महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री फक्त भाजपाचाच असेल; बैठकीत निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी जातीय दंगलींच्या उंबरठ्यावर?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली तरी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. मागील दोन दिवसांपासून उफळलेल्या वादानंतर भाजपाच्यावतीने वतीने आज बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात पुकारण्यात आला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष व टीएमसी कार्यकर्ते यांच्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड कालवश
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं सोमवारी सकाळी बंगळुरू येथील त्यांंच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे कलाविश्वाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. १९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला होता. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांवर त्यांचे प्रभत्व होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे त्यांचं मूळ गाव. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं.
6 वर्षांपूर्वी -
तुटपुंज्या कर्जामुळे बळीराजाच्या आत्महत्या; तर कर्जबुडव्या उद्योगपतींचा कुटुंबासोबत क्रिकेटचा आनंद
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि देशातील बँकांना करोडोचा चुना लावून आणि गैरव्यवहार करुन इंग्लंडला पलायन केलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. सामना सुरु झाल्यावर विजय मल्ल्या स्टेडियमनमध्ये जाण्यासाठी हजर झाला. तेव्हा मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरलं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: 'बलात्काराचे वेगळे नेचर असते', भाजपा मंत्र्याचं संतापजनक विधान
यूपीत सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यात भर म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपेंद्र तिवारी असे या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचे नाव असून त्यांनी बलात्कार वेगवेगळ्या नेचरचा असतो, असे संतापजनक विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची आर्थिक धोरणं चुकल्याने २०११ मधील जगात ३ऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था ६व्या क्रमांकावर
सध्या देशभर आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोदींच्या नैत्रुत्वात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दुसरी महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे जवाबदार प्रसार माध्यमं देखील कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाचकाकडे तेच खाद्य पोहोचवून २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “मोदी मृगजळ” निर्माण करत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. वास्तविक सामान्य वाचकाला अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबद्दल सखोल असं काही कळत नसतं आणि ते मोजण्याची नेमकी परिमाणं काय असतात याची देखील त्यांना जास्त माहिती नसते. नेमका त्याच विषयाचा धागा पकडून सध्या मोदींच्या नैतृत्त्वात भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंड नंतर जापानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशा बातम्या जोरदारपणे पेरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत
भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
केरळात पावसाचे आगमन, मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच रिमझिम
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आतुरतेने पावसाची वाट बघत होते. अखेर आज केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली आहे. तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. केरळमध्ये पाऊस पडल्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होते. तसेच दहा जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चीनच्या सीमेजवळील AN-३२ विमान बेपत्ता होताच राष्ट्रभक्ती धोनीच्या हँडग्लोव्जवर केंद्रित केली?
लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर डिजिटल देशभक्ती मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. अर्थात त्यात मोदींपासून ते भाजपच्या नेत्यांमध्ये निरनिराळी वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच रंगल्याच पाहायला मिळालं. त्यात कहर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तर थेट बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने तब्बल २५० दहशदवादी मारल्याचा दावा केला होता. त्याला कोणताही पुरावा स्वतः भारतीय लष्कराने किंवा वायुदलाने देखील दिला नव्हता. मात्र ते विचारणाऱ्या प्रत्येकाला भाजप समर्थकांनी राष्ट्रद्रोही घोषित करण्याचं शौर्य दाखवलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
वायएस जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळात ५ जातीचे ५ उपमुख्यमंत्री
आंध्र प्रदेश सरकारमध्ये केवळ १-२ नव्हे, तर तब्बल ५ उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संविधानिक अधिकार नसतो, मात्र स्वतःच्या पक्षातील इतर वजनदार नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे पद निर्माण गेलं असलं तरी त्याचा वेगळाच प्रयोग सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात केला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल ९००० कोटींचे नुकसान
ओडिशात फनी या चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान या चक्रीवादळात आतापर्यंत एकूण ६४ पेक्षा अधिक सामान्य स्थानिक नागरिकांचा जीव गेल्याचे वृत्त आहे. ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून आजूबाजूच्या घरांची मोठी हानी झाली होती. घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली गेला होता. मोठ्या प्रमाणात ओडिशाचे नुकसान झाले. फनी या चक्रीवादळामुळे तब्बल ९३३६ कोटी एवढं प्रचंड नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा राज्य काँग्रेसमुक्तीच्या दिशेने; १९ पैकी १२ आमदारांचा गट टीआरएसमध्ये विलिन
लोकसभा निवडणुकीत देशभर मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याचा परिणाम आता इतर राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना पक्षात राहणे देखील धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी स्पर्धा सूर झाली आहे. सत्तेत असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलिन करण्याचे पत्रच १२ आमदारांनी दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: हायवेच्या कामांची पोलखोल, गडकरी कंत्राटदारांना बुलडोझर खाली चिरडनार का?
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळणे आमचा अधिकारच : संजय राऊत
लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक विजयात बहुमताचा आकडा पार करत भारतीय जनता पक्षाचे ३०३ खासदार निवडणून आले, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आले. त्यामुळे एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा सर्वाधिक विजयी खासदार असलेला पक्ष ठरला. परंतु त्यांना केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ते देखील अवजड उद्योग खाते. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या वेळी बेशिस्त झालेल्या साध्वी प्रज्ञा म्हणतात ‘आता मी शिस्त पाळणार’
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल असे साध्वी प्रज्ञा यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यान मुंबई पोलीस दलातील शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक विधान केल्याने देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मीरच्या मतदारसंघात बदल करण्याची अमित शहांची तयारी
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार संपूर्ण बहुमताने स्थापन झाल्यावर नवनियुक्त गृहमंत्री अमित शहांची नजर पहिल्यांदा जम्मू काश्मीरकडे वळली आहे. या राज्यातील मतदारसंघांच्या सीमा बदलण्यावर त्यांनी विशेष लक्ष केलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या वर्षाच्या अखेरीस तिथे विधानसभा निवडणुका घेण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाने केले आहे आणि निवडणूक म्हणजे अमित शहा यांचा आवडता छंद झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून २७ हजार कोटी खर्च: CMS अहवाल
यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे आणि त्यात भाजपने विश्वविक्रम केला आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६०,००० कोटीं खर्च करण्यात आले आहेत. मात्र यापैकी तब्बल ४५ टक्के म्हणजेच २७,००० कोटींची रक्कम ही एकट्या भारतीय जनता पक्षाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय अर्थव्यवस्था २०११ मध्येच जगात ३ऱ्या क्रमांकावर होती; नंतर मोदींमुळे ती खाली गेली
सध्या देशभर आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोदींच्या नैत्रुत्वात मोठ्या झपाट्याने वाढत आहे. दुसरी महत्वाची गंभीर गोष्ट म्हणजे जवाबदार प्रसार माध्यमं देखील कोणताही मागचा पुढचा विचार न करता वाचकाकडे तेच खाद्य पोहोचवून २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने “मोदी मृगजळ” निर्माण करत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. वास्तविक सामान्य वाचकाला अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबद्दल सखोल असं काही कळत नसतं आणि ते मोजण्याची नेमकी परिमाणं काय असतात याची देखील त्यांना जास्त माहिती नसते. नेमका त्याच विषयाचा धागा पकडून सध्या भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंड नंतर जापानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशा बातम्या जोरदारपणे पेरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बसपा उत्तर प्रदेश पोटनिवडणुका स्वबळावर लढवणार
लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयासह बहुमताने मोदींचे भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आले. मात्र देशातील सर्वच विरोधी पक्ष आता त्यांच्या जुन्या रणनीतीत बदल करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी मायावतींच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.
6 वर्षांपूर्वी -
सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला: सरसंघचालक
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देदीप्यमान यश मिळवलं. दरम्यान, या यशाचं श्रेय कुठे तरी संघाला देखील दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर मोदी सरकारचं एखाद्या विषयावर पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today