महत्वाच्या बातम्या
-
उशिरा सुचलेलं शहाणपण? गोडसे विधानावरून प्रज्ञा ठाकूरची संरक्षण समितीवरून हकालपट्टी
बुधवारी लोकसभेत एसपीजी (SPG) संशोधन बिलावर चर्चा सुरु होती. यावर डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी आपले मत मांडले. यावेळी नथुराम गोडसेंच्या एका विधानाचा संदर्भ देत होते. यावेळी भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांनी त्यांना थांबवत तुम्ही एका देशभक्ताचे उदाहरण कसे काय देऊ शकता, असा सवाल केला होता. यावरून लोकसभेत गदारोळ उडाला होता. आज प्रज्ञा सिंह ठाकूरना संरक्षण मंत्रालयाच्या समितीच्या सल्लागार पदावरून काढून टाकल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'KG टू PG' मोफत शिक्षणावरून आदित्य यांना लक्ष केलं तोच मुद्दा झारखंडच्या जाहीरनाम्यात
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईतील केजी टू पीजी मोर्चात पूर्वीच्या काँग्रेस सरकार आणि विद्यमान भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या युती सरकारवर देखील प्रचंड टीका केली होती. देशात आणि राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाला आणि त्यावेळी आपलं सरकार आलं असं वाटलं होतं. मात्र त्यानंतर २ वर्षांत कोणताही बदल न झाल्यानं विराट मोर्चा काढावा लागला असा घणाघात त्यांना युती सरकारवर देखील केला होता. तसेच जर परिस्थिती जैसे थेच राहणार असेल तर मग आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, अशी जहरी टीका त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या केली होती.
5 वर्षांपूर्वी -
बॅनरवर मोदींचा फोटो लावून आदित्य ठाकरे आणि सेनेच्या आमदारांनी मतं मागितली: अमित शहा
राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापले दिसले, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी लाट वेगाने ओसरते आहे; अनेक राज्य भाजपमुक्त होण्यास सुरुवात
२०१४ नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मोदी लाटेत देशभर जोरदार प्रसार होऊ लागला. त्यानंतर अनेक राज्यात विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि त्यात देखील मोदी लाटेचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यानंतर उन्मत्त भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नैत्रुत्वाच्या डोक्यात हवा गेल्याच दिसू लागलं आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे वेळोवेळी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला गेला. त्यात जम्मू काश्मीर सारख्या राज्यात काँग्रेसला बाजूला करण्यासाठी थेट पक्षीय विचारधारा बाजूला ठेवत पीडीपी’सोबत संसार थाटला होता.
5 वर्षांपूर्वी -
लोकशाहीचा मार्ग! भाजपला धक्का! उद्या बहुमत चाचणी..गुप्त मतदान नाही..घोडेबाजाराला लगाम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय राखून ठेवलेला आपला निर्णय देणार आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. त्या शपथविधीविरोधा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २ दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार सुनावणी झाली. सोमवारी कागदपत्र सादर करण्यात आले आणि दोन्ही पक्षाकारांची बाजू न्यायालयानं ऐकून घेतली आणि आपला निर्णय राखून ठेवला होता आणि त्यावर आज अंतरिम निकाल देणार असल्याचं म्हटलं जातं होतं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे; चिराग पासवान यांची भाजपवर टीका
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Shivsena, NCP and Congress) केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश देणार आहे. दोन्ही बाजूंकडून सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारचा शपथविधी उरकण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासमताची तारीख लवकरात निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करत या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: दहशतवादी हल्ल्याला ११ वर्ष पूर्ण; तर शहिदांचा अपमान करणारी व्यक्ती संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत सदस्य
२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सत्तास्थापना: उद्या सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देण्याची शक्यता
आज देखील राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. शनिवारी पहाटे पासून महाराष्ट्रातील राजकारणाला एक अनाकलिय वळणं मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतचा कालवधी देण्यात आले आहे. रविवारी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ताकोंडीवर सुनावणी झाली. दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर उद्या यावर न्यायालय अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांच्या सह्यांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं: अभिषेक मनू सिंघवी
सिंघवी राष्ट्रवादीच्या वतीनं युक्तीवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, ‘आमदारांचं पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आलं. राज्यपालांची फसवणूक करण्यात आली. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आलं. दोन्ही पक्ष बहुमत चाचणीसाठी तयार आहे. मग उशीर कशासाठी केला जातोय. एकतरी आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेला आहे का? तसं सांगणार पत्र आहे का? न्यायालयानं दिलेले जुने आदेश डावलता येणार नाही. त्यामुळं हंगामी अध्यक्ष नेमून बहुमत चाचणी आजच व्हायला हवी,’ अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जस्टीस खन्ना यांनी विचारलं 'त्या आमदारांचा आता पाठिंबा आहे का'...पुढे?
भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
शपथविधी विरोधातील शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सकाळी सुनावणी
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती तिन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक विजय झाला होता. मग शिवसेना पहिल्या दिवसापासून कुणाच्या इशाऱ्यावरुन वागत होती? असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का? असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ! भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त
आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून भारतीय जनता पक्षाला मोठी रक्कम दान म्हणजे पार्टी फंड म्हणून मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे इक्बाल मिर्ची या अंडरवल्ड’मधील कुप्रसिद्ध व्यक्तीबरोबर व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून हीच कंपनी ईडी’च्या चौकशी फेऱ्यात असल्याचं वृत्त ‘द-वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबध असणारा इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.
5 वर्षांपूर्वी -
'निवडणूक रोखे योजना' विरोधात काँग्रेस खासदारांची संसदेबाहेर जोरदार निदर्शनं
सध्या दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने काँग्रेसने भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात देशाच्या अर्थकारणाच्या बाबतीत महत्वाचा आणि चर्चेचा ठरणारी ‘निवडणूक रोखे योजना’ सध्या विरोधकांच्या रडारवर आहे. याच योजनेच्या माध्यमातून भाजपने बक्कळ पक्ष निधी मोठ मोठ्या कोर्पोरेट्स आणि श्रीमंतांकडून प्राप्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था खालावत असली तरी भाजपचा पक्ष खजाना मात्र तुडुंब वाहत असल्याचं माहितीच्या अधिकारातच उघड झालं आहे. त्यामुळे काँग्रेसने आज संसद भवनाच्या बाहेर जोरदार निर्दर्शन केली.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल; स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी गुरुवारी दिली. नित्यानंद आणि त्याच्या दोन शिष्यांविरोधात पोलिसांकडून पुराव्यांची जमावजमव सुरू आहे. बुधवारी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर अपहरण आणि मुलांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहिदांचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत सदस्यपदी
मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.
5 वर्षांपूर्वी -
दुर्दैवी! कंपनीत नोकरकपातीच्या धास्तीने सॉफ्टवेअर इंजीनिअर मुलीची आत्महत्या
देशभरात कर्जबाजारीपणामुळे तसेच इतर नैसर्गिक आपतींमुळे देशोधडीला लागलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळतं. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याची आकडेवारी अनेकदा वेगवेगळ्या अहवालात समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापनासंदर्भात शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची निर्णायक बैठक
एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित असून राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्याचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची मोदींसोबत तब्बल पाऊण तास चर्चा
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरु होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस
मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News