महत्वाच्या बातम्या
-
काँग्रेसला उद्याच बहुमत सिद्ध कराव लागणार.....अन्यथा - सविस्तर वृत्त
मध्य प्रदेशात राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. त्याचा शेवटचा अंक उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्याच्या उद्या म्हणजे १७ मार्चलाच फ्लोअर टेस्ट घ्या, असं सांगितलं आहे. १७ मार्चला फ्लोअर टेस्ट घेतली गेली नाही, तर काँग्रेसकडे बहुमत नाही, असं मानलं जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना धास्तीतही सत्तेचे डोहाळे; MP विश्वासदर्शक ठरावासाठी भाजप सुप्रीम कोर्टात
मध्य प्रदेशात ९ मार्चपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य विधानसभेत आजही पाहायला मिळालं. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. उलट कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत २६ मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना भले मोठं पत्र लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांचे अपहरण केले आहे. आमच्या आमदारांना भाजपने वेठीस ठेवलं असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज्यपालांना काहीच काम नसतं; काश्मीरचे राज्यपाल तर दारू ढोसत बसतात
“राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात” असे वादग्रस्त विधान गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
MP राजकीय नाट्य कोरोना धास्तीने रखडले; विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यंत स्थगित
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे. सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रशेखर यांचा ‘आझाद समाज पक्ष’; यूपीत मायावतींना तर महाराष्ट्रात वंचिताला फटका बसणार?
भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद राजकारणात सक्रिय होणार आहेत. आझाद यांनी रविवारी नोएडामध्ये त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली. ‘आझाद समाज पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. आझाद यांच्या नवीन पक्षामुळे बहुजन समाज पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. दलित राजकारणातील पोकळी आजाद यांच्या नवीन पक्षामुळे भरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश: कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
मध्य प्रदेश विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले
करोना व्हायरसने थैमान घातलेल्या इराणमधून २३४ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ यात्रेकरू आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराण सरकार आणि तेथील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. इराणहून विमानाने दिल्लीत आलेले भारतीय जैसलमेरमध्ये पोहोचलेत. एअर इंडियाच्या दोन विमानांद्वारे त्यांना जैसलमेरला सकाळी उतरवण्यात आलंय.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - कोरोना धास्ती; अखंड भारत हिंदू महासभेची 'गोमूत्र पे चर्चा'.......सविस्तर वृत्त
देशात सध्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या या रोगावर काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरं कोणताही औषध उपलब्ध नसल्याने जगाची काळजी वाढली आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या या भीषण रोगाची लागण जगातील जवळपास १०० देशांमध्ये विविध प्रमाणात पसरली आहे आणि त्यात भारत देखील एक प्रभावित देश आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाला घाबरू नका!....भारतातील १० रूग्ण ठणठणीत बरे झाले
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. कोरोनामुळे जगभरात ५७३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना भारतात कोरोनामुळे १० रूग्ण एकदम ठणठणीत झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही आता ८४ पर्यंत पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दाखवलं 'व्हिक्टरी'
मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात एक लेखी पत्रं देऊन हस्तक्षेप करण्याची मागली केली आहे. तसेच बाहेर पडताना हात उंचावून ‘व्हिक्टरी’ झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पावेळी राज्यपालांच्या भाषणानंतर फ्लोअर टेस्ट होईल, पण त्यासाठी २२ आमदारांना कैदेतून मुक्त करावंच लागेल आणि त्याशिवाय बहुमत चाचणी शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील मिशन 'अजित पवार' अनुभवामुळे भाजपाला मध्यप्रदेशात धाकधूक - सविस्तर वृत्त
मध्यप्रदेशमधील २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँगेसला सोडचिठ्ठी देणार नसल्याचा दावा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला आहे. विधानसभेत कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव निश्चितच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आम्हीही गप्प बसलेलो नाही किंवा झोपा काढत नसल्याचेही ते म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या विधानसभेतील २२ काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही: केंद्रीय गृहमंत्री
ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मौन सोडलं आहे. लोकसभेमध्ये अमित शाह यांनी दिल्लीतल्या हिंसाचारावर भाष्य केलं. दिल्लीतला हिंसाचार हा सुनियोजित कट होता, असा आरोप अमित शाह यांनी केला आहे. दंगल करणारा कोणताच व्यक्ती वाचणार नाही, असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुका कशाला हव्या? सरळ IPL सारखा लिलाव करा...
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्याची आणि देशाची सेवा करण्याचा त्यांचा हेतू आहे पण पक्षात राहून या गोष्टी करणं कठीण आहे. त्यांच्या या निर्णयावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेस सोडण्यावर राग व्यक्त करत म्हटलं की, देशातील निवडणूका बंद केल्या पाहिजेत आणि आयपीएल ऑक्शन सुरू केलं पाहिजे. यासोबतच अनुभव यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, देशसेवा करण्यासाठी थोडा वेळही वाचेल.
5 वर्षांपूर्वी -
विवाह सोहळ्यात लग्नकार्य सोडून भाजप नेत्यांनी रचला होता फोडाफोडीचा कार्यक्रम - सविस्तर वृत्त
ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या घडामोडींमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी अमित शहा यांची ज्योतिरादित्य शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर शिंदेंना घेऊन अमित शहाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतरच ज्योतिरादित्य शिंदे याचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
'ती' कोरोनातून सुखरूप बाहेर आली आणि आता जगाला आत्मविश्वास दिला
सध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
'लोकशाहीची हत्या हाच भाजपचा हेतू आहे', ज्योतिरादित्य शिंदेंचं ते ट्विट
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मोदींची स्तुति करत ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपात प्रवेश
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या येण्याने आम्हाला आनंद होत असून त्यांना पक्षात मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेस असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी सरकार पाडण्यात तुम्ही व्यस्त, पण त्याचवेळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले...
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग मिळाला. मध्य प्रदेशमध्ये सहा मंत्र्यांसह एकूण १९ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे. राजभवनाकडून याला दुजोरा देण्यात आला. लालजी टंडन हे होळीनिमित्त मंगळवारी लखनऊमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेले ५८ नागरिक भारतात परतले
कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या ५८ नागरिकांना घेऊन वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान तेहरानमधून भारतात दाखल झालं आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे विमान गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे. इराणमधून देशात परतलेली ही पहिली तुकडी आहे. त्यानंतर इतर भारतीयांना देखील विशेष मोहीम राबवून भारतात परत आणण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN