महत्वाच्या बातम्या
-
मोदी है तो मुमकिन है! सर्वसामान्यांचं जगणं डोईजड, तूरडाळ १०० रुपये किलो
लोकसभा निवडणूक जाहीर होताच प्रत्येक विषय हा ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा अविर्भावात झाली. मात्र बहुमताने सत्तेत येऊन देखील सरकार महागाई रोखण्यात आणि सर्व सामान्यांना दिलासा देण्यात अपयशी होताना दिसत आहेत. कारण लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा महागाईने डोकं वर काढलं आहे. या आठवड्यात तूरडाळीनं तब्बल शंभरी गाठलीय. तूरडाळ प्रति किलो १०० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यो २ महिन्यांमध्ये डाळीच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झालीय. तूरडाळीबरोबर मूग, मटकी, मसुर यांच्या किमतीही वाढल्यात. त्याचबरोबर शेंगदाणा, वरी यांच्या किमतीही चढ्या होतायत.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज: हवाई दलाचे AN-३२ विमान बेपत्ता
भारतीय वायू दलाचे आसामहून अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने जाणारे एएन – ३२ हे विमान १३ प्रवाशांसह बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विमानात ८ क्रू मेम्बर्स आणि ५ प्रवाशांचा समावेश होता. आसामहून अरुणाचल प्रदेशाकडे जाण्यासाठी दुपारी या विमानाने उड्डाण केले. दुपारी १ वाजता या विमानाचा संपर्क तुटला.
6 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये केंद्राकडून राम मंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आल्याने अयोध्येतील प्रलंबित राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून त्यावर रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामविलास वेदांती यांनी केंद्र सरकारच्या चौथ्या टप्प्यात अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरु होईल असा धक्कादायक दावा केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पंतप्रधान मोदींच्या बहुमतातील सरकारचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा नियक्ती झाली असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ते ५ वर्षे या पदावर राहणार आहेत. किर्ती पदक मिळणारे अजित डोवाल हे पहिले IPS अधिकारी आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेत भाजपाला मतं दिली; आता भाजप आमदार महिलांना लाथा देत आहेत
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या दादागिरीचे अत्यंत निंदनीय आणि भयानक रुप मतदारांसमोर आले आहे. नरोदामधील भारतीय जनता पक्षाचे आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या स्थानिक एनसीपीच्या वॉर्ड प्रमुख आहेत. आमदार बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अहमदाबाद मिररने हे अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड अपमानानंतर उद्धव ठाकरे संतापले; बेरोजगारीवरून मोदी सरकारला सुनावले
जुन्या वादाला विसरून भारतीय जनता पक्ष – शिवसनेने युती करत लोकसभा निवडणुकीत यश घवघवीत मिळवले. ४ दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराची आठवण करून देणाऱ्या शिवसनेने आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून महागाई आणि वाढत्या बेरोजगारी या मुद्यांवरुन मोदी सरकारचे कान टोचले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या ५ वर्षात दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, परंतु तसे अजिबात झाले नाही. केवळ भाषणात शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. देशाची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या संकटात आहे. नवीन अर्थमंत्री यांनी मार्ग काढावे अशी मागणी शिवसेनचा मुखपत्र असलेल्या सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक पालिका निवडणुक: बॅलेट पेपरने १ महिन्यात मोदी त्सुनामी गायब; काँग्रेस ५०९ जागांसह मोठा पक्ष
लोकसभा निवडणुकीत मोदी त्सुनामी आली असली तरी एका महिन्यानंतर कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोदी त्सुनामी गायब झाली असून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे अनेकांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील २८ जागांपैकी काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली आहे. तर भारतीय जनता पक्षाने तब्बल २५ जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी जेडीएस आणि अपक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने ईव्हीएमबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
यापुढे मोदी सरकारमध्ये सामील होणार नाही, नितीश कुमारांचा बिहारी बाणा
केंद्रात बहुमताने मोदी सरकार स्थापन झाल्याने घटक पक्षांना त्रास होण्यास आणि त्यांना गृहीत धरण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी शिवसेना आणि जेडीयूने मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यात शिवसेनेने मिळेल ते पदरात पाडून घेणं रास्त समजल्याने आणि राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मूग गिळून गप्प बसणे पसंत केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बिहारमध्ये मात्र नितीश कुमार यांनी उघड नाराजी व्यक्त करत, स्वतःचा बिहारी बाणा दाखवण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शपथविधी वेळी मोदींना जीवे मारण्याची धमकी आली होती, मग समारंभ साधेपणाने का नाही उरकला?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधी सोहळ्यादरम्यान गोळ्या घालून ठार मारण्याच्या धमकीचं पत्रं आलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी देखील एक अशीच जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र यासाठी गंभीर आहे की, जर विषय इतका गंभीर असताना हजारो अतिथींना निमंत्रित करून इथल्या खुलेआम आणि शाही सोहळा घेण्याचा धोका सुरक्षा यंत्रणांनी कसा काय स्वीकारला हाच कळीचा मुद्दा आहे. विशेष खबरदारी म्हणून तो सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच विश्वासातील सहकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीत घेणं महत्वाचं होतं.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीची नोटीस
हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एनसीपीचे नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
6 वर्षांपूर्वी -
'थँक्यू गोडसे, नोटांवरून गांधींचा फोटो हटवा' महिला IAS अधिकाऱ्याचं धक्कादायक ट्वीट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे एक महिला आयएएस अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निधी चौधरी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी १७ मे रोजी महात्मा गांधीविषयी अत्यंत खबळजनक आणि वादग्रस्त ट्वीट केलं होतं. पण नंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानं त्यानं आपलं ट्वीट डिलिट केलं, परंतु तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यामुळे आता महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी एनसीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शहांनी गृहमंत्री पदाचा पदभार घेताच, शहांची २०१०-१२ मधील तडीपारीची बातमी व्हायरल
लोकसभेत मोदी सरकार पुन्हा बहुमताने विराजमान झाल्यावर शपथविधी सोहळा आटोपला आणि मंत्र्यांना देण्यात आलेल्या खात्याचा पदभार देखील स्वीकारला. मात्र यात सर्वात चर्चेला आलेला पदभार म्हणजे अमित शहा यांनी आज स्वीकारलेला गृहखात्याचा पदभार, त्यानंतर नेटिझन्सने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला दणका; भारताचा जिएसपी दर्जा हटवणार; निर्यातदार धास्तावले
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतातील मोदी सरकारला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विषयांना अनुसरून चिंतेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून खाली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण अमेरिकेने भारतातील व्यापाराला प्रोत्साहन म्हणून दिलेला जीएसपी (जनरलाईज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स) दर्जा येत्या ५ जून पासून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सामान्यांचा खिसा खाली होणार! अनुदानित व विनाअनुदानित सिलिंडर महागले
सामान्य जनतेसाठी अत्यंत त्रासदायक बातमी म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर तर तब्बल २५ रूपयांनी महागलं आहे तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत १ जून म्हणजेच आजपासून अनुदानित सिलिंडरचा एकूण दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतल्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्री १०वी - १२वी शिकलेले; आता IAS-IPS अधिकारी सलाम ठोकणार
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हम तो फकीर आदमी है म्हणणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात ९१ टक्के मंत्री करोडपती
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर काल लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांचं रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच कायम ठेवण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटमधील एकूण ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री हे करोडपती आहे. त्यापैकी एकूण २२ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगपतींना मोठ्या सवलती देणाऱ्या मोदी सरकाकडून शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत फक्त रु.५०० ने वाढ
मोदी सरकार उद्योगपतींची जेवढे धडाडीचे निर्णय घेताना दिसते तसे निर्णय इतर विषयात खुल्या हाताने घेताना दिसत नाही. मात्र जेव्हा विषय शेतकरी आणि इतर राबणाऱ्या हातांचा येतो तेव्हा तुटपुंज्या वाढ करून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. तसाच प्रकार पुन्हा घडला आहे आणि अगदी त्या निर्णयावर सही करताना स्वतःचा व्हिडिओ टाकायला देखील मोदी विसरले नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है! भारताचा GDP ७.२ टक्क्यांवरून घसरून ६.८ टक्क्यांवर
भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा घसरण झाल्याचे समोर आलं आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर घसरला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याची अधिकृत माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे. दरम्यान २०१८-१९ च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर ६ टक्क्यांपर्यंत खाली होता. जो की मागिल वर्षात याच तिमाहीत ८.१ टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर ५.८ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
लाव रे ती फुसकी लवंगी! सेनेच्या वाट्याला पुन्हा अवजड उद्योग खातं आल्याने समाज माध्यमांवर खिल्ली
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अवजड मालिका! सेनेच्या वाट्याला पुन्हा सामान्यांशी काहीच संबंध नसलेलं अवजड उद्योग खातं
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार