महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या १०० स्मार्ट सिटी शोधून सापडेना अन शहा दिल्लीत फुकट वायफाय'च्या शोधात
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
5 वर्षांपूर्वी -
रात्री जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला; अभाविप संघटनेवर आरोप
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठ्या-काठ्याधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.
5 वर्षांपूर्वी -
'जेएनयू' हल्ल्याचे पडसाद; देशभरात विद्यार्थ्यांची निदर्शने
जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस, एम्स तसेच दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना भेटू दिले जात नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.
5 वर्षांपूर्वी -
संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द वगळाः आरएसएस
देशाच्या संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते आणि संयोजक नंदकुमार यांनी केली आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेल्या धर्मनिरपेक्ष शब्दावर केंद्राने पुन्हा विचार करावा, हा शब्द पाश्चिमात्यांकडून आला असल्याचंही त्यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे पंतप्रधान की पाकिस्तानचे राजदूत आहात; ममतांचा मोदींना सवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. तुम्ही पाकिस्तानसोबत नेहमी भारताची तुलना करता, भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अँबॅसिडर आहात, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना केला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ८ जानेवारीला देशव्यापी संप
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील सहभागी होणार आहे. शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे या संपात सहभागी होणार असल्यामुळे संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र, केरळ व प. बंगालचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट होते त्यांनाच संधी : पियुष गोयल
महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का?’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र आणि झारखंडच्या दाव्यानंतर शहांचा दिल्लीत व बंगालमध्ये सत्ता येण्याचा दावा
महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये अतिआत्मविश्वास नडल्यानंतर देखील अमित शहांचा शतप्रतिशतचे दावे अजून कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात देखील एकटी भाजप १५० चा आकडा पार करून युती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असे छातीठोकपणे सांगत होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जवळपास नष्ट होऊन, आघाडीला केवळ २० जागा मिळतील असे भीषण दावे भाजपचे नेते करताना दिसले. मात्र राष्ट्रवादीच्या सभांना ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना आधीच धास्ती होती आणि मात्र निकाल त्याच धास्तीप्रमाणे लागले आणि आघाडी जवळपास शंभरीच्या घरात पोहोचली. त्यात शिवसेनेने देखील ऐतिहासिक धक्का दिला आणि संपूर्ण गणितच पालटलं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून महाराष्ट्राचा अपमान; प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात चित्ररथ नाकारला
महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार जमा करण्यासाठी ३ इव्हेन्ट द्वारे २ हजार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जातो. मात्र सदर रक्कम एकाचवेळी न देता तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. त्यानुसार प्रत्येक हफ्त्याला २ हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात. शेतकऱ्यांसाठी ही रक्कम अल्प असली तरी मोदी सरकार वर्षाला ३ इव्हेन्ट आयोजित करून २००० हजार रुपये ट्रान्सफर करताना मोठी जाहिरातबाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही प्रसार माध्यमांनी एकाचवेळी ट्रान्सफर केली जाणारी रक्कम ११ हजार कोटी तर काहींनी ती १२ हजार कोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मोदी सरकार कडून मार्केटिंग करताना देखील ताळमेळ नसल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
#CAA : योगी सरकार आणि पोलिस यंत्रणा सूडबुद्धीने काम करत आहेत: प्रियंका गांधी
उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहितीचे १४ पानांचे एक पत्रही त्यांनी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्द केले. आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत प्रियंका गांधी यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.
5 वर्षांपूर्वी -
Wikipedia'चं मोदी सरकारला पत्र; युजर्स बेस्ड वेबसाईट्स नियंत्रणात घेण्याची शंका?
सर्वासमावेशक माहिती पुरवणारे लोकप्रिय संकेतस्थळ Wikipedia ने नरेंद्र मोदी सरकारला लेखी पत्र लिहून नव्या नियमांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे आमच्या सिस्टिमचं पूर्णतः विनाशाकडे प्रयाण होईल, अशा आशयाचं पत्र Wikipedia ने केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO - अर्थतज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि सदगुरूंच्या विचारांचा मोदींकडून प्रचार
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अजूनही देशाच्या वेगवेगळया भागांमध्ये आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदगुरु जग्गी वासुदेव यांचा सीएए कायद्याचे समर्थन करणारा विस्तृत विश्लेषणाचा व्हिडीओ टि्वट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला, दोन्ही राज्यातील एसटी सेवा बंद
कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. परिणामी आज सकाळपासून महाराष्ट्रातून एकही बस कर्नाटकात गेली नसून, कर्नाटकातूनही एकही बस राज्यात दाखल झालेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच देशात स्थान: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
‘भारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो येथे राहणार का, याचा विचार करून हे आव्हान आपल्याला स्वीकारावेच लागेल. भारतात ‘भारतमाता की जय’ म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच देशात राहतील,’ अशा शब्दात पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या वादाबाबत वक्तव्य केले.
5 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही; आठवले आरएसएस'शी असहमत
देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकार मोदी सरकारच्या विकास कामांचं क्रेडिट स्वतःकडे घेत आहे: अमित शहा
राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वखर्चातून १ लाख २० हजारात मोदींचं मंदिर; अन घरी गॅस जोडणी व शौचालय सरकारी योजनेतून
तामिळनाडूच्या त्रिचीमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. येथील इराकुडी गावामध्ये हे छोट्या आकाराचे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी खोटं बोलत आहेत; आसाममध्ये स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) उभारणी: राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS