महत्वाच्या बातम्या
-
राम जन्मभूमी वादाचा युक्तीवाद पूर्ण; २३ दिवसांमध्ये येणार निकाल
अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला असून तो २३ दिवसानंतर म्हणजेच येत्या १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अर्थशास्त्राचे नियम कुणाची छाती किती इंचाची आहे, हे बघत नाही: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा
देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणा-या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्था किमान ३ वर्षे तरी रुळावर येणार नाही: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा
देशाची अर्थव्यवस्था सध्या इतकी गंभीर आहे की पुढील किमान तीन वर्षे तरी ती रुळावर येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, अशी भीती माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली. अर्थतज्ञ आणि अर्थमंत्र्यांसह कुणाचेही न ऐकता एकांगी निर्णय घेणारे पंतप्रधान मोदीच या ढासळणा-या अर्थव्यवस्थेला एकटे जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
तिहार जेलमध्ये चौकशीनंतर पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंगन्यूज: सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला
सुप्रिम कोर्टात सुरु असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा ३९वा दिवस होता. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बुधवारी म्हणजे आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्याचे संकेत दिले. यावेळी सर्व पक्षकारांना आज बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करण्याचे आदेश काल देण्यात आले. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमिवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण
देशात उच्चशिक्षित तरुणांच प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तरुणांचा नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोण अजूनही पारंपरिक असल्याच सर्वेक्षणात समोर आलं आहे. देशात आजच्या घडीला खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर घटत आहेत. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे भविष्यात शंभर मनुष्यबळाची कामं मोठ्या प्रमाणावर एक मशीन करणार आहे. त्यामुळे असलेला रोजगार देखील घटणार यात शंका नाही.
5 वर्षांपूर्वी -
रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी अंतिम टप्प्यावर
अयोध्येतील राम जन्मभूमी – बाबरी मशीद जमीन वादाची लांबत चाललेली सुनावणी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दसऱ्यानिमित्त सर्वोच्च न्यायालयाला आढवडाभर सुट्टी होती. त्यानंतर आज, सोमवारपासून ही सुनावणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अयोध्या प्रकरणाची ही सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठासमोर ६ ऑगस्टपासून सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निकाल देण्यासाठी १७ ऑक्टोबरही शेवटची तारीख सर्वोच्च न्यायालयाने घोषित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: फेरफटका विथ कॅमेरा! मोदींनी केली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहीम राबवण्यसाठी ते स्वतः रस्त्यावर उतरताना अनेकदा दिसले आहेत. आज पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा दिसताच मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली. मोदी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करीत सार्वजनिक स्थळावर सर्वांनी कचरा करू नये, स्वच्छता राखल्यास आरोग्य चांगले राहते, असे लोकांना आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: ‘लिंबू-मिरची लावणारे देशाला काय प्रेरणा देणार: नरेंद्र मोदी
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी राजनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तर काहींनी त्यात काय चुकलं, यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असे प्रश्नदेखील उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी -
भीषण! गुजरातमध्ये शिपाई पदासाठी डॉक्टर आणि बी-टेक शिक्षण झालेले उमेदवार
देशात रोजगार देण्यात गुजरात अव्वल असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येच सुशिक्षित बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. कारण गुजरात मधील निरनिराळ्या न्यायालयांमधील वाहनचालक पदांची काही महिन्यापूर्वी भरती सुरु करण्यात आली होती आणि त्यासाठी इयत्ता १२ वी अहर्ता असताना सुद्धा पीचडी, एमटेक, एमबीए, एलएलएबी, एमएससीपासून थेट अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर तरुणांनी वाहनचालक पदांसाठी अर्ज केले होते.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बालाकोट एअर स्ट्राइकचा प्रमोशनल VIDEO प्रसिद्ध
पुलवामात फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकचा व्हिडिओ भारताच्या हवाई दलाने जारी केला आहे. या व्हिडिओत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं दिसतं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांना भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल: आम्ही गुजरात सरकारविरोधात टिप्पणी करत नाही हे भाग्य समजा: सर्वोच्च न्यायालय
गुजरात दंगलींच्या काळात सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्किस बानो यांना दोन आठवड्यात ५० लाखांची भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे. यासोबतच आदेशात घर आणि सरकारी नोकरी देण्यासही सांगण्यात आलं आहे. २००२ गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल: सामूहिक बलात्कार पीडित बिल्किस बानोंना २ आठवड्यात भरपाई द्या: सर्वोच्च न्यायालय
गुजरात दंगलींच्या काळात सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्किस बानो यांना दोन आठवड्यात ५० लाखांची भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे. यासोबतच आदेशात घर आणि सरकारी नोकरी देण्यासही सांगण्यात आलं आहे. २००२ गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
देशातील आर्थिक मंदी मुघल व इंग्रजांमुळे; मोदींनी परिवर्तन केलं: योगी आदित्यनाथ
देशात सध्या सर्वच बाजूंनी बेरोजगारी वाढत असताना सरकारसमोरील अडचणी देखील वाढताना दिसत आहेत. नोटबंदी आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून देशात बेरोजगारी ऐतिहासिक आकडे गाठताना दिसत आहे. ऑटो, बांधकाम, टेक्सटाईल अशा मोठा रोजगार देणाऱ्या उद्योगांना घरघर लागलेली असताना आता त्यात शेअर बाजारातील शेअर खरेदी विक्री संबंधित कंपन्यांना सुद्धा मोठा फटका बसताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज गानसम्राज्ञी लतादीदींचा ९०वा वाढदिवस
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. सप्टेंबर २८, इ.स. १९२९ लता मंगेशकर यांचा जन्म झाला आहे. लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात गोमंतक कलावंतीण मराठा(देवदासी) कुटूंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया.
5 वर्षांपूर्वी -
अत्याधुनिक पाणबुडी 'आयएनएस खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल
‘आयएनएस खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात शनिवारी समाविष्ट करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘आयएनएस खांदेरी’ आणि ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांच्या जलावतरणाचा कार्यक्रम पार पडला. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या तळांना भेटी दिल्या. पण, पश्चिम नौदल कमांडची भेट ‘आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी तयार नसल्याने रखडली होती. नौदल गोदीतील कार्यक्रमात ‘खांदेरी’ नौदलाकडे सूपूर्द करण्याचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता पार पडला.
5 वर्षांपूर्वी -
ज्या घोटाळ्यावरुन ईडीने FIR दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी आणि डोवल यांच्यावरील हल्ल्यासंबंधित गोपनीय माहिती; माध्यमांचे सूत्र इथेही? समाज माध्यमांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ला करण्यासाठी विशेष गट तयार करण्याचं काम पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठीच हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयमधील एक ‘मेजर’ या हल्ल्यासाठी ‘जैश’ची मदत करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
RSS साठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत
‘कलम ३७० हटवल्यानंतर आता आपल्या नोकऱ्या व जमिनी जातील, ही भीती जम्मू-काश्मीरच्या जनतेत पसरली आहे. मात्र, ती अनाठायी असून, देशाची एकता राखण्यासाठी ते कलम हटवणे आवश्यक होते. त्यामुळे तेथील जनतेच्या नोकऱ्या व जमिनी जाणार नाहीत, तसा विश्वास त्यांच्यात पुन्हा निर्माण करू,’ असे आश्वासन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
काही लोकांनी भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे: प्रियांका चतुर्वेदी
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळी अँकरने काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना करणारी धक्कादायक टिप्पणी केल्याचं या व्हिडीओ’मध्ये स्पष्ट दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC