महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती
राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दहशतवाद संपविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा- युरोपियन युनियन शिष्टमंडळातील खासदार
जम्मू-काश्मीरमध्ये ‘कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात युरिपियन युनियनच्या २३ खासदारांचा एक गट भारताला पूर्ण पाठिंबा देईल, असं या खासदारांपैकी एकाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं . मात्र यावेळी स्थानिक काश्मिरी माध्यम प्रतिनिधींनी समावेश घेतला नाही. दरम्यान, मंगळवारी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने लष्कराच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित केली आणि त्यानंतर डाल सरोवर तलावाकडे जाण्यासाठी निघाले.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली महिला सुरक्षा; उद्यापासून बसमध्ये १३,००० मार्शल तैनात होणार: केजरीवाल
बसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सार्वजनिक बसेसमधील मार्शलची संख्या वाढवून जवळपास १३,००० केली जाईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘मंगळवारपासून अतिरिक्त मार्शल बसगाड्यांमध्ये बसण्यास सुरवात करतील. सध्या दिल्लीत सुमारे ४,४०० बस मार्शल आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कितीही कायदे करा, मुस्लिम जास्तीत जास्त मुलं जन्माला घालणारच: अजमल
दोनपेक्षा अधिक अपत्यं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. यावरुन ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाम सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. इस्लाम केवळ दोन मुलं जन्माला घालण्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना या जगात यायचंय, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं अजमल यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये प्रवेश करणारे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर पोटनिवडणुकीत पराभूत
केवळ महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतच नव्हे, तर गुजरातमध्येही भाजपाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमधील ६ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने बायड व थाराद या विधानसभा जागा गमावल्या असून कॉंग्रेसचा विजय झाला.
5 वर्षांपूर्वी -
हरयाणा निवडणुकीत मोदी हवा ओसरली; राहुल गांधींचा संयमी प्रचार फलदायी
एकतर्फी विजय मिळवून हरयाणात सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आज जोरदात धक्का बसला. आज झालेल्या हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीचा कौल त्रिशंकू लागला असून, भारतीय जनता पक्षाला ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ३१ जागांवर विजय मिळवला आहे. हरयाणामध्ये जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरली असून, जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर इतरांच्या खात्यात ९ जागा गेल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील १७९७ अनधिकृत वसाहती नियमित करणार: केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी दिल्लीतील अनियमित वसाहतीतील रहिवाशांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीच्या अनियमित वसाहती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये एकूण १७९७ अनियमित वसाहती आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा या वसाहतींमध्ये राहणा तब्बल ४० लाख लोकांना होणार आहे. मात्र, राहिलेल्या ३ वसाहती नियमित होणार नसून, त्यात सैनिक फार्म, महेंद्र एन्क्लेव्ह आणि अनंताराम डेअरीचा समावेश आहे. या अनियमित वसाहती सरकारी जमीन, शेतजमीन आणि ग्रामसभेच्या जमिनींवर बांधल्या जात असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचं मोदींच्या पावलावर पाऊल; केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंडात केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह दिसत आहेत. फडणवीस यांची ही केदारनाथ वारी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केदारनाथाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे फडणवीसांनी मोदींच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर
लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे. २५ लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर झाला आहे. यासह कोर्टाने त्यांना देशाबाहेर जाऊ नका असे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचे सुपुत्र सुनील वाल्टे भारत-पाक सीमेवर गोळीबारात शहिद
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे. ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
5 वर्षांपूर्वी -
Exit Poll: हरियाणामध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी या निवडणुकांच्या निकालाबाबतचे अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. परंतु हरियाणाबाबत एका संस्थेनी वर्तवलेल्या अंदाजाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मीडिया तुम्हाला माझ्याविरुद्ध बोलायला भाग पाडेल; मोदींचा सावध राहण्याचा इशारा
पंतप्रधान मोदी यांनी मला मीडियापासून सावध राहण्यास सांगितलंय. मीडिया तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल,’ असं त्यांनी हसत-हसत सांगितल्याची माहिती नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक पोस्ट: तुम्ही बलात्कार रोखू शकत नसाल तर किमान त्याचा आनंद घ्या
नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या’, हे वाक्य कोणा गुन्हागार अथवा बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाही तर एका लोकप्रतिनिधीच्या पत्नीचे आहे. केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांच्या पत्नीने फेसबुकवर बलात्कारासारख्या घटनेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यांनी नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
INX मीडिया प्रकरण: जामीन मिळूनही चिदंबरम यांना राहावं लागणार कोठडीत
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एका प्रकरणात एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला आहे. मात्र, असे असले तरी देखील चिदंबरम यांनी तुरुंगातच राहावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे चिदंबरम हे २४ ऑक्टोबरपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने वेगवेगळे खटले दाखल केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
युपीच्या शिवसैनिकाकडून कमलेश तिवारींची हत्या करणाऱ्याचा गळा चिरण्यासाठी १ कोटींचं बक्षीस
हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना नेते अरुण पाठक यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओच्या माध्यमातून अरुण पाठक यानं कमलेश यांच्या मारेकऱ्यांचा गळा चिरणाऱ्याला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. व्हिडीओत तो म्हणतो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमध्ये झालेल्या माझ्या भावाच्या हत्येचा निषेध नोंदवतो. त्या मारेकऱ्यांचं मुंडकं उडवणाऱ्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे. त्यासाठी माझी सर्व संपत्तीही विकून टाकेन. कमलेश तिवारींची निर्दयी हत्या करणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत, जोपर्यंत त्यांना पोलीस पकडत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. जेव्हा त्यांचा गळा चिरला जाईल, तेव्हाच मला समाधान मिळेल, असंही अरुण पाठक म्हणाला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली; कमलेश यांच्या आईचा आरोप
हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेत्यावर कट रचण्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. राम जानकी मंदिर प्रकरणामुळे आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप कमलेश तिवारीच्या आईने केला आहे. स्थानिक नेते शिवकुमार गुप्ता यांचे नाव घेत त्या म्हणाल्या की, ते माफिया असल्याने माझ्या मुलाच त्यांच्यासमोर काहीच चालू शकलं नाही. तत्पूर्वी, कमलेश तिवारी यांच्या मुलानेही एनआयएला घटनेची चौकशी करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की आम्हाला प्रशासनावर विश्वास अजिबात नाही.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: EVM मशिन सेट आहे; कोणतही बटन दाबलं तरी मत कमळालाच; भाजप उमेदवाराचा दावा
मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षावर ईव्हीएम’मधील गडबडीवरून विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराकडे कोणतीही प्रचार यंत्रणा नसताना देखील अनेकजण मोठ्या फरकाने आमदार-खासदार बनत असल्याचा आरोप झाला आहे. भाजप ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकतं असा आरोप यापूर्वी अनेकवेळेला झालेला असताना भाजपचे अनेक उमेदवार अनेकवेळा ते खुलेआम स्वीकारताना दिसले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
यूपी: हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठी व्यक्ती होणार सरन्यायाधीश; रंजन गोगोईंनी केली शिफारस
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची सुप्रीम कोर्टाच्या पुढील सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. सीजेआयचे न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी पुढील सरन्यायाधीशांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश बोबडे हे १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती बोबडे हे ४७ वे मुख्य सरन्यायाधीश असतील. २३ एप्रिल २०२१ पर्यंत न्यायमूर्ती बोबडे सरन्यायाधीश पदी असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम जन्मभूमी वादाचा युक्तीवाद पूर्ण; २३ दिवसांमध्ये येणार निकाल
अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला असून तो २३ दिवसानंतर म्हणजेच येत्या १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News