महत्वाच्या बातम्या
-
आचारसंहिता भंग: मोदी-शहांच्या निकालातील दुमत उघड केल्यास जीविताला धोका: निवडणूक आयोग
लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांत निर्दोष जाहीर करणाऱ्या निकालातील दुमताचा तपशील उघड म्हणजे सार्वजनिक करण्याची मागणी निवडणूक आयोगाने स्पष्ट पणे फेटाळली आहे. कारण ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीविताला धोका पोहोचू शकतो, असे कारण निवडणूक आयोगाने दिले आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी तृणमूलच्या खासदारांची निदर्शनं
काल बसपाच्या सर्वेसेवा मायावती यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यावेळी मायावतींनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. तसेच जगातील प्रगत देश देखील बॅलेट पेपरने निवडणुका घेत असताना आणि भारतात सर्वच विरोधी पक्षांचा इव्हीएमला विरोध असताना केवळ भाजप आणि निवडणूक आयोगच त्याच समर्थन करत आहे, असं मायावतींनी अधोरेखित करत वेगळाच संशय व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
ब्रिटीश हेराल्ड: मोदी जगात पॉवरफुल? इथेही खोटी प्रसिद्धी? ते ऑनलाईन मॅगझीन एका भारतीयाचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्ती बनल्याचे ब्रिटीश हेराल्ड’ने २०१९ च्या सर्वेक्षणातून पुढे आले. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि सर्वच प्रसिद्ध प्रसार माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध केल्या. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी स्वतःच्याच वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील एकूण २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता.
6 वर्षांपूर्वी -
मोदींना शिखर धवनच्या दुखापतीची काळजी; बिहारमध्ये चमकी तापाने १६५ बालक मृत्युमुखी पण..?
बिहारमध्ये चमकी तापाचं थैमान अजून सुरु असून मृत बालकांची संख्या १६५ वर पोहोचली असून ३०० जण अद्यापही या अत्यंत गंभीर तापाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाहीत. तसेच इतर इस्पितळांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारी देखील अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. या एकूण मृत बालकांमध्ये ८५ टक्के प्रमाण हे मुलींचे असल्याने इथली परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का?
जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहांच्या कार्यक्रमात योगा करून लोकं गरीब झाले; आयोजकांच्या चटई चोरून पळाले
आज पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत रोहतक येथे योग दिवस साजरा केला. पंतप्रधानांचा कार्यक्रम जवळपास ४० हजार लोकांसह सुरळीत पार पडला पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा कार्यक्रमात लोकांनी चक्क अंथरलेल्या चटई पळवल्या.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा; न्यायालयात याचिका दाखल, २ सरकारी कर्मचाऱ्यांना अटक
उत्तर प्रदेशात रसडा जिल्ह्यातील अठीला गावात पंतप्रधान घरकुल योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपावरून स्थानिक पोलिसांनी दोन सरकारी कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. रसडा गावाचे प्रभारी कोतवाल ज्ञानेश्वर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नियुक्त केलेले नोडल अधिकारी सेंथिल पांडियन सी यांच्याकडे अठीला गावातील स्थानिक लोकांनी लेखी तक्रार करून पंतप्रधान घरकुल योजनेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता.
6 वर्षांपूर्वी -
अशोक गेहलोत काॅंग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आज देखील ते त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे. दरम्यान काँग्रेसला आता गांधी घराण्याव्यतिरिक्त नवा अध्यक्ष मिळणार असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भीषण बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या केवळ १११७ जागांसाठी तब्बल १४ लाख ७१ हजार अर्ज
भारतीय रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) १११७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या जागांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास १३१७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे आहे. यात अर्ज करणारे सर्वाधिक उमेदवार हे महाराष्ट्रातून असल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! देशात २०३० पर्यंत पाणी संपुष्टात येण्याच्या मार्गावर: नीती आयोगाचा रिपोर्ट
देशातील अनेक शहरांमध्ये सध्या दुष्काळामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान आगामी काळात हे संकट अधीकच भयानक होण्याची शक्यता केंद्रीय नीती आयोगाच्या एका अहवालात समोर आली असून त्यानुसार देशात २०३० पर्यंत पाणी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितले आहे. तसेच पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या ही दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांना देखील करावी लागणार आहे. २०२० पासून पाणीटंचाईची तीव्रता वाढेल म्हणजे आगामी काळात तब्बल १० कोटी लोकांवर पाणी संकट येईल.
6 वर्षांपूर्वी -
गरिबी, महागाई व बेरोजगारीवरून लोकांना विचलित करण्यासाठी 'एक देश एक निवडणुकीचा' घाट
एक देश एक निवडणूकवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. परंतु या बैठकीपासून विरोधी पक्षाचे नेते दूरच राहणे पसंत करत आहेत. पश्चिम बंगालच्या राजकारणावरुन ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षापासून दूर राहण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा निर्णय
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची काम करण्याची प[पद्धत वेगळीच समजली जाते. देशातील महामार्ग रस्त्यांचा होत असलेला विकास पाहून गडकरींना रोडकरी असेही संबोधले जाते. महाराष्ट्रातील एक दूरदृष्टी जपणारा केंद्रातील मराठी नेता म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात देखील दळणवळणमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने त्याची समाज माध्यमांवर देखील जोरदार चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जंगलराज! यूपीत पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून व्हायरल
यूपीत कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र असून राज्यात योगी राज आहे की जंगलराज असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल योगी सरकारकडून अनेक दावे केले जातात पण राज्यात महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र अनेक घटनांवरून सिद्ध होत आहे. आता रामपूरमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नोकऱ्यांची कमी! उच्च शिक्षण घेऊन देखील तरुण डिलिवरी बॉय बनत आहेत
देशात सध्या रोजगारावरून परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली असल्याची आकडेवारी समोर आली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. सरकारने देखील एक आकडेवारी मान्य केली आहे जॅमध्ये २०१७-१८ या कालावधीत बेरोजगारी मागील ४५ वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. मात्र विषय केवळ बेरोजगारांचा नसून तो सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकऱ्यांसंबंधित मजबुरीचा देखील आहे.
6 वर्षांपूर्वी -
आसाममधील भाजप सरकार संकटात; सहयोगी पक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण महागात?
भाजपचे आसाममधील सरकारची सत्ता धोक्यात आली आहे. कारण भाजपचा सहयोगी पक्ष आयपीएफटी’ने भाजपवर आरोप करताना थेट दुसरा पर्याय शोधण्याची धमकी देत एकप्रकारे सरकार अल्पमतात आणण्याची धमकी भाजपाला दिली आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आसाममध्ये आयपीएफटी’च्या कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा गंभीर आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटा एअर लाईन्स डुबल्यानंतर, आता जेट सुद्धा दिवाळखोरीत
मागील २ महिन्यांपासून संपूर्ण व्यवसाय ठप्प अवस्थेत असलेल्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीसाठी केवळ एकमेव प्रस्ताव समोर आल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध हवाई कंपनी दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय अखेर राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेट एअरवेजला ८,००० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या व्यापारी बँकांचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेने ही भूमिका स्पष्ट केली आहे. धनकोंच्या बैठकीत जेटबाबतचा हा निर्णय झाल्याचे बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू; विरोधी पक्षनेत्याबाबत संभ्रम कायम
मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज दिवस आहे. दरम्यान या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक विस्कळीत झालेले दिसत आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलेही पाऊल उचललेले दिसले नाही.
6 वर्षांपूर्वी -
विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम
जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने पन्नास षटकात पाच बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव चाळीस षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. परंतु त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.
6 वर्षांपूर्वी -
'ते' ट्विट: सचिनला ट्रोल करणाऱ्या फिल्मी देशभक्तानी भारत-पाकिस्तान मॅचचा मनसोक्त आनंद लुटला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तब्बल ४० हुन अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी पक्षाने समाज माध्यमांच्या आडून मोठं राजकीय भांडवल केल्याचे दिसले. देशात जर त्यानंतर नैसर्गिक देशभक्ती उफाळून आली असती तर उत्तम झालं असतं. मात्र तसं होता, पाकिस्तानला अनुसरून कोणी एखादा विषयावर मत व्यक्त केल्यास त्यांना ट्रॉलर्स’ने झोडपून काढणं म्हणजे समाज माध्यमांवरील एक कलमी कार्यक्रम झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
आधी 'पहेले मंदिर फिर सरकार'; आता उद्धव ठाकरेंचं 'पहेले मंदिर फिर संसद'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या अठरा खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही आधी राममंदिर मग संसद या मागणीनेच सत्तेत आलो आहोत. त्यामुळे उद्यापासून दर्शन घेऊनच खासदार कामाला लागतील, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आम्हाला आधी कायदा बनवून मग मंदिर बांधायचं आहे, अयोध्येत मंदिर बांधणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेला वेगळंच स्वरूप दिलं आहे. स्वतःच्या मंत्रांचा शपथविधी आटपून झाल्यावर शिवसेवर टीका झाल्याने आता त्यांनी ‘पहेले मंदिर फिर संसद’ अशी पळवाट काढणारी घोषणा दिली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC