महत्वाच्या बातम्या
-
महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खा. अनंतकुमार हेगडे
बेंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी भाजपचे नेते अनंतकुमार हेगडेंनी महात्मा गांधींबद्दल धक्कादायक वक्तव्य केले. अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथीत नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य हेगडे यांनी केले.
5 वर्षांपूर्वी -
....पण डॉ. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत मी जरा जास्त बोलतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान, देशातील अशा अनेक राजकीय नेत्यांवर ते काही करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी मुलाखतीत उपस्थित केला आणि त्यात डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव पुढे आलं, ज्यांना त्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं मात्र भारतीय अर्थव्यस्थेतील त्यांचं पंतप्रधान म्हणून योगदान मोठं असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील अशाच टीकेला सामोरं जावं लागत असल्याच संजय राऊत यांनी विचारताच, मी तुलनेत डॉ. मनमोहन सिंग यांच्या पेक्षा जास्त बोलतो असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवालांच्या विकास कामांपुढे भाजप हतबल; देशाच्या गृहमंत्र्याचा चक्क पॅम्प्लेट वाटपात सहभाग
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण निवडणूक हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान अशी रंगवली आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मागच्या सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली, ज्याचा उल्लेख करण्याची वास्तविक कोणतीही गरज नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोकच शाहीन बागेतील आंदोलक: योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिल्लीच्या बदरपुरात भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक सभेत जाहीर भाषण केले. यावेळी सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की ते येथे सायंकाळी ५ वाजता येणार होते, पण शाहीन बागच्या निदर्शनामुळे त्यांना थोडा उशीर झाला. ते पुढे म्हणाले की, शाहीन बागेत निषेधाच्या नावाखाली दिल्लीत केवळ अनागोंदी पसरवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिन्याला ३०० युनिट वीज मोफत, विद्यार्थ्यांना नर्सरी ते PHD'पर्यंत मोफत शिक्षण: काँग्रेस
काँग्रेसने आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. तसेच स्वस्तामध्ये जेवण उपलब्ध करण्यासाठी १०० इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय काँग्रेस लाडली योजना पुन्हा सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी २० मुद्दे मांडण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल यांनी घोषणा केल्या कामं नाही; मोदीजी कमी बोलले पण कामं जास्त: चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रातून दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी एक सभेत उपस्थित लोकांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘केजरीवाल यांनी केवळ घोषणा केल्या पण कामं आजोबाच्या नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी बोलले पण कामं जास्त केल्याचा दावा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुल्लक भांडणावरून पत्नीचं मुंडकं कापून थेट पोलीस ठाण्यात पोहोचला
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुल्लक घरगुती वादात पतीने पत्नीची हत्या केली आणि तिचा थेट शिरच्छेद केला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या युवकाला पाहून पोलिस कर्मचारीही बुचकळ्यात पडले होते. अखिलेश रावत असे आरोपीचे नाव आहे. तो बाराबंकीच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरातील बहादूरपूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नीचं मुंडकं जहानगीराबाद पोलिस ठाण्यात नेले होते.
5 वर्षांपूर्वी -
चिकनच्या नावाने खवय्यांना चक्क कौवा बिर्याणी विकायचे; कुठे ते वाचा सविस्तर
जर तुम्ही रोजच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला स्वस्त आहे म्हणून चिकन बिर्याणी खात असाल तर जरा काळजी घ्या. कारण मागच्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये कोंबड्यांच्या नावावर कावळे आणि कुत्र्यांचे मांस मिसळून बिर्याणी विकण्याचे संतापजनक प्रकार सुरु असल्याचं उघड झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस: चीनमधून ३२४ भारतीय विशेष विमानाने मायदेशी परतले
कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली निवडणूक: २ रुपये किलो पीठ आणि मुलींसाठी मोफत स्कूटी; भाजपचा जाहीरनामा
भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २ रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाने यात वचन दिले आहे. त्याचबरोबर ईटीडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना ‘बेटी बचाव योजनें’तर्गत सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीत सरकार स्थापल्यानंतर १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. भारतीय जनता पक्षाने १० नवी आश्वासने या संकल्प पत्रात दिली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना: निर्भयाच्या आईचा आक्रोश
निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींची पुन्हा एकदा फाशी टळल्याने निर्भयाची आई संतापली असून प्रचंड हताशही झाली आहे. ७ वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. परंतु जे काही सध्या सुरू आहे, त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना, असा आक्रोश निर्भयाच्या आईने व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
निर्भया सामूहिक बलात्कार: नराधमांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती
निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या १ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. परंतु दिल्ली कोर्टाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजे गांधींजींची स्वप्नपूर्ती : राष्ट्रपती
२०२० च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केले. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण आर्थिक सर्वेक्षण सुद्धा सादर करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे २०२० चे पहिले अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दशकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणे हे आम्हा सर्वांचे प्रयत्न राहील असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. सोबतच, या अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या सशक्तिकरणावर सार्थक चर्चा व्हावी असेही ते पुढे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानातील हिंदूंनाच नव्हे तर पाकिस्तानी मुस्लिमांच्या नागरिकत्वाची देखील कायद्यात तरतूद
पाकिस्तान सारख्या देशात नाकारलेले आणि त्यांच्या अत्याचारांचे बळी गेलेल्या हिंदूंना भारतात नागरिकत्व देण्यावरून अजून रणकंदन पेटलेलं असताना, भारतातील मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून स्वतःला असुरक्षित असल्याचं सांगत आहे. त्यात पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मूळच्या पाकिस्तानी मुस्लिमांना भारत सरकार’मधील मंत्री थेट भारतात नागरिकत्व देण्याची भाषा करत असल्याने समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत हा हिंदू देश नाही; राजनाथ सिंह आणि मोहन भागवतांमध्ये दुमत? संघ कोपणार?
नोव्हेंबर २०१९ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्याही एका विचारधारेत बांधलं जाऊ शकत नाही. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सदर पुस्तक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना सुद्धा भारत नागरिकत्व देणार: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश: थरारनाट्य संपलं; सुभाष बाथम मारला गेला; २० मुलांची सुटका
उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. वायनाडच्या कलपेटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली. या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा