महत्वाच्या बातम्या
-
कोरोनाचा देशात आणखी एक बळी, गुजरातमध्ये रुग्णाचा मृत्यू
देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे तर मृतांचा आकडा सातच्या वर पोहोचला आहे. नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसने गुजरात राज्यात पहिला बळी घेतला आहे. सुरत येथे एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
5 वर्षांपूर्वी -
'जनता कर्फ्यू'त देशभरातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सॅल्यूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण भारतातील जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. जनतेनेही अतिशय उत्स्फूर्तपणे या आवाहनाला पाठिंबा दिला. Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक देशवासियाने आवश्यक असणारे सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असंही आवाहन त्यांनी केलं. याचवेळी मोदींनी राष्ट्रातील सर्व जनतेकडे एक विनंतीही केली. ही विनंती होती, कृतज्ञता व्यक्त करण्याची.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात पैसा पुतळे उभारण्यात; आज ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेडची वेळ
कोरोना व्हायरस देशभर पसरू नये, म्हणून केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. मात्र कोरोनाने सध्या साऱ्या जगात धुमशान घातले आहे. भारतातही मोठ्या वेगाने हा विषाणू पसरत आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात असला तरी, देशात ३०० पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यात केंद्रीय आरोग्य विभागाचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये सध्या रुग्णालयांमध्ये ८४,००० भारतीयांसाठी एक बेड, तर, ३६,००० भारतीयांसाठी एक क्वारंटाईन बेड आहे. कोरोनाव्हायरसने थैमान घातल्यानंतर सरकारच्या वतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली. काही राज्यांमध्ये तर ११,६०० भारतीयांसाठी एकच डॉक्टर असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीवर योग्य निर्णय...मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून मालवाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक तूर्त बंद राहणार आहे. ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याची रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेने घेतलेला हा निर्णय देशाची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होताना दिसते आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलत संपूर्ण रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : इटलीतून २६३ भारतीय विद्यार्थी परतले
युरोपियन देश इटलीमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू आहे. इटलीत एकाच दिवशी ७९३ जणांच्या मृत्यूने जग सुन्न झालं आहे. इटलीत आतापर्यंत ५३ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ४८०० मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ फेब्रुवारीला ५८८३ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २३३ मृत्यू झाले होते. इटली सरकारने वारंवार जनतेला सूचना पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. यात सरकारलाही जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आता इटलीवर लॉकडाऊनची वेळ तर आली आहेच, शिवाय उपचाराअभावी अनेकांचे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प'साठी १२० कोटी खर्च आणि कोरोना लढ्यासाठी फक्त टाळ्या आणि थाळी
कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनीती बदलली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात २७१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता सरकारने सर्व रुग्णालयाच न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी, न्यूमोनिया झालेल्या सर्व रुग्णांना एनसीडीसी किंवा आयडीएसपीला कळवावे, जेणेकरुन त्यांच्या COVID-19 ची तपासणी करता येईल, असे सर्व रुग्णालयांना सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात? हा रुग्ण परदेशात गेला नव्हता...सविस्तर
तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांचा राजीनामा, काँग्रेसचं सरकार कोसळलं
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले; अखेर न्याय झालाच
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेशात आज बहुमत चाचणी
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडाळीमुळे अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला आज बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान
चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.
5 वर्षांपूर्वी -
प्रवासी विमानांना भारतात प्रवेश बंदी; तर देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी महत्वाची सूचना
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. २२ मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विरोधक लवकरच माझं स्वागत करतील: खासदार रंजन गोगोई
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. गुरुवारी याच विरोधाचा भाग म्हणून काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी शपथविधीवेळी सभात्याग केला. कम्युनिस्ट पक्ष, डीएमके आणि एमडीएमकेनेही या नियुक्तीला विरोध केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'५०% कर्मचारी वर्क फ्रॉम होम'...केंद्र सरकारची सूचना
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आ. रोहित पवार यांचा राहुल गांधींना शहाणपणाचा सल्ला...काय म्हटलं?
देशात फैलावत चाललेल्या करोना विषाणूच्या संसर्गाची तुलना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुनामीशी केली होती. तसेच येत्या काळात देशात येणाऱ्या आर्थिक विध्वंसाशी लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केले होते.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशातील राजकारण तापलं; त्या आमदारांच्या भेटीला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. तर बंडखोर आमदार बेंगळुरूला असताना बहुमत चाचणी घेणे हे घटनाविरोधी ठरेल असे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी सरन्यायाधीशांच्या राज्यसभेवरील नेमणुकीवरून सर्वच थरातून टीका...पण का?
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील कोरोना संशयित रुग्ण म्हणून या मंत्र्याला कॉरंटाईन शिक्का...सविस्तर
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोगोईंना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु होती: न्या. लोकूर
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.
5 वर्षांपूर्वी -
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल