महत्वाच्या बातम्या
-
रशियन एस-४०० खरेदी व्यवहार: ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी
भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हा व्यवहार थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्याच हिताचा नसेल, असे अमेरिकेकडून सूचित करण्यात आले आहे. तसेच या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या परस्पर भागीदारीवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा कोलमडली, तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील २ डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर काल शुक्रवारपासून संपावर होते. डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ७०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, ६६ मुलांचा मृत्यू
बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने मोठं थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या भयंकर आजाराने आतापर्यंत तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने बिहारमध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. एसकेएससीएच या इस्पितळात ५५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल इस्पितळामध्ये ११ मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जींचा 'राज'बाणा
डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविताना बंगाली भाषा आणि बंगाली अस्मिता कार्ड उघडले आहे. बाहेरच्या लोकांवरून भारतीय जनता पक्षावर नेम धरत, त्यांनी जर आमच्या राज्यात राहायचे असेल तर आमची बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात जरा देखील थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असे देखील ममता म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात
अर्थशास्त्राचे जागतिक विद्वान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, मृदूसालस आणि सुसंस्कृत पंतप्रधान म्हणून ज्यांनी भारताचे १० वर्ष नेतृत्व केले त्या डॉ. मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द भविष्यात राजकीय गणित जुळण्याची आशा मावळल्याने संपुष्टात आली आहे. त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता. पुढील महिन्यात होणार्या राज्यसभेच्या निवडणुकीत डॉ. मनमोहन सिंग हे आसाममधून निवडून येऊ शकत नाहीत. तर तामिळनाडूच्या डीएमके पक्षाने त्यांना पाठिंबा द्यायला नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील २ डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज संपावर आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटना, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र या संघटनांकडून शुक्रवारी (१४ जून) राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग, अन्य विभाग आणि शैक्षणिक दिनक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यादरम्यान राज्यातील रुग्णालयांतील आपत्कालीन रुग्णसेवा सुरू असेल.
6 वर्षांपूर्वी -
खरंच आपलं देशप्रेम क्षणिक झालं आहे? पुलवामा हल्ला ते क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे १६ जूनला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत हे सख्खे शेजारी राष्ट्र; पण पक्के वैरी सातव्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. इतिहास आणि भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बाजी मारेल हे नक्की आहे. पण, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, स्पर्धेवरच बहिष्कार घालावा अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत होते. लोकसभेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली असंच म्हणावं लागेल. कारण देश, ध्वज आणि सैनिकांप्रती असणारी नैसर्गिक देशभक्ती ही कधीच क्षणिक नसते आणि कोणी आपल्यात जागृत करण्याची गरज नसते.
6 वर्षांपूर्वी -
अंतराळस्थानक निर्मितीची भारताची योजना : इस्रो
भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यात देखील आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तीच तारीख -तोच महिना! राज यांच्या व्यंगचित्रातला मोदींचा 'तो' खासगी 'प्लॅन' सत्य ठरला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १३ जून २०१८ मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. त्यात राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षा अथक मेहनतीने उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत उच्च पदावर विराजमान होणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य आणि UPSCच्या संभाव्य विद्यार्थ्यांच्या डोकावर मोदी खाजगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांची नेमणूक करतील असा ठोकताळा मांडला होता. मात्र आज त्याच तारखेला आणि त्याच महिन्यात म्हणजे १३ जून २०१९ रोजी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मांडलेला तो राजकीय ‘ठोकताळा’ सत्यात उतरला आहे, असंच मान्य करावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मंत्र्यांनी घरून काम करणे बंद करावे: पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दरम्यान सर्व मंत्र्यांनी वेळेवर कार्यालयात हजर राहावे तसेच घरून काम करणे बंद करावे, असे थेट आदेश त्यांनी यावेळी दिले. शपथविधीनंतर प्रथमच पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांच्या भेट घेऊन त्यांना जबाबदारी सांभाळून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यक्रम आखून त्यानुसार काम करावे, चाळीस दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनकाळात कुणीही बाहेरचे दौरे काढू नये, सर्व राज्यमंत्र्यांपर्यंत महत्त्वपूर्ण निर्णय वेळोवेळी पोहोचवावे, असेही त्यांनी म्हटले. काम सुरळीत आणि सुव्यवस्थित पार पडावे व इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
CRPF च्या जवानांवर दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद; मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक करणार का?
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एकूण ५ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार , अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. परंतु, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे एकूण ५ जवान शहीद झाले. दरम्यान तसेच, याठिकाणी जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
YSR काँग्रेसला जवळ करून शिवसेनेला २०२४ मध्ये एनडीए'तून हद्दपार करण्याची योजना? सविस्तर
सध्या आंध्र प्रदेशात राजकीय समीकरणं बदलल्याने भाजपाला देखील YSR काँग्रेसचे वेड लागल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विजयश्री खेचणाऱ्या भाजपने सध्या अल्पसंख्यांकांना जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. जगनमोहन यांनी राजकीय समीकरण बदलला असलं तरी आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?
लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेस या आंध्र प्रदेशातील पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी आधीच दावा केला होता आणि हा आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचं म्हटलं होत. परंतु, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत खात्रीलायक वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
उन्मत्त भाजप खासदाराने पोलिसाच्या कानाखाली मारत, ठार मारण्याची धमकी दिली
लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार बहुमताने सत्तेत पुन्हा विराजमान झाले आणि याच लोकसभा निवडणुकीत अनेकांची लॉटरी लागल्याने त्यातील काही खासदार डोक्यात सत्तेची हवा गेल्यासारखे वागत आहेत. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडलेला आहे. उत्तर प्रदेशातील धौरहरा मतदारसंघाच्या भाजप खासदार रेखा वर्मा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला श्रीमुखात मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित पोलीस शिपायाचे नाव श्याम सिंग असून त्याने लखीमपूर खिरी येथील मोहम्मदी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुसपूस शिगेला, गावठी बॉम्बचे हल्ले सुरु
पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद मुख्तार (६८) ही व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. स्थानिक वर्मनपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ परगणा जिल्ह्यातील काकीनारा भागात बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.
6 वर्षांपूर्वी -
भारताने अमेरिकन बाइकवरील आयातशुल्क ५०% करून सुद्धा ट्रम्प यांच्याकडून नाराजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत सरकारच्या उद्योगिक संबंधांवर टीका केली आहे. भारत सरकार यापूर्वी अमेरिकेच्या मोटारसायकलवर १०० टक्के आयात शुल्क आकारत होता. आता जरी त्यांनी तो ५०% इतका केला असला तरी देखील तो जास्तच आहे असं सूर लावला आहे. आमच्या सरकारला हे मान्य नाही, असं मत व्यक्त करत डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीच्या हालचाली?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देणार आणि तो स्वीकारला जाणार का हे अजून निश्चित झालेले नसताना आता काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी जर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिले तर काँग्रेसमध्ये या हालचालींना जोर येईल असं वृत्त आहे. तसेच त्यांनी निर्णय बदलला नाही तर अशावेळी पक्षाकडून दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. गांधी कुटुंबीयाकडे अध्यक्षपद नको या परिस्थितीत पक्षाकडून हंगामी अध्यक्ष बनविण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
EVM बाबत तंत्रज्ञांशी चर्चा करून व विरोधकांना एकत्र घेऊन प्रकरणाच्या खोलात जाणार
ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची देखील धाकधूक वाढणार आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधताना व्यक्त केला. एनसीपीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
देशाला हादरवणाऱ्या कठुआ बलात्कारप्रकरणी सातपैकी सहाजण दोषी
जम्मू-काश्मीरमधील बहुचर्चित कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी पठाणकोट कोर्टाने प्रमुख आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे. तर, आरोपी विशाल याला दोषमुक्त करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला. २ वाजता सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता, या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC