महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानी सत्ताधारी व सैन्य त्यांच्याच जनतेला धोका देतात, हे मी बोललो; मोदी त्याला त्यांची स्तुती समजतात?
पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःकडे सत्ता टिकवण्यासाठीच पाकिस्तानचे सत्ताधारी व लष्कर भारतविरोधी बोलतात: शरद पवार
पाकिस्तानातील सत्ताधारी आणि लष्करी अधिकारी स्वपक्षाकडे सत्ता राहावी म्हणून भारताविरुद्ध बोलत असतात, हे माझे वक्तव्य पाकिस्तानची स्तुती करणारे आहे काय, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी अधिक माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांना शुक्रवारी दिले.
5 वर्षांपूर्वी -
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्काराच्या आरोपात अटक
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं आज सकाळी चिन्मयानंद यांना अटक केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केलं जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचं पथक देखील रुग्णालयात आहे.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्या प्रकरण: सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची नोव्हेंबरची डेडलाइन?
सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची ‘डेडलाइन’ निश्चित केली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी रोखता येणार नाही. सुनावणीसह मध्यस्थीचे प्रयत्न सुरु ठेवता येऊ शकतात, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात २ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी
पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर देऊ लागले आहेत. आता २ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एलआयसी’त २४ वर्षानंतर मेगाभरती; ८००० पदे भरणार
अर्थव्यवस्थेत मरगळ आल्यामुळे रोजगाराच्या संधी घटत असतानाच आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) प्रचंड मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ‘एलआयसी’कडून लवकरच ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमधील तब्बल ८ हजार जागा भरण्यात येतील.
5 वर्षांपूर्वी -
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनास खासदार इम्तियाज जलील यांची दांडी
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी निर्णय घ्यावा: उद्धव ठाकरे
नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. उद्धव यांनी आज आरेतील वृक्षतोडीवरून भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे, त्यामुळे आगामी काळात आरे कारशेडवरून शिवसेना-भाजपा दरम्यान जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात एकच भाषा लादता येणार नाही, अन्यथा जनआंदोलन उभारू: कमल हसन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता अभिनेता आणि राजकीय नेता कमल हसनने उडी घेतली आहे. पूर्ण देशात एकच भाषा लादता येणार नाही, असे करण्याच्या प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत कमल हसन यांनी शहा यांच्या वक्तव्याला विरोध केला.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्या प्रकरण: दोन्ही पक्षकार पुन्हा कोर्टाबाहेर तडजोडीच्या विचारात
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर आता दोन्ही पक्षांकडून पुन्हा न्यायालयाबाहेर मध्यस्थीद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी या प्रकरणातील प्रमुख दोन पक्ष असलेले सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाडा यांनी मध्यस्तीसाठी सुप्रीम कोर्टाने स्थापित केलेल्या मध्यस्थता पॅनलला तसे पत्रच लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणावरून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया देखील 'तमिळ भाषेत'
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणाचं शहांनी समर्थन करताच देशभरातून टीकास्त्र
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: भारतानं मारले पाकचे सैनिक, पाकिस्ताननं पांढरं निशाण फडकवलं
जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं होतं. यानंतर पाकचे सैनिक या घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले.
5 वर्षांपूर्वी -
पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवणं पाकिस्तानच्या हिताचं : रामदास आठवले
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्ताननं भारताला सोपवणं हे पाकिस्तानच्या हिताचं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला पाकिस्तानसोबत रहायचे नाही, हे अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. जर पाकिस्तानला युद्ध नको असेल आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या हिताचा विचार असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते चंदीगडमध्ये बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भविष्यातील स्वप्नांमागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत करावं: सीताराम येचुरी
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली.
5 वर्षांपूर्वी -
संशोधनाचे अजब दाखले! आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला: पियुष गोयल
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली.
5 वर्षांपूर्वी -
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास केव्हाही तयार: लष्करप्रमुख
काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'ॐ' आणि 'गाय' शब्द ऐकताच अनेकांना त्रास होतो: पंतप्रधान
‘ओम’ हा शब्द कानावर पडताच काही लोकांचे कान उभे राहतात, काही लोकांनी ‘गाय’ हा शब्द ऐकला तर त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना करंट लागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देश १६व्या, १७ व्या शतकात गेला आहे असेच या लोकांना वाटते असे सांगताना, याच लोकांनी देशाचे वाटोळे केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पनामा पेपर्सच्या यादीतील भ्रष्ट ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ला इस्त्रोने सॅटेलाईट कंत्राट कसं दिलं? सविस्तर
मागील काही दिवसांपासून चांद्रयान २ अयशस्वी ठरल्यानंतर देशातील वातावरण शास्त्रज्ञांच्या बाबतीत पहिल्यांदाच भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना देखील मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापत ठेवण्यात आलं आहे. त्यात थेट तामिळनाडूमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांचे विशेष मुलाखतीचे कार्यक्रम आखून त्यातून देखील भावनिक बातम्या पेरल्या जात असून, त्यात सिवन यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची वेगळीच व्यूहरचना आखली गेल्याच सध्या समोर येताना दिसत आहे. त्यातही काही ठराविक माध्यम सोडल्यास सर्वच सरकारी रणनीतीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC