महत्वाच्या बातम्या
-
यमक जुळणं महत्वाचं? राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही अंडा मारू: आठवले
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: फिर एक बार केजरीवाल सरकार; मोदी-शहांचा प्रचार कुचकामी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. परंतु, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांना डिजिटल इंडियाची स्वप्नं आणि म्हणे इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क नाही?
काश्मीरमधील इंटरनेटबंदीच्या मुद्यावर सुनावणी झाली असता, इंटरनेटचा वापर हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला असताना, ‘इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे, हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात तसे नाही’, असा युक्तिवाद राज्यसभेत माहिती प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी केला.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर ट्रस्ट'वरून भाजपमध्ये जातीय राजकारण तापलं
नरेंद्र मोदी सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले होते आणि त्याचे नेतृत्व सुद्धा ओबीसीने केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. मात्र ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टवरून राजकारण तापलं असून त्याला जातीय रंग देण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकसभेत बेरोजगारी व देशाच्या प्रगतीवर भाष्य करताना राहुल गांधींकडून मोदींचा एकेरी उल्लेख
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या 'ओएसडी'ना लाच घेताना अटक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे ‘ओएसडी’ गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांची थेट केंद्रीय अर्थमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता - सविस्तर वृत्त
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असून, याबाबत दिल्लीत एक बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यात राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याच्या शक्यतेने भाजपच्या वरिष्ठांनी हे पाऊल उचलून अनेक गोष्टी म्यान केल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश सरकारकडून सीएए विरोधातील ठराव मंजूर; राज्यात सेनेच्या अडचणीत वाढ?
देशात यापूर्वी केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी CAA रद्द करण्यात यावा यासाठी ठराव संमत केला होता. आता मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाने देखील CAA विरोधात ठराव संमत केला आहे. हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला छेद देणारा आहे. म्हणून हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी मध्य प्रदेशने ठरावाच्या माध्यमातून केली आहे. तत्पूर्वी काही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे आणि त्यात सीएए कायद्याच समर्थन करताना NRC’ला विरोध दर्शविला होता.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीमुळे फडणवीस राज्यात पुन्हा येणार नसल्याने केंद्रात घेण्याची तयारी; थेट मंत्रीपदी
महाराष्ट्रामध्ये यशाच्या दरवाज्यातून परतलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या संभाव्य बदलाची चाहूल लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात ३० वर्ष जुना मित्रपक्ष म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करताना पाहण्याची नामुष्की सुद्धा भारतीय जनता पक्षावर ओढवली. त्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाने २०२४ मध्ये शिवसेना युपीएच्या गोटात किंवा पवारसोबत तिसरी आघाडी उघडून वेगळीच रणनीती आखू शकतात अशी शंका भारतीय जनता पक्षालाच असल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
शाहीनबाग: ५०० रु. प्रतिदिन आणि एक प्लेट बिर्याणी मिळाली होती जाण्यासाठी..पण तुम्ही: गुंजन कपूर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
5 वर्षांपूर्वी -
मनसे हिंदुत्वाचा झेंडा खांदयावर घेऊन देशभर विस्तार करण्यासाठी तरुणांची राज ठाकरेंना विनंती
२०२४ मधील निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्यावर लढल्या जातील अशी सध्याची परिस्थिती सांगते. दरम्यान, मनसेने देखील भगव्याला स्वीकारून नवे बदल केल्याने त्यांना सध्या चांगले येण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यांच्या कट्टर आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेचा मूळ मतदार प्रचंड नाराज आहे. त्यात अल्पसंख्यांक धार्जिणे निर्णय घेण्यास त्यांना महाविकास आघाडी भाग पाडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग-न्युज: शाहीन बागमध्ये घुसणारी बुरखाधारी महिला आणि मोदी एकमेकांचे फॉलोअर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची जाहीर मागणी
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व ६७ एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
हिंदू निर्वासितांच्या मुद्द्याआड मुख्यमंत्र्यांचं CAA समर्थन; महाविकास आघाडीत बिघाडी होणार? सविस्तर वृत्त
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०२४'ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात - आ. रोहित पवार
“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
जवानांच्या नावाने निवडणुका; पण मोदी'राज्यात सैनिकांना पुरेसं अन्न-वस्त्र सुद्धा नाही: कॅग रिपोर्ट
सियाचीन, लडाख, डोकलामसारख्या उंच ठिकाणच्या सीमा रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या जवानांना आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ मिळत नसल्याचा ठपका कॅगने केंद्र सरकारवर ठेवला आहे. संसदेच्या पटलावर कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यात ही बाब समोर आली. कॅगचा हा अहवाल २०१७-१८ या वर्षातील आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात NRC लागू करण्यावरून मोदी सरकारची पलटी? केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची माहिती
केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या एनआरसी कायद्याविरोधात सध्या देशातील बहुतांश भागात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाने आज लोकसभेत दिली.
5 वर्षांपूर्वी -
सुपडा साफ होणार! मोदी-शहा, २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री फुसके बार ठरणार: सर्व्हे
बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभक्तीची नशा एवढी करू नका की मोदीं प्रमाणे लग्नच नाही करायचे: भाजप खा. विजयवर्गीय
भारतीय जनता पक्षाचे कोणता नेता कधी नेमकं कोणतं धक्कादायक विधान करून जाईल याची शास्वती देता येणार नाही. याआधीच मोदी शहांना विष्णूचा अवतार, रामाचा अवतार आणि बरंच काही बोलून झालेलं रोज एक ना एक नेता नवनवीन विधान करून मोदींची स्तुती करत असतात. मात्र आता स्तुतीच्या नादात मोदींचा आपल्याकडून अपमान केला जातं आहे याचे भानही या नेत्यांना नसल्याचे दिसते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today