महत्वाच्या बातम्या
-
पेट्रोल ९, तर डिझेलचे दर ४ रुपयांनी वाढण्याची शक्यता; पुन्हा महागाईचा भडका उडणार?
काल संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यामुळे इतर देखील दुष्परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण संबंधित निर्णयामुळे आगामी काळात पेट्रोलचे दर ९ रुपये तर डिझेलचे दर ४ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असं असला तरी ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जाईल असं म्हटलं जातं आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय अर्थसंकल्प २०१९: काय महाग आणि काय स्वस्त?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पातून शेतकरी तसेच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक सामान्यांशी निगडित असलेला विषय म्हणजे घर खरेदीसाठी मिळत असलेली २ लाखांची सूट ३.५ लाखांवर आणण्यात आली असून, एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव १ रुपयानं वाढणार असून, त्याचा वाहन चालकांना फटका बसणार हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रिफकेस गेली, कारण अर्थसंकल्पाला आपण 'चोपड्या' म्हणतो: कृष्णमूर्ती सुब्रमणियन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार-२ च्या पहिला अर्थसंकल्पात सामन्यांसाठी आणि उद्योगांसाठी नेमकं काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित झालं आहे. त्यात भर म्हणजे अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामन यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. पुढील आर्थिक वर्षात देशाचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज देखील काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना सीतारामन यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
आज अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प मांडणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सादर केलेल्या २०१८-१९ च्या आर्थिक सर्वेक्षणातून त्यांच्यापुढे किती मोठे आव्हान उभे आहे त्याची स्पष्ट कल्पना सर्वांना आलीच असेल. दरम्यान सर्वेक्षणात जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे, चीन-अमेरिका व्यापार युद्धामुळे मंदी वाढण्याची शक्यता दाट झालेले असताना भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढ देखील ७.२ टक्क्यावरून ६.८० टक्क्यांवर आली आहे, हे देखील आपल्याला मान्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काश्मीरमधून कलम ३७० हटवाच, शिवसेनेची आग्रही मागणी
एनडीए’चा केंद्रातील सहकारी पक्ष शिवसेनेने पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधून कलम ३७०हटवण्याची मागणी सामना वृत्तपत्रातून केली आहे. तसेच काश्मीरच्या समस्येचं मूळ हे काश्मीरमध्येच आहे, पाकिस्तानात नाही असं देखील नमूद केलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट अजून ६ महिन्यांनी वाढवण्याच्या निर्णयाचे देखील समर्थन करण्यात आले आहे. तसेच काश्मीरमधला मुख्य मुद्दा तिथल्या निवडणुका नसून तर कलम ३७० हटवणे आहे असे देखील शिवसेनेने मुखपत्रातून म्हटलं आहे. दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला या दोन नेत्यांवर देखील सडकून टीका करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमच्या लाखो युजर्सना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत: फेसबुक
समाज माध्यम आज प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत आणि त्यात फेसबुक, व्हॉट्स अँप आणि इंस्टाग्राम हे सर्वप्रथम डोळ्यासमोर येतंच. परंतु काल म्हणजे बुधवारी दुपारपासून या सर्व सेवांचा वेग अत्यंत मंदावला होता आणि लाखो वापरकर्त्यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला होता. नेटकऱ्यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अँप वापरताना प्रचंड अडचणी येत होत्या. काल फोटो आणि व्हिडिओ पाठवताचा वेग कमालीचा संथ झाला होता. या सगळ्याबाबत आता फेसबुकने चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या लाखो युजर्सना जो प्रचंड त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत असं फेसबुकने ट्विटकरून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जून महिन्यात देशाची बेरोजगारी पाहिल्यापेक्षाही सर्वोच्च पातळीवर: CMIE अहवाल
रोजगाराच्या मुद्द्यावर काँग्रेस नेहमीच मोदी सरकारवर टीका करत आलं आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीनंही २ वर्षांतील उच्चांकाला मोडीत काढत जून महिन्यात सर्वोच्च पातळी गाठली आहे. काही महिन्यांपूर्वी CMIE ने प्रसिद्ध केलेल्या बेरोजगारीच्या अहवालानुसार, देशात बेरोजगारीचा दर एप्रिलच्या तीन हप्त्यांमध्ये ७.९ टक्क्यांहून ९.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या दोन वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली होती.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून ३३ ठार तर २२ जखमी
जम्मू काश्मरीच्या किश्तवाडमध्ये एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झालं आहे ज्यामध्ये तब्बल ३३ प्रवासी ठार झाले आहेत. तर एकूण २२ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
तरुण ४५ वर्षातील ऐतिहासिक बेरोजगारीत अडकले; तर मोदी ४४ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीत: सविस्तर
आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क घेण्यात आल्याचा पुनोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते ‘मन की बात’ बोलत आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. नव्याने पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘मन की बात’ कार्यक्रम आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेलबाबत खुलासे करणाऱ्या 'द हिंदू' सहित ३ वृत्तपत्रांवर सरकारी जाहिरात बंदी
२०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर सातत्याने पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. अनेक पत्रकारांनी देखील सरकारच्या कोणत्याही धोरणांवर टीका केल्यास त्यांना धमक्या येत असल्याची विधानं केली होती. त्याचाच एक प्रत्यय पुन्हा येऊ लागला आहे आणि सरकार विरोधात बोलणाऱ्या वृत्तपत्रांचं अर्थकारण संपवण्याचा डाव आखला जातो आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण केंद्र सरकारने देशातील तीन मोठ्या वृत्तपत्रांना सरकारी जाहिराती देण्यावर बंदी घातली आहे आणि त्यात राफेलचा मुद्दा जोरदारपणे उचलणाऱ्या ‘द हिंदू’ या वृत्तपत्राचा देखील समावेश आहे असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाणीसंकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावणार
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पसरला असून भविष्यत परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जर केंद्र सरकारने आतापासूनच भविष्यात येऊ घातलेल्या संकटावर मात करण्यासाठी योग्य नीती वापरली नाही तर देशावर अत्यंत भीषण पाणी संकट ओढवू शकते. त्यामुळेच केंद्र सरकारने पाणी संकट आता गांभीर्याने घेतल्याचे वृत्त आहे. पाणी संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय योजना बनविण्याचं काम सुरु केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
खबरदारीचा उपाय म्हणून विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण वैध आहे, अपवादात्मक स्थितीत ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं, असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायद्यावर काल शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, देण्यात आलेलं १६ टक्के आरक्षण कमी करून १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या निकालावर, मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे देखील सांगितलेय. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सातत्याने कायदेशीर बाजू लढणारे मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बोगस मतदान: 'एक देश एक 'इलेक्शन कार्ड'पेक्षा सरकारला 'एक देश एक रेशनकार्ड' महत्वाचं?
सध्या एक देश, एक निवडणूक यावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. विरोधकांनी एक देश, एक निवडणूक या चर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. मात्र सरकारकडून आता २०२४ ,मधील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. कारण आता केंद्र सरकारनं एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू केल्याचं वृत्त आहे. केंद्र सरकार या दिशेनं काम करत असल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी प्रसार माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
जी-२० परिषद: मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन देखील केलं. तर नरेंद्र मोदींनी या भेटीत एकूण ४ महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी देखील अनेक विषयांना अनुसरून चर्चा केली.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही, तर तो समाज माध्यमांवरून आलेला
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. दरम्यान नरेंद्र मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर शायरीच्या अंदाजात निशाणा साधला. त्यावेळी तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना बोचऱ्या शब्दात लक्ष्य केलं होतं. गुलामनबी आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल शायरीच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
...तर मुस्लीम युवकांचं शिर कापून टाकलं जाईल: भाजप खासदार सोयम बापूराव
तेलंगणा येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने देशभर चर्चा रंगली आहे. जर कोणी मुस्लीम युवक आदिवासी मुलींच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचे शिर कापून टाकलं जाईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. आदिलाबाद येथील खासदार सोयम बापूराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे त्यात ते असं विधान करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सामनात आणीबाणीवरून विरोधकांचा चिरकूट असा उल्लेख; पण उद्धव यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचा विसर?
आजच्या सामना संपादकीय मध्ये आणीबाणीवरून मोदींची स्तुती करताना विरोधकांना शेळक्या भाषेत ‘चिरकूट’ असं संबोधण्यात आलं आहे. त्यात आणीबाणीच्या संदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं असलं तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना भेटून आणीबाणीच समर्थन केलं होतं आणि शिवसेनेच्या वाढीसाठी त्याला संधी समजून वेगळीच भूमिका घेतली होती, त्याचा उल्लेख मात्र सामनामध्ये वगळण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पद्मश्री पुरस्काराचा काय उपयोग? आता मला शेतात मजूर कामही मिळत नाही: पद्मश्री दैतारी नायक
डोंगरातून तब्बल तीन किलोमीटरचा कालवा खणल्यानं यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या दैतारी नायक सध्या रोजगार नसल्यानं हालाकीची परिस्थिती जगात आहेत. मात्र पद्मश्री पुरस्कार मिळून देखील रोजचा रोजगार मिळण्यात प्रचंड अडथळे येत असल्यानं चरितार्थ चालवणं कठीण होत असल्याची व्यथा नायक यांनी मांडली. तर मोदी सरकारनं देखील आश्वासन न पाळल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी
भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आणीबाणी: 'हा नवा भारत आहे' सांगणारे भाजप नेते अजूनही जुन्या आठवणीतच मग्न
देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. २५ जून १९७५ रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला तब्बल ४४ वर्ष उलटली आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक खास व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खास बॅनर बनवून राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC