महत्वाच्या बातम्या
-
होळीला काँग्रेसचा रंग उतरणार! ज्योतिरादित्य शिंदे यांची अमित शहा व मोदींसोबत बैठक
देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या आधीत मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये फूट! एकाचवेळी २२ मंत्र्यांचे राजीनामे
कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी २२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात येणार आहे, मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: २००२ मधील नरोदा पाटिया दंगलीच्या खटल्यातील न्यायाधीशांची बदली
Special SIT Judge MK who is hearing the 2002 Naroda Patiya riots case. Dave has been transferred as the Chief District Judge of Valsad on the orders of the Gujarat High Court. According to a notification issued by the Gujarat High Court on Friday, M.K. Dave has been transferred as the Chief Justice of Valsad district. The Gujarat High Court is facing trial in the 2002 riots in Naroda Patiya in Gujarat. The 32 accused in the case had filed a petition in the High Court. They include former Gujarat minister Maya Kodnani, who was sentenced to life imprisonment by a junior court. This is an overview of what is causing the uproar across the country
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक
अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) या संघटनेशी संलग्नित असलेल्या काश्मीरच्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयएसकेपीच्या संघटनेतील काही लोकांसोबत मिळून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन भडकवण्यामागे या दाम्पत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका खास मोहिमेअंतर्गत या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलांची काळजी घ्या! केरळात ३ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण - सविस्तर वृत्त
कोरोना व्हायरसची लागण भारतात हळूहळू वाढू लागली आहे. देशात आतापर्यंत ४१ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे तपासात आढळून आले आहे. जगातील इतर देशांमध्ये इटलीत कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ३६६ वर जाऊन पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील दंगल हा आरएसएस व भाजपाने रचलेला पूर्वनियोजित कट – प्रकाश आंबेडकर
दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे: उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला.
5 वर्षांपूर्वी -
मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटीचा निधी; उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय...सविस्तर वृत्त
‘मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय’… एका महिलेचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले इतकंच नाही तर त्यांना अश्रू आवरणंही कठिण झालं. जन औषधी दिवसानिमित्तानं आज पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, अर्धांगवायूनं पीडित एका महिलेनं पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला. ‘जन औषधांमुळेच आज माझी प्रकृती सुधारत चाललीय आणि खर्चही कमी झालाय’ असं या महिलेनं पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
'मुनगंटीवार के हसीन सपने' पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन - संजय राऊत
महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राऊतांनी टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया
मनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, “31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत.”
5 वर्षांपूर्वी -
निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट
संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं. तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून कोरोना व्हायरस भीती झाली 'जाहिरातबाजी'ची संधी; नेटिझन्सनी झाडले
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लोकांमध्ये मास्क वाटले, त्यावर ‘कोरोना व्हायरस संसर्ग सेव्ह मोदीजी’ असा मजकूर असं;असल्याचं पाहायला मिळालं. कोलकातामध्ये कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी जनजागृती मोहिमेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना मास्क वाटले. सोशल मीडियावर, भाजपाच्या या जनजागृती मोहिमेमागील मार्केटिंगची जोरदार चर्चा रंगली असून भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. कारण येथे देखील निवडणूक जवळ आल्याने मोदींचा प्रचार सुरु झाला असून कोरोनोवाला संधी समजून जाहिरातबाजी सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
इटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी करोनाची चाचणी केली का? भाजपाचा निशाणा
इटलीहून परत आल्यावर राहुल गांधींवर यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी काल म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय
जगभरातील तज्ज्ञांकडून मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. जगभरात पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपण होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
CoronaVirus: घाबरून जाऊ नका...अफवा पसरवू नका! हा VIDEO पहा
‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना निर्धास्त राहण्याचं आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही तर मक्केला जावं...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
5 वर्षांपूर्वी -
एकावर एक राज्य भाजपमुक्त होतं असल्याने मध्यप्रेदशात पुन्हा आमदारांची खेरदी?
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपसाठी हरयाणातील हॉटेल म्हणजे इतर पक्षाचे आमदार लपविण्याचा अड्डे? सविस्तर
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN