महत्वाच्या बातम्या
-
आता कर्नाटकात देखील भाजप राज्य, येडियुरप्पा यांचा आज शपथविधी
कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भाजप नेते येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहेत. त्यांनी राज्यपालांशी भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज २०वा कारगिल विजय दिवस; देशभरात विविध कार्यक्रमांच आयोजन
कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्याचंच स्मरण म्हणून आज देशभरात ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली वाहिली जाते.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! मोटर वाहन कायद्यात सुधारणा, दंडाची नवी रक्कम तुमचा पगारच घेऊन जाईल
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मोटर वाहन सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर ते सभागृहात आवाजी मतदानाने मंजूरही झाले आहे. या दुरुस्ती विधेयकात महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सर्व राज्यांना हे स्वीकरण बंधनकारक नसलं तरी जे राज्य सरकार ते स्वीकारेल त्यांना देखील या दंडाच्या रकमेमुळे रोष पत्करावा लागू शकतो.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी हे केंद्रातील सर्वात चांगलं काम करणारे मंत्री: खासदार इम्तियाझ जलील
औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी पुन्हा त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचं उदाहरण समोर ठेवलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील खासदार म्हणून मुद्देसूदपणे संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कामाची स्तुती केली होती, तसेच त्यांच्यातील अभ्यासू पत्रकार देखील त्यावेळी सभागृहाने अनुभवाला होता.
6 वर्षांपूर्वी -
लोकपालचं आश्वासन देणारे मोदी लोकपाल सोडा, उलट RTI कायदा २००५ सुद्धा संपवणार? सविस्तर
केंद्र सरकार सध्या आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. यावरून देशभरातील विरोधकांनी तसेच कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकार या दुरुस्तीच्या माध्यमातून माहिती अधिकार कायदा समाप्त करू इच्छित आहे. यामुळे देशातील प्रत्येक नागरिक कमजोर होईल अस विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
RTI कायद्यातील सुधारणांच्या विरोधात रस्त्यावर उतरा; अण्णांचं तरुणांना आवाहन
कालच्या RTI संबंधित बातमीनंतर देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्र सरकार सध्या आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. त्यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. तसेच तरुणांनी या विरोधात आवाज उठवावा अस आवाहन केले आहे. राळेगणसिद्धी येथे पत्रकार परिषदेत बोलताना जनता मालक असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे सेवक काय काम करतो हे लोकांना माहित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा कायदा आणला.
6 वर्षांपूर्वी -
धनशाही पुढे लोकशाही हरली! कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार कोसळलं
काँग्रेस, जेडीएसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरल्याने कुमारस्वामींचं सरकार अखेर कोसळलं आहे. काही दिवसापासून धनशक्तीच्या आधारे खेळला गेलेला हा डाव आज अखेर संपुष्टात आला असून, धनशाहीसमोर लोकशाहीने अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
RTI : संसदेतील त्या सुधारणा कायद्यातील बदलामुळे माहिती आयुक्तच मोदी-शहांच्या नियंत्रणात?
माहिती अधिकार कायदा बनत असताना संसदेच्या स्थायी समितीने आपल्या रिपोर्टमध्ये क्र.१२.२(xii) या मुद्द्यात माहिती अर्जांवर अपिल करायची वेळ आल्यास त्यासाठी ‘स्वायत्त’ व्यवस्था असावी असं सुचवलं होतं. किंबहुना हाच या कायद्याचा सार आहे असंही म्हणलं होतं. या समितीचे एक सदस्य होते ते म्हणजे त्यावेळी राज्यसभेचे खासदार असणारे आणि आत्ताचे आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद!
6 वर्षांपूर्वी -
आंध्रप्रदेश: भूमिपुत्रांना खाजगी नोकरीत ७५% आरक्षण; महाराष्ट्रात ५ वर्ष केवळ निर्धाराच्या मुठी आवळल्या
देशात रोजगाराच्या बाबतीत प्रथमच ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. कारण आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ७५ टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे आणि सर्वांना काटेकोरपणे अमलात आणावं लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने तसा आदेशच प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही : परराष्ट्र मंत्रालय
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकन सकारकडून मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प सरकार देखील पाकिस्तानवर दहशतवादी कारवाई रोखण्यात तिथल्या विद्यमान सरकारला अपयश येत असल्याच्या करणारे ट्रम्प सरकार इम्रान खान यांच्यावर प्रचंड नाराज आहे. परिणामी जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आपल्या शिष्टमंडळासोबत गेले असता त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर कोणीही फिरकले नाहीत. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि शिष्टमंडळाला चक्क ट्रेनने प्रवास करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
6 वर्षांपूर्वी -
मतदारांची माहिती आधार'ला जोडावी; मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र: मनसेकडून शंका
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येताच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला लेखी पत्र लिहून मतदारांची माहिती ‘आधार’ला जोडावी अशी विनंती केली आहे. मात्र यापूर्वी आधारचा डेटा चोरी झाल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यामुळे याच पत्राला अनुसरून मतदाराची महत्वाची माहिती किती सुरक्षित यावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभिमानास्पद! गोल्डन गर्ल हिमा दासने जिंकले ५ सुवर्णपदक
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्डन गर्ल आणि धावपटू हिमा दासने सुवर्ण धमाकाच केला आणि देशाची शान जगभरात उंचावली आहे. कारण आता अजून एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. हिमाने आता ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. यापूर्वी हिमाने ४ सुवर्ण पटकावली आहेत. त्यामुळे आता तिच्या खात्यात एकूण ५ सुवर्ण पदकं झाली आहेत. भारतासाठी अशी भव्य कामगिरी करणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणात कॉंगेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शीला दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रशासन हाताळणाऱ्या हुशार नेत्या होत्या. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेने ड्रोन पाडल्याने इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त; तणाव वाढला
इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दरम्यान परिस्थिती चिघळल्यास त्याचे थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील होतील असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खिदी-खिदी हसून पाठिंबा देतात की बेंच वाजवून? भारती पवार यांना पाठींबा देण्यासाठी थांबलेलो: रक्षा खडसे
भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा संसदेमधील हसण्याचा एक व्हिडिओ समजा माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. यावरून रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र त्यांच्या एकूणच स्पष्टीकरणावरून त्यांची किंवा करावी असंच म्हणावं लागेल. देशाने आजपर्यंत संसदेत एवढ्या विषयाला किंवा मुद्दयाला पाठिंबा देताना समर्थन करणारे खासदार हे हाताने बेंच वाजवून समर्थन देतात हे पाहिलं आहे. मात्र संसदेतील बेंचखाली तोंड लपवून खिदी-खिदी हसून समर्थन देण्याचा जावईशोध खासदार प्रितम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रतिक्रयेतून लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: कुमारस्वामी सरकारला सायंकाळी ६ पर्यंतची अंतिम मुदत
कर्नाटकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभेत कालपासून सुरू असलेले राजकीयनाटक आज देखील पाहिल्याप्रमाणेच सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर बहूनत सिद्ध करण्याचा दबाव आणखी वाढला असून थोड्या वेळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. कारण आज सायंकाळी ६ वाजेर्यंतची त्यांना मुदत देण्यात आली आहे. या अगोदर त्यांना आज दुपारी १:३० वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: सत्तेसाठी चड्य्या, चादरी व उशा घेऊन भाजपा आमदारांचा विधानसभेतच मुक्काम
कर्नाटक राज्यात आमदार फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यांना सहज उपलब्ध नसणारे प्रतिनिधी आणि पंचतारांकित आयुष्य जगणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्तेच्या लालसेपोटी विधानसभेत चड्य्या, चादरी व उशा घेऊन मुक्कामाला पोहोचले आहेत. भारतीय लोकशाही अक्षरशः टांगणीला लावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
माढा संदर्भात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट
एनसीपीचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या भेटी दरम्यान महाराष्ट्रात गाजत असलेल्या नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची प्रलंबित प्रश्नावर महत्वाची चर्चा झाल्याचं खासदार नाईक निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today