महत्वाच्या बातम्या
-
गुजरात - रोड सेफ्टीच्या नावाने दांडिया करून झाल्यावर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती हटवली
गुजरातमधील विजय रूपानी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे गुजरातच्या शहरी भागात दुचाकी चालविणाऱ्या लोकांना हेल्मेट घालणे सक्तीचे राहणार नाही. याची अधिकृत घोषणा गुजरात सरकारचे परिवहन मंत्री आर.सी. फलडू यांनी केली. (Chief Minister of Gujarat Vijay Rupani)
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका न आल्याने गर्भवतीला खांद्यावरून रुग्णालयात आणलं
रूग्णाला खांद्यावर घेऊन रुग्णालयाकडे घेऊन जाताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र तामिळनाडूत इरोड येथील गावातील पायाभूत सुविधांच्या बट्याबोलामुळे वेगळीच घटना समोर आली आहे. येथे गर्भवती महिलेला नातेवाईकांनी खांद्यावरून रुग्णालयात पोहोचवलं. कुटुंबाला तब्बल ६ किलोमीटर चालत जावे लागले. त्यानंतर गर्भवतीला रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
युपी: लहान मुलांच्या मिड-डे जेवणात मृत उंदीर; ९ मुलांची प्रकृती खालावली
मिड-डे मील घोटाळा प्रकरणात भारतीय जनता पक्ष शासित उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अनेक वेळा मिड-डे जेवणामध्ये मुलांना केवळ मीठ आणि ब्रेड दिले जातात. तर अनेकदा एक लिटर दुधात बादलीभर पाणी मिसळून तब्बल ८१ मुलांना पिण्यास दिले जाते. मात्र आता जेवणाची गुणवत्ता विकोपाला गेल्याचं चित्र आहे, कारण मिड-डे जेवणात मृत उंदीर सापडल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंड- महिला शिक्षिकेच्या खुनातील आरोपी भाजपचा उमेदवार; मोदींकडून जोरदार प्रचार
झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले डॉ. शशिभूषण मेहता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत व्यासपीठावर स्थान मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिभूषण मेहता यांच्यावर खुनाचा आरोप असून ते सध्या जामीनावर आहेत. परंतु, महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, ते आज चक्क पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर दिसले.
5 वर्षांपूर्वी -
प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती; फडणवीस यांच्यावरील खटल्याची पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आज देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सीमा पोलीस दलातील सहकाऱ्यांचा एकमेकांवर गोळीबार; ६ जवानांचा मृत्यू
इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP) एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ६ जवान ठार झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाड़ून आत्महत्या केली. छत्तीसगड येथील नारायणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. त्यांच्यात सुट्टीवरून वाद झाल्याचं समजतं.
5 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद स्वामी भारतातून पळाला अन थाटलं स्वतःच हिंदू राष्ट्र
बलात्काराच्या आरोपा नंतर देश सोडून गेलेला ‘स्वयंभू महाराज’ नित्यानंद आता एका देशाचा मालक झाला आहे. नित्यानंद जेव्हा देशापासून पळाला तेव्हापासून त्याचा शोध भारतातील पोलीस यंत्रणा घेत आहे. परंतु आता त्यांने एक देश बनविला आहे असं समोर आलं आहे. जगातील कोणत्या कोपऱ्यात नेमका लपला आहे हे अद्याप माहित नसलं तरी नित्यानंद यांनी संबंधित देशाचे नाव ‘कैलासा’ ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंड निवडणूक: मी व्यापारी आहे, मला गणित चांगलं येतं: अमित शहा
मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी आपल्या भाषणामधून नाराजी व्यक्त केली.मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी आपल्या भाषणामधून नाराजी व्यक्त केली. (Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Rally for Jharkhand Assembly Election 2019)
5 वर्षांपूर्वी -
याआधी चौकशी व्यवस्थित न झाल्याने न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी: हुसेन दलवाई
नागपूर येथील गाजलेले न्या. लोया यांच्या मृत्युप्रकरणी काँग्रेस नेते हुसने दलवाई यांनी मोठी मागणी केली आहे. जस्टीस लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. लोया यांचा खून कसा झाला याचा नीट तपास झाला पाहिजे. ही चौकशी व्यवस्थित झाली नाही असा आरोप त्यांनी केली आहे. याबाबत हुसैन दलवाई यांनी सांगितले की, न्या. लोया यांच्या खुनाचा तपास नीट केला नाही. त्यांचा खून का झाला? ही चौकशी झाली पाहिजे. या खूनामध्ये दहशतवादी संघटनेने तसेच विशिष्ट विचारधारेचा समावेश आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
INX Media: पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात (INX Media Money Laundering Case) तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज, बुधवारी त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे चिदंबरम तब्बल १०६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. (Former Union Finance Minister P Chidambaram Got bail From Supreme Court of India)
5 वर्षांपूर्वी -
पवारांचं बोट सोडलं? झारखंडमध्ये मोदी म्हणाले 'करिया मुंडांचं बोट धरून राजकारण शिकलो'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात एवढं काही बोलून ठेवलं आहे की ते त्यांना देखील आठवत नसावं. महाराष्ट्रात सहानुभूती मिळावी म्हणून एका मंचावर ‘मी शरद पवारांचं बोट धरून राजकरण शिकलो’ असं म्हणाले होते. वास्तविक त्यावर स्वतः शरद पवारांनी देखील मोदींची फिरकी घेतली होती आणि माणूस बोलण्यात ‘लय हुशार’ अशी खेड्यातल्या शैलीत त्यांचा समाचार दुसऱ्या एका कार्यक्रमात घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे राम मंदिर देखील भाजपला वाचवू शकणार नाही: खा. सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करत आले आहेत. तसेच सध्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना त्यालाच अनुसरून सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, तसेच अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. ‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: मागणी असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी: शरद पवार
सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे 10 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. आता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी जस्टील लोया प्रकरणाच्या चौकशींसदर्भात विधान केलं आहे. जर, मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी, असे पवार यांनी म्हटलंय.
5 वर्षांपूर्वी -
सुधरा रे! रेल्वे इंजिनची डिझेल टाकी लिकेज असल्याचं कळताच भांडी घेऊन भरायला जमले
आपल्या देशात लोकं कुठे शहाणपणा दाखविण्या ऐवजी बेजवाबदारीने वागतात हेच वेळोवेळी समोर आलं आहे. तसाच प्रकार कर्नाटकात घडला आहे तो देखील प्रत्यक्ष रेल्वेच्या बाबतीत हे भीषण म्हणावं लागेल. बंगळुरू ट्रेन इंजिनच्या डिझेलची टाकी लिकेज असल्यामुळे संबंधित रेल्वे याल्वीगी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही: भाजप खा. निशिकांत दुबे
संसदेमध्ये आज घसरत चाललेल्या जीडीपीच्या मुद्यावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुक्ताफळे उधळली. जीडीपीचा जास्त उपयोग होणार नाही असे विधान त्यांनी केले. “जीडीपी १९३४ साली आला. त्याआधी जीडीपी वैगेर काही नव्हता. फक्त जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत मानून काहीही साध्य होणार नाही. भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही” असे निशिकांत दुबे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ! जनतेचे हक्काचे ४० हजार कोटी केंद्राकडे पाठविण्यासाठी फडणवीस ३ दिवस मुख्यमंत्री झाले
‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे (BJP MP Anant Kumar Hedge) यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. प्रियांका रेड्डीवर सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळले; राज यांच्या त्याच मागणीची चर्चा
हैदराबादमध्ये बुधवारी प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गोव्यात देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार?
देशाच्या राजकारणाला महाराष्ट्रातील महाविकासआघाडीच्या निमित्ताने कलाटणी मिळाली आहे. या महाआघाडीने मोदी-शहा जोडीला अक्षरशः नामोहरम करून सोडले आहे. त्यात महत्वाची भूमिका बजावली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे सर्वश्रुत आहे. मात्र महाराष्ट्रात सत्तापालट करण्यात यश आलेलं असताना आता गोव्याच्या राजकरणात नवी आघाडी जन्माला येणार आहे असं स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेबांसाठी काहीही! भिडली पोरगी भाजपाला अन ऑपरेशन लोटसच्या पाकळ्याच गळाल्या
महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला सकाळी राजकीय भूकंप झाला आणि राज्याने सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा बातमी बघितली. मात्र त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या खऱ्या एकीची कसोटी होती. विशेष म्हणजे यावेळीच खऱ्या अर्थाने शिवसेना, राष्टवादी आणि काँग्रेस एकमेकांसोबत विश्वासाने एकत्र आल्याचे पायाला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष नसल्याचा संदेश देण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा: सविस्तर वृत्त
देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष जरी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत असला तरी देशात त्यांची प्रतिमा ही अल्पसंख्यांकधार्जिणी असल्याचं सर्वश्रुत आहे. भारतीय जनता पक्षाने देशात कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभरात पक्षाचा विस्तार केला आहे. दरम्यान, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचं नैतृत्व हे हिंदू विरोधी असल्याचं सात्यत्याने लोकांच्या मनात बिंबवलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY