधील २५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
5 वर्षांपूर्वी -
स्वयंशिस्त, प्रशासनाला मिळालेल्या नागरिकांच्या सहकार्याने केरळात रुग्णसंख्या नियंत्रणात
भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार हे मंगळवारी सकाळी १० वाजता कळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
थाळ्या-टाळ्या वाजवूनही परिस्थिती गंभीर; 'डिजिटल' मंत्र्यांना हजर होण्याचे केंद्राचे आदेश
आज देशव्यापी लॉकडाउनचा २० वा दिवस असून देशभरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात रुग्णांची संख्या ९,००० वर पोहोचली असून आतापर्यंत ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ २४ तासात भारतात कोरोनाचे ६२० नवे रुग्ण
जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार जणांनी जीव गमावला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ४४७ झाली आहे. आतापर्यंत २७३ जणांनी यामध्ये जीव गमावला आहे. तर ७६५ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज
भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात विदेशी नागरिकांसह कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ८ हजार ३५६ वर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत रविवारी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे २७३ रुग्णांचा मृत्यू झाला तर कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ३७६ वर पोहचला होता. तर २४ तासांमध्ये कोरोनाचे आणखी ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: काही भागात आरएसएस कार्यकर्ते थेट पोलिसांच्या भूमिकेत? प्रवाशांची झडती
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरु आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: टवाळखोरांनी पोलिसाचा तलवारीने हात छाटला
लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलीस अधिकाऱ्याचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. यामध्ये आणखी काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. हे सर्वजण सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात वाहन घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीकाळात देशभक्त सर्जन डॉक्टर संबित पात्रा टेलरच्या भूमिकेत...नेटकरी संतापले
लॉकडाऊनच्या १८ व्या दिवशी अर्थात शनिवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील २३९ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे ६४३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराची सरकारी शाळेत बिर्याणी पार्टी; सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा ७ हजार ४४७ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत देशात १०३५ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ७४४७ वर
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा ७ हजार ४४७ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पगार मिळावा आणि घरी जाण्याची परवानगी सुद्धा; सुरतमध्ये कामगारांकडून जाळपोळ
गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले, या कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. पगार मिळावा तसेच घरी जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत, कामगारांनी दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ६०- ७० लोकांना ताब्यातही घेतले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताकडे ३.२८ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा; केंद्रीय आरोग्य मंत्रालय
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारची नियमावली...हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन ५ वर्षांखालील मुलांना आणि या रुग्णांसाठी नाही
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे धडा....चीनमध्ये श्वानांच्या मांस विक्रीवर अखेर बंदी
करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तिथे व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. वुहानमध्ये लॉकडाउन संपला असला तरी तिथल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वुहानमधल्या छोटया दुकानदारांनी शहरातील एका मोठया मॉलबाहेर भाडे कमी करावे, यासाठी निदर्शने देखील सुरु झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC