महत्वाच्या बातम्या
-
२०११ मधील जगात ३ऱ्या क्रमांकावरील भारतीय अर्थव्यवस्था थेट ७व्या स्थानावर घसरली: वर्ल्ड बँक रिपोर्ट
भारताकडून जगातली सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था होण्याचा मान काढून घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा दृष्टीनं भारताची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं वर्षं 2018मध्ये सुस्त राहिल्यानं त्याचा मोठा भुर्दंड देशाला बसला आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार वर्ष 2018मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामुळेच या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला पछाडत पुढे जाण्याचा मान मिळवला आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फ्रान्स कब्जा मिळवला आहे. जिथे भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावरून घसरून सातव्या क्रमांकावर गेली असून, अमेरिका या यादीत नंबर वनवर कायम आहे.
5 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार प्रकरण संपलं..
काही दिवसांपूर्वीच उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. कारण उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहे. त्याच्या बचावासाठी पद्धतशीरपणे पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला संपवण्याचा कट रचण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपतींकडून विधेयकाला मान्यता; तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू
मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी आणलेलं आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं तिहेरी तलाक विधेयकाला अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. राष्ट्रपतींनी बुधवारी रात्री उशीरा तिहेरी तलाक विधेयकावर स्वाक्षरी केल्याने हा कायदा आता देशात लागू झाला आहे. १९ सप्टेंबर २०१८ पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मंगळवारी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक पास झाल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी पत्रकारांना सामोरे गेले आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
१५ दिवसांचा इशारा: पीकविमा कंपन्यांना दम देऊन काहीच न झाल्याने सेनेचे खासदार मोदींकडे
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले होते.
5 वर्षांपूर्वी -
पत्रात ते म्हणाले! मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे, मला माफ करा!
गेले दोन दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
5 वर्षांपूर्वी -
गोव्यात भाजप सरकारकडून परप्रांतीयांना हुसकावण्यास सुरुवात
महाराष्ट्रात परप्रांतियांचं राजकारण यापूर्वी अनेकवेळा पाहिलं असेल, मात्र त्याच मुद्द्याने सध्या गोव्यात पेट घेतला आहे. गोव्याच्या विविध भागात थेट पोलिसांनाच कारवाईचे आदेश गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले आहेत. त्यानुसार अनेक महत्वाच्या ठिकाणांवरून तसेच सामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या ठिकाणावरून परप्रांतीयांना पोलिसच पळवून लावत आहेत. गोवा सरकारच्या या धडक कारवाईचं स्थानिक लोकांनी देखील कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व बनण्यासाठी मोदींनी ओबामांना कॉपी करण्यास सुरुवात केली होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना डिस्कव्हरीवरच्या मॅन व्हेर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. मोदी जंगल सफारीवर येणार असल्याची माहिती बेअर ग्रिल्सनेच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बेअरच्या घोषणेनंतर समाज माध्यमांवर त्याच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery, तर Bear Grylls हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी मिळणार?
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. भारतीय जनता पक्ष खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला एनडीएचे घटकपक्ष आणि अन्य इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
RSS मुलांना देणार लष्करी प्रशिक्षण, लवकरचं सैनिकी स्कूल स्थापन करणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी यूपीत येथे सैनिकी स्कूल उघडणार आहे. यामध्ये मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
तिहेरी तलाक: मोदींचं सुद्धा लग्न झाले आहे, मग मोदी का नांदत नाहीत? प्रकाश आंबेडकर
मोदी सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत मांडलेले तिहेरी तलाक विधेयक या सभागृहामध्ये गुरुवारी ३०२ खासदारांनी पाठिंबा दिल्याने मंजूर झाले, तर विरोधात ७८ मते पडली. हे विधेयक आता राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात येईल. या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांबरोबरच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू) नेदेखील जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ जनता दल (यू)च्या खासदारांनी सभात्यागही केला.
5 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; कर्नाटकात कमळ फुलले
कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. त्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. जो त्यांनी आवाजी मतदानाने जिंकला आहे. त्यामुळे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार कायम झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उन्नाव बलात्कार घटनेमधील पीडितेच्या गाडीला अपघात; आरोपी भाजप आमदार असल्याने घातपाताचा संशय
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहे. तसेच बलात्कार पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान २: भारतीय शास्त्रज्ञांना श्रेष्ठ म्हणत त्यांचे पगार मोदी सरकारने कापले
दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज(दि.२८) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशीही दुसऱ्यांदा संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो ISRO) शास्त्रज्ञांचं आणि चांद्रयान-२ मोहिमेचं कौतुक केलं. याशिवाय त्यांनी अन्य अनेक विषयांवरही भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
देशात हिंदूंना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र: सरसंघचालक मोहन भागवत
सध्या देशात गोरक्षक आणि मॉब लिंचिंगवरून रणकंदन माजलं असताना आरएसएस प्रमुखांच्या एका विधानामुळे पुन्हा रान उठण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मॉब लिंचिंगचा गंभीर विषय आणि भारतात या घटनांनी घेतलेलं उग्र रूप आणि त्याचे दुष्परिणाम याची चर्चा थेट अमेरिकेच्या संसदेत आणि संयुक्त राष्ट्राच्या मंचावर घडली होती. तसेच त्यावर उपाययोजना करण्याची विनंती भारत सरकारला करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज स्मृतिदिन
अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१- २७ जुलै २०१५) यांचा आज चौथा स्मृतिदिन. वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती ह्या सर्व पदांवर कार्य केलेले एक थोर भारतीय म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी -
आजम खान माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा: लोकसभा अध्यक्ष
गुरुवारी सपा खासदार आजम खान यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आज लोकसभेत गदारोळ सुरू होता. आजम खान यांनी माफी मागावी. तसंच त्यांना निलंबित करावं, अशी मागणी भाजपने केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणावर सर्व पक्षांसोबत बैठक घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता चालक परवान्यासाठी 'आधार' हवा
मोटार वाहन दुरुस्ती बिल आज लोकसभेत पास झालं आहे. हे बिल जर लागू झालं तर चालक परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य असेल. परंतु हे बिल लागू करण्यासाठी राज्यसभेमध्ये हे बिल पास व्हायला हवं. या बिलामध्ये ट्राफिक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनासह ६१ सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, त्या ४९ जणांच्या पत्राला उत्तर
देशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त ४९ प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत संताप व्यक्त केला होता. मात्र आता या ४९ प्रतिभावंतांना ६१ प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता कर्नाटकात देखील भाजप राज्य, येडियुरप्पा यांचा आज शपथविधी
कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भाजप नेते येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहेत. त्यांनी राज्यपालांशी भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News