महत्वाच्या बातम्या
-
इस्पितळात सुद्धा त्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियम धुडकावला; समूहाने नमाज पठण
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६३७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १३२ रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा असला तरी तो मुख्यत्वे तबलिगी जमातच्या अनुयायांना झालेल्या बाधेमुळे वाढला आहे. हा देशव्यापी आलेख नसल्याची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आत्तापर्यंत ४७,९५१ वैद्यकीय चाचण्या झाल्या असून, सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ४५६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१४ एप्रिलनंतरच्या रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही
देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सेवा ठप्प झाल्यात आहे. लोकल रेल्वे, मेल एक्स्प्रेस गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. रस्ते वाहतूकही बऱ्यापैकी थांबलेली आहे. अनेकांनी एप्रिल आणि मे महिन्याचं आधीपासूनच आरक्षण करून ठेवलेलं आहे. परंतु रेल्वेच बंद असल्यानं ते आरक्षणही स्थगित झालं आहे. १४ एप्रिलपर्यंत आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. पण रेल्वेनं आणखी एक आनंदवार्ता दिली आहे. अशातच आरक्षण सुविधा १४ एप्रिलनंतरही बंदच ठेवणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर आता रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे. १४ एप्रिलनंतर रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! निजामुद्दीन मरकजमध्ये चीनसह तब्बल ६७ देशातून आले होते २०४१ नागरिक
दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये १५, १६ आणि १७ मार्च रोजी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच देशभरात मोठी खळबळ उडाली. या क्रार्यक्रमात इंडोनेशियाचे ५५३, बांगलादेशचे ४९७, थायलंडचे १५१, किरगिस्तानचे १४५, मलेशियाचे ११८, चीनचे ९ आणि अन्य देशाताली ५७७ नागरिक सहभागी झाले होते. यामधील अनेक जण हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. अशात ते धार्मिक कार्यक्रमात कसे सहभागी झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचा व्हिसा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला
दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तलबीघी जमातच्या मरकझमधून मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव देशात होण्याची भीती आहे. तामिळनाडू तबलीघीच्या कार्यक्रमातून आलेल्या १०० हून अधिक जण करोना पॉझिटिव्ह आढळलेत. तर तेलंगणमध्ये ६ जणांना मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून आता १९००च्या जवळ पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४१ जणांना मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशावर राष्ट्रीय संकट असताना देखील मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही
कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ट्रस्ट ‘पीएम-केअर’ वर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा ट्रस्ट निधी उभारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पीएम रिलीफ फंड किंवा पंतप्रधान मदत निधी अस्तित्वात असताना, पुन्हा ‘पीएम-केअर’ का असे गंभीर प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
परदेशातून भारतात येणाऱ्यांवर १ फेब्रुवारीपासूनच बंदी का घातली नाही; भाजपचे नेते बरसले
निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! देशात १२ तासात २४० कोरोनाग्रस्त वाढले आहेत
देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
म्हणून डॉक्टर्स व पोलिसांना सहकार्य करा; त्यांच्याच घरात ते अशी काळजी घेतात
देशभरात २४ तासात १४६ करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १३९७ वर जाऊन पोहचली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२३८ जणांवर उपचार सुरु आहेत. १२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही संख्या जाहीर केली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ७२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या एका दिवसात २३० वरुन थेट ३०२ वर जाऊन पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे दिल्ली, युपी व तेलंगणा सरकारची डोकेदुखी वाढली
दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीघी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तेलंगणमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहा जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे लक्षात घेत उत्तर प्रदेशाच्या पोलिस महासंचालकांनी १८ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या १० लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, २०० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री येडियुरप्पा व ३ हजार पाहुण्यांची उपस्थिती
कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना हेल्पलाइनवर फोन केला; म्हणाला ४ सामोसे पाठवून द्या...त्यानंतर हे झालं
जगभरात कोरोनाच्या साथीने अक्षरशा थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात देखील सर्वत्र भीतीचं वातावरण असून सरकारी यंत्रणा देखील अत्यंत दबावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात देखील रुग्णांचा आकडा हजाराच्या पार गेल्याने चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकारने देखील स्वतःच्या परीने सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत आणि त्यासाठी कोरोना संबंधित हेल्पलाईन देखील सुरु केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनासंदर्भात पोलिसांकडून देशभर हटके जनजागृती मोहीम
करोना व्हायरसचा देशभरात दिवसेंदिवस वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असेही सांगण्यात आले आहे. जगभरात करोना व्हायरस या आजारामुळे थैमान घातले आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे शिवाय अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे. या साठी जागोजागी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील काही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पासपोर्ट धारकांच्या चुकांची किंमत रेशनकार्ड धारकांना क्रूरपणे चुकवावी लागत आहे? सविस्तर वृत्त
बरेली, ३० मार्च: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदमुळे बेरोजगार आणि बेघर लोक आता आपल्या गावी व खेड्याकडे जाण्यास निघाले आहेत. अशा प्रकरणात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शेकडो किलोमीटर चालत आहेत. त्यांच्याकडे जगण्याची सुविधा नाही किंवा घरी पोहोचण्याचे साधन नाही, या लोकांना भयंकर अडचणी येत आहेत. या लोकांना निवारा गृहात ठेवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारांना आदेश द्यावेत, असा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र देशात गरीब श्रीमंत असे दोन गट असल्याचं कोरोनाच्या आपत्तीनंतर दिसतं आहे. […]
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढणार का ? केंद्रीय सचिवांचं उत्तर...
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावतोय. जनतेच्या मनातील याच प्रश्नाचं उत्तर नकारार्थी देत केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा दिलाय.
5 वर्षांपूर्वी -
देशासाठी आनंदाची बातमी; कोविड-१९'चे ८६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले
राज्यातील ३५ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज रविवारी नवीन २२ रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या २०३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून, पाच रुग्ण पुण्याचे आहेत. नागपूर तीन, अहमदनगर २ आणि सांगली, बुलडाणा व जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
अत्यावश्यक वस्तू आणि इतर सर्वप्रकारच्या माल वाहतुकीला केंद्राची परवानगी
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी कठोर उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. कोरोनाच्या संबंधित आणि लॉकडाउन मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
४० कोटी भारतीयांना कोरोना होणार ती बातमी खोटी..असा कोणताही रिपोर्ट नाही..सत्य वाचा
सध्या केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना आपत्तीमुळे भीतीचं वातावरण आहे. अशा वातावरणात त्या त्या देशातील अथवा राज्यातील तसेच जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळो अधिकुत माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती करून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीत तोच उपलब्ध असलेला पर्याय आहे.
5 वर्षांपूर्वी -
कठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी
कोरोना व्हायरसचं देशभरात वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. या लॉकडाऊनंतर जनतेला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये जनतेची माफी मागितली आहे. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे त्यामुळेच काही कठोर निर्णय घावे लागले. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. लॉकडाऊन करणं गरजेचं होतं अन्य़था कोरोना संसर्ग वेगानं पसरला असता असं ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन पण जवाबदारीचं काय? रामायणाच्या वनवासाआड गरिबांचा वनवास दिसेनासा?
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, म्हणजे आज २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झालं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN