महत्वाच्या बातम्या
-
कन्नौजः ट्रक-बसच्या भीषण अपघातात २० जणांचा होरपळून मृत्यू, २१ जण जखमी
उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात २० जण ठार झाले तर अनेक जण जखमी आहेत. ट्रक आणि खासगी बसमध्ये हा अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागल्याने अनेक प्रवासी आगीत होरपळले. दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४३ प्रवासी होते, अशी माहिती आहे. काही प्रवाशांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले तर बहुतांश प्रवासी बसमध्ये अडकल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
CAA : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्राकडून अधिसूचना जारी
देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असताना केंद्र सरकारकडून या कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये गृह मंत्रालयाकडून देशात 10 जानेवारीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) लागू झाल्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल म्हणजे १० जानेवारी रोजी या कायद्याबाबत अधिसूचना जारी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित; माझ्यावर हिंसाचाराचा ठपका पण गुन्हा दाखल नाही
JNU हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषने केला आहे. “आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरही हिंसाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे, मात्र माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझ्याकडेही माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत” असंही आइशीने म्हटलं आहे. “आम्ही काहीही चुकीचं वागलो नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या प्रश्नांचा सामना करु. दिल्ली पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवून वागत आहेत असाही आरोप आयशी घोषने केला.
5 वर्षांपूर्वी -
JNU हिंसा: आयशी घोषसह ९ जणांवर पोलीस चौकशीत ठपका
रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह ९ हल्लेखोर होते. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये आरोपींची नावंही देण्यात आली आहेत. यात जेएनयूचे माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता तालुकदार आणि प्रिया रंजनदेखील आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी जाट आहे अंधभक्त नही! JNU हिंसाचारावरुन बॉक्सर विजेंदरने नेटकऱ्याला सुनावलं
दिल्लीत जेएनयू युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालेलं आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपला आवाज उठवत आहेत. भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दर्शवला होता.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात: CAA कायद्याला आणि मोदींना पाठिंबा देण्यासाठी शाळेची विद्यार्थ्यांना धमकी
सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच अभिनंदन करणारं पत्र लिहिण्याची सूचना केल्यानं गुजरातमधील शाळा वादात सापडली आहे. याबद्दल पालकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानं शाळेनं माफी मागितली. या पत्रातला मायनादेखील शाळेतील शिक्षकांनी वर्गांमधल्या फळ्यावर लिहून दिला होता. हाच मजकूर पत्रात लिहिण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावले
जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदी संदर्भातील निर्णयाचा पुन्हा आढावा घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ याबाबतचा निर्णय सुनावला आहे. ‘इंटरनेटचा वापर हा मुलभूत अधिकार आहे. अपवादात्मक स्थितीतच इंटरनेट बंदी करता येऊ शकते. त्यामुळे ७ दिवसांत इंटरनेट बंदीच्या निर्णयाचा आढावा घेण्यात यावा,’ असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कार्यकाळात तरुणांच्या बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या: NCRB अहवाल
देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरो ही गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.
5 वर्षांपूर्वी -
देशातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी; फडणवीसांच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
देशातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार २०१८ या एकाच वर्षात तब्बल १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापेक्षा धक्कादायक म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल ३ हजार ५९४ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. गेल्या वर्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांसह विविध आत्महत्यांचा आकडा हा १७ हजार ९७२ वर पोहोचला आहे. यामध्ये ३५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
केरळात CAA विरोध: भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना बंदी असल्याचे घराबाहेर स्टिकर्स लावले
देशभरात सध्या CAA वरून वातावरण तापल्याच दिसत आहे. देशभरात भाजपाला देखील त्यामुळे प्रचंड रोष सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये या विरोधाने रुद्र रूप धारण केले आहे. त्याचा रोष थेट मोदी आणि अमित शहा यांना देखील सहन करावा लागत आहे. आज खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेश: शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार १५ हजार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मास्टमाईंड देवडीकरला बेड्या ठोकल्या
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA: सध्या देश कठीण परिस्थितीतून जात आहे - सर्वोच्च न्यायालय
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) संवैधानिक घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिला. सध्या देश कठीण प्रसंगातून जात आहे आणि हिंसाचाराचं प्रमाण वाढलं आहे, असं कोर्टानं म्हटलं. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठानं याचिकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच, पहिल्यांदाच कुणी एखादा कायदा संवैधानिक घोषित करण्याची विनंती करत आहे, असं मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोध: सुरक्षेच्या कारणामुळे मोदींचा आसाम दौरा दुसऱ्यांदा रद्द
खेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: बंगळुरू'मध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार निदर्शन
जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी देखील या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार; विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीसमोर मांडले
राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला २०१७ मध्ये तब्बल ५५ वर्षे झाली आणि तर आज पवार ८०च्या वयात देखील तरुण राजकारण्यांना देखील लाज वाटेल अशी पक्ष वाढीसाठीची मेहनत करताना दिसतात. १९९२मध्ये शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते. आता दिल्लीतच राहायचं या विचारानं पवार कामाला लागले होते.
5 वर्षांपूर्वी -
सर्वेक्षण: केजरीवाल सरकारच्या विकासकामांमुळे मोदी-शहांच्या भाजपचा सुपडा साफ होणार
बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५९ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’, केवळ धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न: तरुण गोगोई
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचा मोहम्मद अली जिना यांचा ‘दोन देश सिद्धांत’ राबवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील २५ कोटी कामगारांचा उद्या मोदी सरकारविरोधात संप
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर; ८ फेब्रुवारी रोजी मतदान
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News